Didymella fabae
बुरशी
लक्षणे वाढीच्या कोणत्याही टप्प्यावर आणि मुळे सोडुन झाडाच्या कोणत्याही भागावर दिसु शकतात. गडद तपकिरी किनार असलेले गव्हाळ रंगाचे डाग पानांवर येतात. ह्या डागांचे केंद्र नंतर राखाडीसर होते आणि त्यावर बारीक बारीक गडद रंगाचे ठिपके दिसु लागतात. ह्या वैशिष्ट्यामुळेच ह्या रोगाला इतर करप्यांपासुन वेगळे काढता येते. गंभीर लागण झाली असता अकाली पानगळ होते आणि फांद्यांवरील नविन कोंब मरु लागतात ज्यामुळे झाड करपल्यासारखी दिसतात. ह्या रोगाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे बिया रंगहीन होतात आणि त्याच्या पृष्ठभागावरही तपकिरी रंगाचे डाग दिसु लागतात. जास्त लागण झालेल्या बिया जांभळट तपकिरी होतात, आक्रसतात आणि आकाराने कमी भरतात. बियांच्या ह्या रंगहीनतेमुळे त्यांचे बाजारमूल्य कमी होते.
ह्या रोगाविरुद्ध आजपर्यंत तरी कोणतीही जैव उपचारपद्धती उपलब्ध नाही. जर आपणास काही माहिती असेल तर कृपया आमच्याशी संपर्क जरुर साधा.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. बिया पेरण्यापुर्वी त्यांना भिजवुन उपचार करुन ठेवता येतात. खासकरुन जर संवेदनशील प्रकारचे बियाणे लागवडीत वापरले असेल तर पानांवरील बुरशीनाशकांची फवारणीही फायदेशीर ठरु शकते. पायराक्लोस्ट्रोबिन किंवा क्लोरोथॅलोनिलचा संरक्षक म्हणुन वापर केला जातो आणि त्यांना प्रतिबंधक म्हणुन वापरले असता चांगला परिणाम मिळतो. फुलोरा येण्याच्या वेळी लवकरच जर फवारणी केली तर शेंगा आणि बियांचा संसर्ग टाळण्यात मदत मिळते.
डिडिमेला फॅबे नावाच्या बुरशीच्या जंतुमुळे ही लक्षणे उद्भवतात जे आधीच संसर्गित झालेल्या रोपाच्या अवशेषात किंवा बियात खूप वर्षांपर्यंत जगु शकतात. बाधीत बियाणातुन उगवणारे झाडही बाधीत असते आणि त्याची वाढही नीट होत नाही. चांगल्या प्रतिच्या झाडावर तयार झालेली बुरशीची बीजांडे आणि त्या झाडाचे अवशेष हे बुरशी प्रसाराचा महत्वाचा स्त्रोत असुन त्यांचा प्रसार पावसाच्या उडणार्या थेंबांबरोबर झाडाच्या खालच्या भागावर होतो. डागातील गडद दिसणारा भागही बीजांडे तयार करतो आणि त्यांचे इतर पिकांवर वहन पावसामुळे होते. वारंवार होणारा पाऊस आणि फार काळ ओली राहीलेली पाने (खासकरुन वसंत ऋतुत) ह्या संक्रमण प्रक्रियेस आणि रोग बळावण्यास बढावा देतात. मोसमात उशीरा आर्द्र हवामान असल्यास ते शेंगा आणि बियांच्या संसर्गासाठी उत्तम असते. निरोगी दिसणार्या बियांतही बुरशीची पातळी उच्च असु शकते.