इतर

कडू कूज

Glomerella cingulata

बुरशी

थोडक्यात

  • फळांवर लाल प्रभावळीचे छोटे, खोलगट, तपकिरी डाग येतात.
  • डाग मोठे होतात आणि त्यांच्या मध्यावर छोटे, काळे ठिपके दिसतात.
  • तपकिरी कूज फळांच्या पृष्ठभागापासुन ते गराच्या मध्यापर्यंत जाताना V आकाराची नक्षी तयार करते.
  • सडणारे सफरचंद सुकुन कडक होते ज्याला ममीफाइड फळ असे म्हणतात.

मध्ये देखील मिळू शकते

2 पिके

इतर

लक्षणे

वसंत ऋतुत कोवळ्या फळांवर छोटे राखाडी किंवा तपकिरी ठिपके दिसण्यापासुन लक्षणांची सुरवात होते. उन्हाळ्यापर्यंत हे ठिपके वाढुन छोटे, खोलगट, तपकिरी डाग तयार होतात काही वेळा ह्यांच्याभोवताली विशिष्ट लाल प्रभावळ असते. जेव्हा परिस्थिती अनुकूल असते तेव्हा ह्यातील काही डाग आणखी वाढतात आणि त्यांच्या मध्यावर छोटे काळे किंवा गडद तपकिरी ठिपके दिसतात. हळहळु तपकिरी, पातळ कूज फळाच्या पृष्ठभागापासुन गराच्या मध्यापर्यंत पोचताना V आकाराची नक्षी तयार करते (गाभ्यासभोवताली दंडाकृती कूजीची नक्षी दिसणे हे सफरचंदावरील बॉट रॉट नावाच्या रोगामुळे होते). सगळीकडुन कूज होत असल्याने सडणारे सफरचंद सुकते आणि फांदीलाच लटकुन रहाते, ज्यामुळे ममीफाइड फळासारखे दिसते. पानांवर, संक्रमणाचे वैशिष्ट्यपूर्ण छोटे जांभळे ठिपके दिसतात जे नंतर मोठे होऊन बेढब सुकलेल्या भागात बदलतात. गंभीररीत्या प्रभावित पाने पिवळी पडुन गळतात. जर फुटव्यांना संसर्ग झाला तर नंतरच्या हंगामात फुलधारणा चांगली होत नाही. सफरचंदचे सगळे वाण कडू कुजीला संवेदनशील असतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

'गोल्डन डेलिशियस' जातीच्या सफरचंदवरील कडू कुजीच्या नियंत्रणासाठी मेटच्निकोविया पुलचेरिमा T5-A2 ह्या विरोधकाला उष्ण उपचारांबरोबर नियंत्रित करण्यासाठी वापरण्यात आले होते. ह्या उपचारांची चाचणी शेतात अजुन व्हायची आहे.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. डिनाथियॉन, कॉपर किंवा गंधकावर आधारीत द्रावणांचे फवारे प्रत्येक पंधरवड्याला मारा, यामुळे जर चांगली स्वच्छता राखली गेली असेल तर परिणाम चांगले मिळतात. जर हवामान ऊबदार, ओले असेल तर १४ दिवसांपेक्षा लवकर फवारणी करणे अत्यावश्यक आहे.

कशामुळे झाले

पानांवरील आणि फुलांवरील लक्षणे एकाच जंतुच्या दोन लैंगिक प्रजातींमुळे उद्भवतात. पानांवरील आणि फळांवरील डाग ग्लोमोरेला सिंगुलाटाच्या लैंगिक रुपामुळे होतात. अलैंगिक रुपाला कोलेटोट्रिचम ग्लोइयोस्पोरियॉइडस म्हटले जाते आणि हंगामात उशीरा येणार्‍या फळांवरील डागांसाठी कारणीभूत असतात. ममीफाइड फळे आणि संक्रमित लाकुड ह्यात बुरशी विश्रांती घेते. वसंत ऋतुत, तिची वाढ परत सुरु होते आणि बीजाणू तयार करते जे पावसाच्या उडणार्‍या पाण्याने मुक्त होतात आणि वार्‍याने प्रसारित होतात. वाढलेले तापमान (२५ डिग्री सेल्शियस) आणि पाने जास्त काळ ओली रहाणे हे बुरशीच्या जीवनचक्राला आणि संक्रमणाला अनुकूल असते. फळांना संसर्ग त्यांच्या विकासाच्या कोणत्याही टप्प्यावर होऊ शकतो, पण जास्त करुन हंगामाच्या दुसर्‍या अर्ध्या भागात होतो. ओली ऊबदार हवा फळांच्या वाढीच्या काळात लांबली तर उद्रेक आणि त्या प्रमाणात भरपूर नुकसान होते.


प्रतिबंधक उपाय

  • बागेत चांगली स्वच्छता राखा.
  • कमी घटना असल्यास बागेचे निरीक्षण करुन वाढीच्या काळात रोगट फळे झाडावरुन काढुन टाका.
  • संक्रमित लाकुड आणि रोपाचे अवशेष काढणीनंतर काढुन नष्ट करा.
  • किंवा मृत फांद्या कापुन जमिनीवरील ठेवा ज्यामुळे लवकर कुजतील.
  • संक्रमणाविरुद्ध रोपाचा जोम राखण्यासाठी शक्तीवर्धके दिली जाऊ शकतात.
  • संतुलित खत कार्यक्रम राबवा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा