Aspergillus niger
बुरशी
बियाणे न उगवता कुजतात आणि जर उगवलीच तर बुंध्याच्या भागात पाणी शोषल्यासारखे कुजीचे डाग दिसतात. झाडाच्या प्रभावित भागात देखील पाणी शोषल्यासारखे डाग दिसतात. प्रभावित पिकाप्रमाणे लक्षणे बदलतात. कांद्यात रोपाच्या उगवणीच्या सुरुवातीच्या काळात बुंध्याच्या भागात कूज दिसते. काजळी बुरशी कांद्याच्या गराच्या शिरांच्या बाजुने वाढते. भूईमुगात, बुरशीमुळे बुंधाकूज दिसते ज्याचे मुळ मुडपणे आणि झाडाच्या वरचा भाग विकृत होणे यासारखी वैशिष्ट्य असतात. शिरांमध्ये संक्रमणाच्या जागी टाचणीच्या टोकाइतके बारीक लालसर रसाचे थेंब दिसणे हे सुरुवातीच्या लक्षणात येतात. काढणीनंतरच्या कुजीमुळे रंगहीनता येते, प्रत खालावते आणि विविध पिकांचे बाजारमूल्य कमी होते.
ट्रायकोडर्मा (शेणखतामध्ये चांगल्या प्रकारे विकसित झालेल्या ) ने जमिनीची आळवणी करा. निंबोळी पेंड मध्ये देखील बुरशी विरोधक गुणधर्म आहेत आणि याचा वापर ए. निगरचा प्रसार नियंत्रित करण्यासाठी केला जाऊ शकतो. बियाणांवर ६० अंशाच्या गरम पाण्याचे उपचार पेरणीपूर्वी ६० मिनीटे करा. लाल छटेची पाने असलेल्या कांद्याच्या वाणात फेनोलिक संयुगे असतात ज्यामुळे त्यांत बुरशीप्रतिबंधक गुणधर्म असतात.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. जर बुरशीनाशकांची गरज भासली तर मँकोझेब किंवा मँकोझेब आणि कार्बेंडाझाइनचा संयोग किंवा थयरमची अळवणी फक्त बुरशी लागलेल्या भागावरच करा. इतर सामान्य उपचारांमध्ये ट्रायझोल आणि इचिनोकॅन्डिन बुरशीविरोधक समाविष्ट आहेत.
काळी काजळी ही विविध प्रकारच्या पिष्टमय फळात आणि भाज्यांमध्ये सहजपणे आढळणारी बुरशी आहे. परिणामी खाद्य खराब होते आणि बिघडते. अॅस्परजिलस निगर बुरशीचा प्रसार वारा, माती आणि पाण्याने होते. ही बहुधा सॅप्रोफाइट (कुजलेल्या पदार्थावरील जंतु) आहे जी वाळलेल्या आणि कुजत असलेल्या पदार्थांवर जगते पण निरोगी झाडांवर देखील जगु शकते. भूमध्य प्रदेश, उष्णकटिबंधीय आणि उपोष्टकटिबंधीय प्रदेशात बुरशी ही जमिनीतील सर्वसामान्य रहिवासी आहे. या बुरशीच्या इष्टतम वाढीसाठी २०-४० अंश तापमान लागते पण ३७ अंशात हिची वाढ चांगली होते. तसेच, फळ सुकण्याच्या प्रक्रियेत, ओलावा कमी होतो आणि साखरेचे प्रमाण वाढते ज्यामुळे शून्यसहनशीलतेच्या बुरशीसाठी हे अतिशय अनुकूल माध्यम होते.