Alternaria alternata
बुरशी
ह्या बुरशीमुळे डाळिंबात लक्षणांचे दोन गट दिसतात जे एकाच वेळी दिसुन येत नाहीत. काळे डाग आणि फळकूज ह्या नावाने सामान्यपणे ओळखले जाणारे हे गट डाळिंबाच्या वाणांवर अवलंबुन असतात. काळ्या डागांच्या रोगाचे वैशिष्ट्य आहे हिरव्या प्रभावळीचे छोटे, लालसर तपकिरी किंवा काळे गोल डाग (१-३ मि.मी.) फळांवर आणि पानांवर येतात. जसा रोग वाढतो तसे डाग एकमेकात मिसळुन लांबडे धब्बे तयार करतात जे फळांचा ५०% पृष्ठभाग व्यापतात. पानांवर ते पिवळे पडतात आणि पाने अकाली गळतात. फळांच्या बाहेरचा भाग कुजू लागतो, तर आतील गराला मात्र काहीच नुकसान पोचत नाही. त्वचेचा रंग थोडा अनैसर्गिक असतो किंवा फळांचा आकार थोडा बदलतो, ही गाभा कुजण्याची बाह्य लक्षणे आहेत पण बहुधा फळे त्यांचा निरोगी देखावा काढणीपर्यंत दर्शिवितात. जर त्यांना कापले तर बियाणांची टरफले कुजलेली दिसतात.
अल्टरनेरिया अल्टरनेटाचा विरोध करण्यासाठी कोणतेही जैविक उपचार उपलब्ध असल्याचे दिसत नाही. तरीपण कॉपर ऑक्झिक्लोराइडवर आधारीत उत्पाद डाळिंबावर रोगाचे नियंत्रण करण्यासाठी फारच प्रभावी सिद्ध झाले आहेत.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. फुलधारणेच्या काळात किंवा फळांवर पहिले लक्षण दिसताच दोन प्रतिबंधक फवारे मारल्यास रोगाचे चांगले नियंत्रण करता येते. प्रोपिकोनाझोल, थियोफेनेट मिथिल किंवा अॅझॉक्सिस्ट्रोबिनवर आधारीत उत्पाद चांगले परिणाम देतात असे सिद्ध झाले आहे. सांगीतलेल्या तीव्रतेचे पालन करणे महत्वाचे आहे आणि प्रतिकार निर्माण होऊ नये म्हणुन बुरशीनाशकांना विविध प्रकारे वापरावे.
अल्टरनेरिया कुटुंबातील बुरशीमुळे काळ्या डागांची आणि गाभा कुजीची लक्षणे होऊ शकतात पण ह्याचे मुख्य कारण आहे अल्टरनेरिया अल्टरनेटा. ही बुरशी रोपांच्या अवशेषात, सुकलेल्या फळात किंवा जमिनीत रहाते. बीजाणूचे वहन वार्याने फुलांवर होते. किडे आणि पक्षीही पर्यायी वाहक आहेत. फुलधारणेत उशीरा किंवा फळधारणेच्या सुरवातीच्या काळात वारंवार पडणारा पाऊस किंवा आर्द्र हवामान संसर्गास फार अनुकूल असते. बहुधा गाभा कुजीला काढणीनंतरच साठवणीच्या किंवा वहनाच्या काळात ओळखले जाते. बुरशी डाळिंबाच्या फळांच्या आत कूज निर्माण करते आणि मग ती फळे विक्रीयोग्य रहात नाहीत.