लिंबूवर्गीय

फांदी करपा

Phytophthora nicotianae

बुरशी

थोडक्यात

  • पाने असामान्य रंग आणि आकार, विकृत आकार आणि गोळा होणे दर्शवितात.
  • करपट धब्बे मोठ्या प्रमाणावर पिवळ्या पडलेल्या पानांमधे दिसतात.
  • झाडावरील फळे ही अस्वाभाविक आकाराची होतात आणि त्यांच्या सालीवर काळे किंवा तपकिरी व्रण दिसतात.
  • या व्रणात मोठ्या प्रमाणात बुरशी वाढते आणि त्यांचा रस खाली गळताना पाहिला जाऊ शकतो.
  • खोडावरील व्रणातुन (गमोसिस) बराचसा चिकट द्राव बाहेर पडतो.

मध्ये देखील मिळू शकते


लिंबूवर्गीय

लक्षणे

रोगाची लक्षणे झाडाच्या वाढीच्या सर्व टप्प्यात आणि सर्व भागात दिसतात. पाने असामान्य रंग आणि आकार, विकृत आकार आणि गोळा होणे दर्शवितात. करपट धब्बे मोठ्या प्रमाणावर पिवळे पडलेल्या पानांमधे दिसतात. जसा रोग वाढत जातो, तसा वाळलेले भाग गळुन जातात आणि पाने खडबडीत रूप धारण करतात. झाडात, फळे पण विकृत आकाराची येतात आणि त्यांच्या सालीवर काळे किंवा तपकिरी व्रण असतात. नंतरच्या टप्प्यांवर या व्रणांमध्ये मोठ्या प्रमाणात बुरशी लागते आणि स्त्राव खाली गळताना दिसु शकतो. फळे वाळतात आणि साल स्पष्टपणे आक्रसते. झाडाचे खोड गडद तपकिरी होते आणि कँकर्स (देवीचे व्रण) फांद्यांवर स्पष्टपणे दिसतात. या व्रणातुन चिकट स्त्राव येतो (गमॉसिस). कापुन उघडे केले असता फांदीच्या आतील पेशी आणि मुळे कुजण्याची चिन्हे (रंगहीनता) दर्शवितात. एकुणच झाड वाळते आणि गंभीर प्रकरणात, मर आढळून येते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

पीक आणि हवामानाच्या परिस्थितीवर या बुरशीचे नियंत्रण वेगवेगळ्या प्रकारे होईल. फायटोप्थोरा निकोटियेनेचे अनेक शत्रु आणि भक्षक जंतु अस्तित्वात आहेत, उदाहरणार्थ अॅस्परगिलस टेरियस, सुडोमोनस प्युटिडा किंवा ट्रायकोडर्मा हार्झियानम. कॉपरवर अधारीत कीटनाशक दर २-३ महिन्यांनी पावसाळी वातावरणात वापरल्यास या रोगाचा प्रादर्भाव कमी होतो. खोडावरील व्रण काढुन त्यावर कॉपर कीटनाशकाच्या पेस्टने रंगवावे.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच जैविक उपचार पद्धती जर उपलब्ध असली तर. काही पिकात मेटालाक्सिल आणि फॉस्फॉनेट दोन्ही परिणामकारक झाल्याचे दिसले आहेत. मेटालाक्सिलला काही प्रतिकार झाल्याचेही आढळून आले आहेत.

कशामुळे झाले

शेती व बागायती क्षेत्रातील महत्त्वाच्या झाडांमध्ये फायटोप्थोरा निकोटियाने होते. ह्यामुळे हे एक खरोखरीच खूप नुकसान करणारे संक्रमण आहे. ही मातीजन्य बुरशी आहे जी जास्त करुन गरम आणि दमट हवामानात होते पण समशीतोष्ण हवामानात देखील दिसते. या जंतुंच्या वाढीसाठी आणि बीजाणूच्या प्रसारासाठी खूप ओलावा लागतो. पावसाच्या थेंबांमुळे किंवा सिंचनामुळे बीजाणूचे प्रसार रोगी झाडावरुन जवळच्या निरोगी झाडांवर जाण्यास मदत करतात. हे बीजाणूच्या रुपात पाण्यातही जगु शकतात आणि पाणी निचरा होण्याच्या खड्ड्यात किंवा सिंचन प्रणालींना दूषित करतात जेणेकरुन ते रोगाच्या मूळ भागातुन दूरवरच्या झाडांनाही लागण करु शकतात.


प्रतिबंधक उपाय

  • रोगमुक्त बियाणे किंवा कंद प्रमाणित स्त्रोतांकडुन घ्या.
  • उपलब्ध असल्यास जास्त सहनशील वाण घ्या.
  • जास्त पाणी देऊ नका.
  • संक्रमित झाड किंवा प्रभावित झाडाच्या फांद्या काढुन टाका.
  • पाण्याचा चांगला निचरा होईल अशा ठिकाणी लागवड करा.
  • शेतात काम करताना झाडाला इजा होऊ नये याची काळजी घ्या.
  • जेव्हा झाडी ओली असते तेव्हा शेतात काम करु नका.

प्लँटिक्स डाऊनलोड करा