गहू

गव्हावरील करपा

Magnaporthe oryzae

बुरशी

थोडक्यात

  • ओंब्या आणि कणसे अकाली ब्लीच होतात, दाणे आक्रसलेले, आणि भरलेले नसतात किंवा दाणेच नसतात.
  • पुष्कळ वेळा अंडाकृती किंवा डोळ्यांच्या आकाराचे राखाडी केंद्राचे सुकलेले डाग पानांवर दिसतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

गहू

लक्षणे

गव्हाच्या रोपाचा जमिनीवरील सर्व भाग प्रभावित होऊ शकतो, पण झटकन लक्षात येणारे लक्षण कणसाचे अकाली ब्लीच होणे आहे. जंतु उत्पन्नावर काही दिवसातच प्रभाव टाकु शकतो, ज्यामुळे शेतकर्‍यांना प्रतिक्रियेसाठी वेळ उरत नाही. फुलोर्‍याच्या वेळी संक्रमण झाल्यास दाणे उत्पादन होत नाही. तरीपण, दाणे भरायच्या वेळी संक्रमण झाल्यास दाणे छोटे, आक्रसलेले आणि रंगहीन असतात. जुन्या पानांवर दोन प्रकारचे डाग दिसतात: सौम्य बाबतीत, काळे ठिपके अाणि मोठे डोळ्याच्या आकाराचे डाग ज्यांचे केंद्र फिकट राखाडी असते आणि कडा गडद असतात. गंभीररीत्या संक्रमित झालेली पाने, काळे ठिपके आणि काळ्या कडांचे आणि पिवळसर प्रभावळ असलेले छोटे तपकिरी डाग हे वैशिष्ट्य दर्शवितात. कणसावरील लक्षणे, फ्युसारियम हेड ब्लाइट सारखीच असतात आणि त्यांची गल्लत केली जाऊ शकते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

आजतागायत, एम ओरिझेविरुद्ध शेतात कोणतेही जैव नियंत्रक असल्याचा पुरावा नाही. तरीपण, स्युडोमोनाज फ्लयुरोसेन्सच्या द्रावणाचे भाताच्या बियाणांवर उपचार केल्यास आणि पानांवरील फवारे मारल्यास करपा रोगाचे परिणामकारक नियंत्रण होऊन दाण्यांचे उत्पन्न सुधारते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. फुलोर्‍याच्या किंवा दाणे भरण्याच्या सुमारास वाढलेला पाऊस किंवा दव हमखासपणे गव्हावरील करप्यास उत्थान देतो. प्रतिबंधक उपायांसाठी सिस्टेमिक बुरशीनाशकांचा वापर करण्यापूर्वी पाऊस /दवाचा हवामान अंदाज काय आहे ह्याची माहिती काढा. ह्याच्या शिवायही बुरशीनाशके तरीपण फक्त अांशिक सुरक्षा पुरवितात. ट्रायफ्लॉक्झिस्टोबिन+टेब्युकोनाझोल हे सक्रिय घटक असलेली द्रावणे पावसा आधी किंवा दवाआधी फुलोर्‍याच्या काळात द्यावीत. त्याच प्रकारची क्रिया करणारी रसायने प्रति वर्षी वापरु नका कारण ह्यामुळे प्रतिकार निर्माण होतो.

कशामुळे झाले

मॅग्नापोर्थे ओरिझे नावाच्या बुरशीमुळे लक्षणे उद्भवतात, जी बियाणांत आणि रोपांच्या अवशेषात रहाते. गव्हाव्यतिरिक्त, ह्या जातीने जव आणि भात आणि इतर पुष्कळशा महत्वाच्या रोपांसारख्या वैविध्यपूर्ण महत्वाच्या पिकांना संक्रमित करुन स्वत:ला बदलले आहे. ह्यामुळे पीक फेरपालटही ह्याच्या नियंत्रणासाठी तितकासा परिणाम देत नाही. सध्या लागवड होत असलेल्या गव्हाच्या बहुतेक जाती ह्या रोगास संवेदनशील आहेत. कणसे लागायच्या आणि दाणे भरायच्या सुमारास, ऊबदार तापमान (१८-३० डिग्री सेल्शियस) आणि सापेक्ष आर्द्रता ८०%च्या वर असल्यास गंभीर नुकसान होते आणि काही वेळेस पूर्ण पीक एका अठवड्यात वाया जाते.


प्रतिबंधक उपाय

  • आपल्या भागातील/देशातील क्वारंटाइन नियम तपासा.
  • शेतकर्‍यांना आणि शेतकामगारांना ह्या रोगाची लक्षणे ओळखण्यास शिकवा.
  • प्रमाणित स्त्रोताकडुन बियाणे घ्यावी किंवा बियाणे बुरशी संसर्गापासुन मुक्त आहेत ह्याची खात्री करावी.
  • प्रतिकारक किंवा सहनशील वाण निवडा (बाजारात पुष्कळ उपलब्ध आहेत.).
  • रोपांचे अवशेष आणि पर्यायी यजमान रोपे शेतातुन काढुन टाका.
  • नत्रयुक्त खते जास्त देऊ नका.
  • सिलीका सुधारणा करुन यजमानांची प्रतिकारशक्ती वाढवा.
  • फुले किंवा दाणे भरण्याच्या वेळी पाऊस मिळणार नाही अशी पेरणीची वेळ साधा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा