Erysiphe necator
बुरशी
लक्षणांची तीव्रता द्राक्षाच्या जातीवर आणि पर्यावरणाच्या स्थितीवर अवलंबून असते. नवीन पानांच्या पृष्ठभागावर शक्यतो कडेजवळ प्रथमतः पिवळे डाग (२ ते १० मि. मी. व्यासाचे) दिसतात. राखाडी ते पांढरी पावडरीसारखी बुरशी ह्या डागांवर हळुहळु वाढते. जसा जसा रोग वाढत जातो तस तसे डागही वाढत जातात आणि एकमेकांत मिसळुन पूर्ण पान व्यापुन टाकतात जे नंतर विकृत आकाराचे होऊन, सुकते आणि गळते. बाधीत पानांच्या खालील बाजुचा शिरांचा भाग तपकिरी होऊ शकतो. फुटींवर तपकिरी किंवा काळे पसरलेले डागसुद्धा येतात. नंतरच्या काळात फुलोरा आणि मणी सुद्धा बाधीत होऊन वेलीतुन सडल्यासारखा वास येतो. बाधीत मणी गडद तपकिरी आणि व्रणयुक्त किंवा बुरशीने पुर्णत: आच्छादले जातात. काही द्राक्षांचा जातींमध्ये, आच्छादन पातळ आणि कमी असते आणि लक्षणे पानांच्या राखाडी किंवा जांभळ्या रंगहीनतेपर्यंतच मर्यादित असतात.
गंधक, बागायती तेले आणि बाजारातील विविध उत्पाद सेंद्रिय प्रमाणित द्राक्षांवर मान्य केले जातात. परजीवी बुरशी अॅम्पेलोमाइसेस क्विसक्वालिस बुरशी भूरीच्या जीवनक्रमावर घाला घालते असे निदर्शनात आले आहे. काही वेलीत बु्रशी खाणारे कोळी आणि भुंग्यामुळेही भुरीचे प्रमाण काही कमी होते असे निदर्शनात आले आहे.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. वेलीच्या सर्व हिरव्या भागांवर चांगली फवारणी सगळ्या बाजुंनी आणि वेळेत करण्याची गरज आहे. गंधक, तेले, बायकार्बोनेटस किंवा चरबीयुक्त आम्लांवर आधारीत संरक्षक वापरुन प्राथमिक संसर्ग कमी करता येतो. स्ट्रोबिल्युरिन आणि अॅझोनॅफ्थलिनवर आधारीत उत्पादांची फवारणी भुरी दिसताक्षणी करावी.
एरिसिफे नेकॅटर नावाच्या भुरीमुळे ही लक्षणे उद्भवतात. ही बुरशी आपली सुप्तावस्था निस्तेज बुरशीजन्य बीजाणूच्या रुपात न उमलणार्या कळ्यांमध्ये किंवा खोडाच्या खोबणीत घालवतात. वसंत ऋतुमध्ये हे बीजाणू वार्याने नविन वेलींपर्यंत वाहुन नेले जातात (प्राथमिक लागण). बुरशीने वेलीच्या वेगवेगळ्या भागात आपले बस्तान बसविले कि ती नविन बीजाणू तयार करु लागते जे वार्याने आणखीन दूर पसरविले जातात (दुय्यम लागण). धुके आणि दवातुन मिळणारी मोफत आद्रता, पाने जास्त काळ ओली रहाणे किंवा ढगाळ वातावरण बीजाणूच्या उत्पादनासाठी उत्कृष्ट असते पण संक्रमाणासाठी (अन्य बुरशीजन्य रोगासारखे) ते जरुरी नाही. कमी ते मध्यम उत्सर्जन आणि ६ ते ३३ डिग्री सेल्शियसचे तापमान ह्या बुरशीच्या जीवनक्रमास पूरक आहे (उत्कृष्ट वाढ २२-२८ डिग्री सेल्शियसमध्ये होत असते). भुरीचा प्रादुर्भाव अशा पानांवर कमी असतो जी थेट सुर्यप्रकाशात आणि पावसात असतात आणि त्याच्या पृष्ठभागाचे तापमान ३५ डिग्री सेल्शियस पेक्षा जास्त असते.