Pseudocercospora punicae
बुरशी
लक्षणे प्रथम फुलांच्या दलात दिसतात. अतिसूक्ष्म, गोलाकार आणि तपकिरी ते काळे डाग येतात. हे डाग नंतर मोठे होऊन एकमेकात मिसळतात आणि गडद होतात. आकार बेढब होते आणि धब्बे १-१२ मि.मी. व्यास आकाराचे होऊ शकतात. फळांवर डाग जीवाणूजन्य करप्याच्या व्रणांसारखे दिसतात पण ते गडद काळे, वेगळे, विविध आकारांचे, चिरा नसलेले आणि चिकट नसलेले असतात. पानांवर डाग फैलावलेल्या पिवळ्या कडांचे, विखुरलेले, गोलाकार किंवा बेढब, गडद लालसर तपकिरी ते अगदी काळ्यासारखे असतात. हे डाग ०.५ ते ५ मि.मी. व्यासाचे असतात आणि एकमेकात मिसळत नाहीत. डाग असलेली पाने फिकट हिरवी होतात, नंतर पिवळी होतात आणि गळतात. काळे लंबगोलाकार डाग काटक्यांवर येतात ज्या चपट्या आणि उंचावलेल्या कडांच्या दडपलेल्या होतात. संक्रमित काटकी सुकते आणि मरते.
माफ करा ह्या रोगाचे नियंत्रण करण्यासाठी कोणतेही जैव घटक आम्हाला सापडले नाहीत. आम्ही ही त्रुटी भरुन काढण्याच्या प्रयत्नात आहोत.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. जर आर्थिक नुकसान जास्त होणार असेल तर नियंत्रण उपचार करायलाच हवेत. फळधारणेच्या काळात बुरशीनाशकांचे दोन किंवा तीन फवारे १५ दिवसांच्या अंतराने मारल्यास रोगाचे चांगले नियंत्रण केले जाऊ शकते. सक्रिय घटक आहेत मँकोझेब, कोनाझोल किंवा किटाझिन. फवारणीसाठी डाळिंबांसाठीची नोंदणी केलेल्या बु्रशीनाशकांचाच वापर करा. प्रतिकार निर्माण होऊ नये म्हणुन शिफारशीत केंद्रीकरण वापरणे आणि बुरशीनाशकांचा वापर विविध पद्धती वापरुन करणे महत्वाचे आहे. मधल्या काळात थांबणेही तितकेच महत्वाचे आहे.
स्युडोसर्कोस्पोरा पुनिसे नावाच्या बुरशीमुळे लक्षणे उद्भवतात. ही रोपांच्या अवशेषात आणि रोपाच्या संक्रमित फांदीच्या भागात रहाते. हिच्या बीजाणूंचा प्रसार वार्याने होतो. पाऊस पडल्यानंतर आणि पाणी साचलेल्या जमिनीत हा रोग उद्भवतो. म्हणुन दमट आणि पावसाळी हवामानात रोगाचे संक्रमण आणि प्रसार झपाट्याने होतो. पानांवरील डागांमुळे उत्पन्न अप्रत्यक्षरीत्या कमी होते. पानांवरील डागांमुळे प्रकाश संश्र्लेषण होऊन उर्जा निर्माण होण्याचे काम कमी प्रमाणात होते. संक्रमित पाने चहा उत्पादन किंवा इतर कोणत्याही कारणासाठी विकली जाऊ शकत नाहीत. फळांवरील डागांमुळे बाजारात उत्पाद म्हणुन विकली न जाऊन आर्थिक नुकसान होते. संक्रमित फळेही विकली जाऊ शकत नाहीत.