Gibberella zeae
बुरशी
मक्यामध्ये कणीस आणि खोडावर लक्षणे दिसणे हे या रोगाचे वैशिष्ट्य आहे. सुरुवातीच्या लक्षणात कणसाच्या टोकावर पांढरी बुरशी येते जी कालांतराने गुलाबी किंवा लाल होते. जसा रोग वाढतो तशी रंगहीनता संपूर्ण कणसावर, जास्त करुन साल आणि दाण्यांच्या मध्ये पसरते. संक्रमित कणसे पूर्ण कुजत नाहीत. लवकर संक्रमण झालेल्या झाडांची पाने निस्तेज राखडीसर हिरवी होतात आणि मरगळु लागतात. खालचे पेरे मऊ पडतात आणि गव्हाळ ते गडद तपकिरी होतात. नंतर काळे ठिपके देखील पृष्ठभागावर विकसित होतात जे नखांनी सहज खरवडले जाऊ शकतात. फांदीला आडवे चिरल्यास, आत गुलाबी किंवा लाल छटेचे रंगहीन भाग दिसतात. मुख्य मुळ हळुहळु कुजून तपकिरी आणि ठिसुळ होते. झाडे अकाली वाळून आडवी होतात.
जिबेरेल्ला झियेविरुद्ध आजतागायत कोणतेही जैविक नियंत्रण उपलब्ध नाही. जर आपणांस माहिती असले तर आम्हाला जरुर कळवा. गरम पाण्यात बियाणे भिजवुन कोणत्याही जंतुंपासुन मुक्त केले जाऊ शकते. आपल्या गरजेसाठी कोणते तापमान आणि वेळ योग्य असेल हे कृपया तपासा.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. मक्याच्या जिबेरेल्ला खोडकुजीवर सध्यातरी कोणतेही बुरशीनाशक उपलब्ध नाही. बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया विशेषत: जेव्हा क्षेत्रास या रोगाद्वारे खूप जास्त संक्रमण केलेला आहे तिथे करावी.
जिबेरेल्ला झिये नावाच्या बुरशीमुळे लक्षणे उद्भवतात जी झाडाच्या अवशेषात आणि संभवत: बियाण्यात देखील विश्रांती घेते. ओल्या, ऊबदार हवामानात बीजाणू तयार होतात आणि वारा किंवा उडणार्या पाण्याच्या थेंबांनी पसरतात. बीजाणू स्त्रीकेशारावर पडुन तिथे घर करु लागतात ज्यामुळे प्राथमिक संक्रमण बहुधा होते. मुळ, खोड किंवा पानाला झालेल्या जखमा हे संक्रमणाचे अन्य स्त्रोत आहेत. पक्षी आणि किडे खासकरुन हानीकारक असतात कारण ते बीजाणू किंवा बियांचे वहन करतात, तसेच ते झाडाच्या भागांनाही नुकसान करतात. भात, ज्वारी, गहू, राई, ट्रिटिकेल किंवा जव यांच्यासारख्या तृणधान्य पीक देखील या बुरशीमुळे संक्रमित होऊ शकतात. इतर झाडे देखील लक्षणे न दर्शविता या जंतूचे वहन करु शकतात ज्यामुळे संक्रमणाचे स्त्रोत होतात.