Colletotrichum truncatum
बुरशी
पानांवरील, देठांवरील, शेंगांवरील आणि बियांवरील वैशिष्ट्यपूर्ण डागांवरुन अँथ्रॅकनोज बुरशीला ओळखले जाते. लंबगोलाकार, गडद तपकिरी किनारीचे राखाडी ते त्वचेच्या रंगाचे करपट डाग जुन्या पानांवर दिसतात. गंभीर बाबतीत पाने मरगळतात, सुकतात आणि गळतात, ज्याने रोपाची पानगळती होते. खोडावरील डाग लांबुडके, खोलगट आणि तपकिरी, गडद किनारींचे असतात. जसे ते वाढतात, तसे ते डाग खोडाच्या बुडापर्यंत जाऊन त्याला घेरतात. ज्यामुळे रोप मरगळते आणि मरते. शेंगांवरील डाग गोलाकार आणि खोलगट असुन त्यांना लालसर तपकिरी किनार आणि लालसर केंद्र असते. बहुधा सगळ्या वेळी छोटे स्पष्ट दिसणारे गडद किंवा काळे ठिपके मृत उतींमध्ये स्पष्ट दिसतात. क्वचित केंद्रात गुलबट रंगाचा द्रावही पाहण्यात येतो. बाधीत बिया आक्रसलेल्या आणि रंगहीन असतात. एकुण रोपाचा जोम फारच कमी होतो आणि ती विपरित हवामानात भुईसपाट होऊ शकतात.
काही संबंधित बुरशीच्या जातींसाठी (इतर पिकांवर), थोडेफार नियंत्रण मिळविण्यासाठी बाधीत बियाणे ५२ डिग्री सेल्शियस तापमानाच्या पाण्यात ३० मिनीटांपर्यंत बुडवुन ठेवावे. तापमान आणि वेळेचे बंधन अक्षरश: पाळणे महत्वाचे आहे ज्यामुळे उपचारातुन अपेक्षित परिणाम मिळेल. ट्रिकोडर्मा हारझियानम आणि बॅक्टेरिया स्युडोमोनाज फ्ल्युरेसेन्स बुरशींना बियाणावरील उपचारासाठी वापरल्यास ते कोलेटोट्रिचमच्या काही जातींशी स्पर्धा करतात.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. बियाणातुन होणार्या संसर्गासाठी बियाणांवर उपचार केले जाऊ शकतात. विविध बुरशीनाशकांची फवारा फुले येण्याआधी वापराची शिफारस करण्यात येत आहे. जर हवामान बुरशीच्या वाढीस चांगले असेल तर उपचार परत करावेत. पायराक्लोस्ट्रोबिन, क्लोरोथॅलोनिल, प्रोथियोकोनॅझॉल किंवा बॉस्कॅलिडवर आधारीत द्रावणांचा वापर ह्या बुरशीच्या नियंत्रणात परिणामकारक ठरला आहे. काही वेळा बुरशीने काही उत्पादांच्या बाबतीत प्रतिरोध तयार केल्याचेही ऐकिवात आहे.
कोलेटोट्रीचम ट्रनकॅटम नावाच्या बु्रशीमुळे ही लक्षणे उद्भवतात, जी बियांसंबंधी, जमिनीत किंवा रोपाच्या कचर्यात चार वर्षांपर्यंत जगु शकते. नविन रोपावर संक्रमण करण्याचे दोन प्रकार आहेत. प्राथमिक संसर्ग तेव्हा होतो जेव्हा जमिनीत वाढणारी बीजांडे बियाणाला कोंब यायच्या वेळी बाधीत करतात, आणि पद्धतशीरपणे उतींमध्ये वाढतात. दुसर्या बाबतीत पावसाच्या उडणार्या थेंबांनी बीजांडे जमिनीजवळच्या पानांवर उडतात आणि लागण सुरु करतात जी वरपर्यंत जाते. बुरशी नंतर ह्याच रोपाच्या उतींवरील डागांमध्ये नविन बीजांडी तयार करते (गडद किंवा काळे ठिपके). हे पावसामुळे रोपाच्या वरच्या भागात उडतात किंवा इतर रोपांवर उडतात (दुय्यम संसर्ग). थंड ते गरम तापमान (इष्टतम २० ते २४ डिग्री सेल्शियस), उच्च सामूअसलेल्या जमिनी, पाने जास्त काळ ओली रहाणे (१८-२४ तास सलग), वारंवार पडणारा पाऊस आणि घनदाट झाडी ह्या रोगाला बढावा देतात. ज्या पिकांना पोषण कमी पडते ती खासकरुन संवेदनशील होतात. अतिशय वाईट बाबतीत, पीकाचा ५०% इतका जास्त नाश होऊ शकतो.