Pectobacterium carotovorum
जीवाणू
नुकतीच लागवड केलेल्या मुनव्यांच्या मूळ आणि फांद्यांच्या आतील भाग कुजण्यातुन पहिली लक्षणे दिसतात. याचे वैशिष्ट्य आहे गडद तपकिरी किंवा पिवळे पाणी शोषल्यासारखे भाग आतील भागात दिसतात आणि घाणेरडा वास येतो. संक्रमित झाडांचे बुडातील भाग चिरले असता पिवळसर ते लालसर स्त्राव दिसतो. खोडाच्या बुडातील भाग कुजून त्यानंतर अचानक पानांचा जोम कमी होऊन वाळतात. रोगाच्या नंतरच्या टप्प्यावर खोडाच्या बुडातील भाग सुजून त्यावर भेगा पडतात. जुन्या झाडात, बुडाच्या भागात आणि पानांच्या पेऱ्या जवळ कूज दिसते. जर संक्रमित झाडांना उपटले तर ते जमिनीलगतच्या भागात तुटतात आणि कंद तसेच मुळे जमिनीत रहातात. लागवड केल्यानंतर ३-५ महिन्यांनी उद्रेक दिसतो.
या रोगाचे उपचार करण्यासाठी आत्तापर्यंत तरी कोणतेही जैविक उपाय उपलब्ध नाहीत. एकदा का संक्रमण झाले कि मग संक्रमित रोपाला पूर्णपणे वाचवणे किंवा संक्रमण कमी करणे ही शक्य नसते. जर आपल्याकडे या रोगावरील काही खात्रीलायक रसायनिक उपचार असल्यास कृपया आमच्याशी संपर्क साधा.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. एकदा का संक्रमण झाले कि मग संक्रमित झाडाला पूर्णपणे वाचवणे किंवा संक्रमण कमी करणे शक्य नसते. जर आपल्याकडे या रोगावरील काही खात्रीलायक रसायनिक उपचार असल्यास कृपया आमच्याशी संपर्क साधा.
जमिनीत रहाणार्या पेक्टोबॅक्टेरियम कॅरोटोवोरम जीवाणूच्या उपप्रजातींमुळे हा रोग होतो. ही बहुधा ओल्या जमिनीत आणि झाडाच्या अवशेषात रहाते. हिचा प्रसार झाडांवर पावसाने आणि सिंचनाच्या पाण्याने होतो व संक्रमित लागवड सामग्रीने देखील होतो. मुख्यत: कोवळी रोपे (मुळे धरणारी) या रोगाने जास्त प्रभावित होतात. जंतु मुळांद्वारे नैसर्गिक आणि कृत्रिमरीत्या झालेल्या जखमातुन झाडात शिरतात. खोडाच्या आतील भाग कुजल्याने आणि पाणी तसेच पोषकांच्या वहनात अडथळा आल्याने लक्षणे दृष्य होतात. उच्च आर्द्रता आणि वारंवार पाऊस जंतुच्या वाढीस प्रोत्साहन देतो. उन्हाळ्यातील उष्ण, ओल्या हवामानात संक्रमण सर्वात जास्त असते. घड लागण्याच्या सुमारास संक्रमण झाल्यास ते गंभीर आर्थिक नुकसान करु शकते.