इतर

काळसर बुरशी (काजळी)

Pezizomycotina

बुरशी

थोडक्यात

  • गडद राखाडी ते काळी बु्रशी फळांवर दिसते.
  • पानांवर, फांद्यांवर आणि खोडावर प्रभाव दिसतो.
  • पाने मरुन गळतात.

मध्ये देखील मिळू शकते


इतर

लक्षणे

काळसर बुरशी आंब्याच्या झाडांना व इतर झाडांना ज्यांना यापूर्वी रसशोषक किडींचा प्रादुर्भाव झालेला आहे त्यांना लागते. ही बुरशी किड्यांनी झाडांना खाताना जे मधाळ, चिकट, गोड रस जो इतर किड्यांना आकर्षित करण्यासाठी सोडलेला असतो त्यावरच वाढते. मधाळ रसाला खाणे म्हणुन वापरुन काळ्या रंगाच्या विविध छटा असलेली बुरशी हळुहळु झाडाच्या संक्रमित भागाला ग्रासते. काळसर बुरशी परजीवी नाही आणि जंतुविरहित आहे म्हणुत ती झाडाच्या पेशींवर वस्ती करीत नाहीत किंवा लक्षणेही दर्शवित नाहीत. तरीपण तिच्या असण्याने झाडाच्या प्रकाश्संस्लेषणावर आणि हवेतील वायुंच्या अदलाबदलीच्या क्षमतेवर परिणाम होतो. जास्त बुरशी लागलेली पाने सुकतात आणि गळतात, त्यामुळे झाडाची वाढ आणि जगण्यावर परिणाम होतो.

शिफारशी

जैविक नियंत्रण

पांढरी माशी, मावा, स्केल्स, मुंग्या आणि पिठ्या ढेकुण यांना दूर ठेवण्यासाठी नीम तेलापासुन बनविलेले उत्पाद वापरा. नीम तेलाने बुरशीचीही वाढ कमी होते. कीटनाशक साबण किंवा भांडी घासण्याचा साबण (उदा. एक चमचा साबण प्रति ५ लिटर पाण्यात मिसळुन) संक्रमित झाडांवर फवारणी केली जाऊ शकते. साबणाचा द्राव झाडांवर फवारल्यानंतर थोड्या वेळाने तो धुवुन टाकल्याने बुरशी धुऊन जाते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच जैविक उपचार पद्धती जर उपलब्ध असली तर. ऑरगॅनोफॉस्फेट कुटुंबातील अंतर प्रवाही कीटनाशके जसे कि अॅसेफेट, मॅलाथियॉन किंवा डायाझिनॉनचा वापर झाडांवरील रसशोषक किडी विरुद्ध करता येतो.

कशामुळे झाले

रसशोषक किडी जसे कि आंब्यावरील तुडतुडे (आम्रिटोडस अॅटकिनसोनी), पांढरी माशी, मावा, फुलकिडे आणि बर्‍याच इतर किडी ह्या रोगाशी संबंधित आहेत. ह्या रसशोषण प्रक्रियेत त्या संबंधित झाडांच्या पानांवर मधाळ रस सोडला जातो त्यामुळे काळसर बुरशीला वाढण्यासाठी उत्कृष्ट माध्यम निर्माण होते. मधाळ रस इतर पानांवर किंवा झाडांवर टपकून पडल्याने ह्या बुरशीचे संक्रमण पसरते. ही बुरशी झाडाच्या भागात काजळीच्या रुपात किंवा अवजारांवर व वाहतूक यंत्रावर बीजाणूच्या रुपात जिवीत राहते. किडेही एका झाडावरून दुसऱ्या झाडावर बुरशीचा प्रसार करतात. उदाहरणार्थ, मुंग्या त्यांच्या स्वत: च्या फायद्यासाठी काळसर बुरशीच्या वसाहतींचे रक्षण करते.


प्रतिबंधक उपाय

  • ज्या झाडांना भरपूर सुर्यप्रकाश मिळतो आणि आजुबाजुला खुली जागा असते त्यांवर काळसर बुरशी वाढण्याची शक्यता खूप कमी असते त्यामुळेच दोन झाडांमध्ये पुरेसे अंतर ठेवण्याची खात्री करा आणि भरपूर सुर्यप्रकाश मिळेल असे पहा.
  • रसशोषक किडींचा प्रादुर्भाव टाळा.
  • आंब्याच्या झाडापर्यंत मुंग्या आणि रस शोषक किडे पोचु नयेत म्हणुन झाडाच्या बाजुने कुंपण घाला.
  • झाडांना रसशोषक किडीं विरुद्ध चांगला नैसर्गिक प्रतिकार सुनिश्चित करण्यासाठी उत्तम खत व पाणी व्यवस्थापन करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा