स्ट्रॉबेरी

स्ट्रॉबेरीवरील अँथ्रॅकनोज

Colletotrichum spp.

बुरशी

थोडक्यात

  • पिकणार्‍या फळांवर फिकट तपकिरीसर, पाणी शोषल्यासारखे ठिपके येतात.
  • पिकलेल्या फळांवर गडद तपकिरी किंवा काळ्या गोल खोलगट जखमा दिसतात.
  • झाडाचे भाग, खासकरुन मुळांवरील भाग रंगहीन होतात.
  • पानांवरही काळे ठिपके तसेच नुकसान दिसते.
  • सर्व हिरव्या भागांवर गडद तपकिरी किंवा काळे खोलगट, गोल ठिपके दिसतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके
स्ट्रॉबेरी

स्ट्रॉबेरी

लक्षणे

ह्या कूज देणार्‍या रोगामुळे झाडाचे सर्वच भाग प्रभावित होतात. अतिशय स्पष्ट दिसणारी लक्षणे आहेत, फळांची कूज आणि मुळांजवळ आणि मुळांवरील भागात रंगहीन भाग, ज्यास "बुडकूज" ही म्हणतात. जेव्हा झाडाचा बुड प्रादुर्भावित होतो तेव्हा पूर्ण झाडच मरगळते. प्रादुर्भावित झाडाचा बुड कापून उघडल्यानंतर आपण ही रंगहीनता पाहू शकाल. फळांची कूज पक्व फळांवर फिकट तपकिरी, पाणी शोषल्यासारख्या ठिपक्यांनी सुरु होते नंतर, ती गडद तपकिरी किंवा काळी, टणक जखम बनत जाते. आर्द्र हवामानात, फळांच्या ह्या जखमांतुन नारिंगी रंगाचा द्राव स्त्रवतो. कळ्या, फुलांवर आणि वाळलेल्या फुलांवरील काळ्या जखमा ह्या प्रादुर्भावाची लवकरची चिन्हे आहेत. पानांवरही काळे ठिपके आणि नुकसान असु शकते पण फक्त एवढ्यावरुनच झाडास अँथ्रॅकनोज बुरशीचा प्रादुर्भाव झाला आहे हे म्हणता येत नाही.

शिफारशी

जैविक नियंत्रण

अशी उत्पादने शोधा जी स्पष्टपणे सांगतात कि रोगाचे नियंत्रण करतील. ह्यांचे उत्पादन मित्र जिवाणू किंवा बुरशींपासुन केलेले असते. रोग सुरु होण्यापूर्वीच ह्यांचा वापर केल्यास ती सर्वोत्तम काम करतात. पूर्वीच्या पिकांचे अवशेष शेतातुन काढुन आणि जमिनीतील सेंद्रीय सामग्री राखुन आणि/अथवा सेंद्रीय सामग्रीची अधिक भर घालुन जमीन निरोगी राखा. निरोगी जमिनीत अनेक मित्र जीव असतात जे मातीजन्य जंतुंना पसरण्यापासुन रोखतात.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. जेव्हा झाड फुलधारणेच्या अवस्थेत असतात तेव्हा फवारणी करणे अत्यंत महत्वाचे आहे. उपचार वापरासाठी फळांवर चिन्हे दिसेपर्यंत थांबु नका. सरकारमान्य बुरशीनाशकेच वापरा. विविध बुरशीनाशके वापरा म्हणजे अँथ्रॅकनोजमध्ये ह्यांचा प्रतिकार निर्माण होणार नाही. आपण निवडलेल्या बुरशीनाशकाचे लेबल काळजीपूर्वक वाचा आणि ते कसे काम करेल हे आपल्याला समजले आहे ह्याची खात्री करा आणि त्याच्या वापराच्या सूचना आणि नियमही पाळा. काही बुरशीनाशकांच्या लेबलांवर असेही सांगीतलेले असते कि त्यांचा वापर रोपणीच्या वेळेस रोपांना बुडवुन मग लावावे, ज्यामुळे आपल्या पिकांना अधिक संरक्षण मिळेल.

कशामुळे झाले

अँथ्रॅकनोज हा बुरशीजन्य रोग असुन स्ट्रॉबेरीजचे सर्वात जास्त नुकसान करणारा रोग आहे. ह्यामुळे वाढीच्या पूर्ण काळात तसेच तोडणीनंतरही खूपच हानी होते. बहुधा स्ट्रॉबेरीजच्या नविन रोपांद्वारे हा रोग शेतात प्रवेश करतो. जंतु असु शकतात पण त्यांच्या वाढीसाठी इष्टतम तापमान आणि आर्द्रता चांगली होईपर्यंत ते काहीही चिन्ह दर्शवित नाहीत. जेव्हा हवामान ऊबदार आणि आर्द्र असते तेव्हा हा रोग चांगलाच फोफावतो. जेव्हा पावसाचे थेंब जमिनीवर पडतात, तेव्हा मातीचे कण हवेत उडतात आणि रोगाचा प्रसार होतो. जर हवा वहात असेल तर हे अगदीच खरे ठरते. असेही अहवालीत आहे कि हे जंत जमिनीत आणि झाडांच्या अवशेषात नऊ महिन्यांपर्यंत तग धरु शकतात आणि शेतात वा आजुबाजुला वाढणार्‍या तणांना प्रादुर्भावित करतात. यंत्रांच्या आणि मानवांच्या शेतातील चलन-वलनानेही रोगाचा प्रसार होऊ शकतो.


प्रतिबंधक उपाय

  • निरोगी रोपांचीच लागवड करा आणि पारंपारिक चांगल्या पद्धतींचा वापर करा कारण काही वेळा लागवड केलेली रोपे खरोखरच निरोगीच आहेत हे सांगता येत नाही.
  • अशा पारंपारिक पद्धतींचा वापर करा ज्यामुळे झाडीत हवा चांगली खेळती राहून फळे लवकर वाळतील, हे फक्त शेतातच नाही तर रोपवाटिकेतही करा.
  • उघड्या जमिनीवर वाळलेल्या गवताचे आच्छादन करून पाण्याच्या थेंबातुन प्रसार पावणार्‍या रोगास प्रतिबंध करा.
  • प्लास्टिकचे आच्छादन टाकणे टाळा कारण ह्याने रोगाचा प्रसार वाढतो.
  • तुषार सिंचनाऐवजी मुळाजवळ पाणी द्या अथवा ठिबक सिंचन पद्धत वापरा.
  • पारंपारिक वा सेंद्रीय बुरशीनाशके वापरा जी रोपे बहरात येत असताना तसेच हवामान रोगास अनुकूल असतानाही अँथ्रॅकनोज बुरशीचा विरोध करतील.
  • जरी आत्ता काहीच लक्षणे दिसत नसतील तरीही ह्या बुरशीनाशकांचा वापर हा रोगाचे बळावणे थांबवितो.अशा जमिनीत लागवड करा ज्यात पूर्वीच्या पिकाचे काहीही अवशेष शिल्लक नाहीत आणि नविन सेंद्रीय सामग्री घालुन जमिनीस अधिक सुदृढ बनवा.
  • जमिन पूर्णपणे रोगमुक्त आहे याची खात्री करण्यासाठी, जमिनीस धूमन करावे वा जमिनीस उन्हाने चांगली तापू द्यावी.
  • नियमितपणे शेतास तण मुक्त राखा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा