केळी

केळीच्या पानांवरील काळे ठिपके

Deightoniella torulosa

बुरशी

थोडक्यात

  • टाचणीच्या टोकासारखे गोल, काळे ठिपके प्रथम पानांच्या कडांवर उमटतात.
  • कालांतराने ते पानांच्या टोकांपर्यंत जातात ज्यामुळे 'V' आकार दिसतो.
  • काळी रंगहीनता फळावर देखील दिसते.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

केळी

लक्षणे

टाचणीच्या टोकासारखे गोल, काळे ठिपके पानांच्या कडा जवळील मुख्य शिरांवर येतात. हळुहळु ते आकाराने वाढतात आणि अरुंद पिवळे कडा तयार होतात. या मोठ्या डागांचे केंद्र वाळतात आणि फिकट तपकिरी भाग पिवळ्या कडाच्या पलीकडे जाऊन पानाच्या कडापर्यंत पसरतात. यामुळे डाग उलट्या 'V' आकाराचे दिसतात. काळी रंगहीनता फ़ळांच्या टोकांवर पहिल्यांदा दिसते आणि नंतर पूर्ण फळावर अनियमित गडद ठिपके किंवा डाग दिसतात, काही वेळेस याभोवती पिवळे कडा देखील असु शकतात. काही वाणात, गोल, लालसर तपकिरी डाग किंवा काळे केंद्र असलेले डाग आणि गडद हिरवी पाणी शोषलेली प्रभावळ दिसु शकते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

या रोगाविरुद्ध कोणतेही फक्त जैविक उपाय उपलब्ध नाहीत त्यामुळे केळीच्या बागेचे योग्य व्यवस्थापन करणे महत्वाचे आहे. गंभीर संक्रमणात, जैविक कॉपर द्रावणे उदा. १% बोर्डो मिश्रण संक्रमित भागांवर फवारले जाऊ शकते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. गंभीर संक्रमात मँकोझेब ०.४% किंवा कॉपर ऑक्झि क्लोराइड ०.२-०.४% द्रावणावर आधारीत तेले वापरा. स्पर्शजन्य बुरशीनाशक जसे कि क्लोरोथॅलोनिल किंवा मँकोझेब आणि अंतरप्रवाही बुरशीनाशके उदा. टेब्युकोनाझोल किंवा प्रोपिकोनॅझोलची शिफारस केली जाते. वापरलेले बुरशीनाशक शेंड्यावरील पानांवर देखील पोहोचतील याची खात्री करा.

कशामुळे झाले

डेइटोनिएला टॉरुलोसा नावाचे जंतुंमुळे हा बुरशीजन्य रोग उद्भवतो. ही केळीच्या वाळलेल्या पानांवर असते आणि पावसात आणि दवाच्या काळात नविन बीजाणू तयार करते. जशी आर्द्रता कमी होत जाते, बीजाणू वेगाने सोडले जातात आणि अखेरीस हवेत पसरतात. यामुळे रोगाचा प्रसार हवेतील उच्च आर्द्रतेनंतर थेट कोरड्या हवेचा काळ येतो तेव्हा खूप झपाट्याने होतो. दाट लागवड केलेल्या शेतात देखील बुरशीचा प्रसार खूप जास्त होतो. बुरशी झाडाच्या पेशींचे नुकसान करते, ज्यामुळे प्रकाश्संस्लेषणाचे भाग कमी होऊन उत्पादनात घट होते.


प्रतिबंधक उपाय

  • आपल्या भागात उपलब्ध असल्यास (बाजारात भरपूर उपलब्ध आहेत) संवेदनक्षम वाण लावा.
  • पानांचा स्पर्श एकमेकांना आणि सावली एकमेकांवर पडु नये म्हणुन लागवडीचे अंतर योग्य ठेवा.
  • संक्रमित बागेपासुन नविन लागवड पुरेशा अंतरावर असण्याची काळजी घ्या.
  • हवेतील आर्द्रता कमी करण्यासाठी तुषार सिंचनाएवजी ठिबक सिंचन पद्धतीचे अवलंबन करा.
  • संतुलित खत द्या आणि खासकरुन जास्त नत्र असलेली खते टाळा.
  • संक्रमित पाने काढुन जाळुन टाका.
  • वाळलेली जुनी लोंबणारी पाने काढुन शेत स्वच्छ ठेवा.
  • पानांचे आणि फळांचे संक्रमित भाग काढुन नष्ट करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा