सफरचंद

सफरचंदवरील कवडी करपा

Neofabraea malicorticis

बुरशी

थोडक्यात

  • छोटे गोलाकार, लालसर ते जांभळे डाग झाडाच्या सालीवर विकसित होतात.
  • वरती मुडपलेल्या कडांसह कँकर्स विकसित होतात.
  • दुधाळ पांढर्‍या बुरशीची वाढ त्यांच्या केंद्रभागी होते.
  • फळांवर व पानांवर तपकिरी डाग आणि धब्बे येतात.

मध्ये देखील मिळू शकते

2 पिके

सफरचंद

लक्षणे

फळांच्या झाडावरील अँथ्रॅकनोजचे सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण लक्षण म्हणजे काटक्या आणि फांद्यांवर कँकर्स येणे. सुरवातीच्या काळात त्यांचे वैशिष्ट्य छोटे गोलाकार लालसर ते जांभळे ठिपके जे खासकरुन आर्द्रतेत स्पष्ट दिसतात, ते विकसित होतात. जसे ते मोठे होत जातात, ते थोडे लांबट आणि खोलगट होऊन रंग नारिंगी ते तपकिरी होतो. जशी साल खराब होत जाते, तसे कडांवर चिरा येतात आणि वरती मुडपतात. दुधाळ पांढरी बुरशीची वाढ त्यांच्या केंद्रभागी दिसुन येते. कँकर्स कोवळ्या काटक्यांना वेढुन मारतात. कोवळी पाने आणि फळेही प्रभावित होतात आणि तपकिरी डाग आणि धब्बे दर्शवितात, जे फळांच्या बाबतीत नेमबाजाच्या लक्ष्यासारखे साठवणीच्या काळात तयार होतात. खास करुन संवेदनशील वाणात ह्यामुळे झाडाची पानगळ होते, जोम कमी होतो आणि ह्यामुळे फळांची प्रत कमी भरते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

बोर्डो मिश्रण किंवा कॉपर सल्फेट काढणीनंतर वापरल्यास नंतरच्या हंगामात अँथ्रॅकनोजच्या घटना कमी होतात. ही संयुगे काढणीच्या आधीही साठवणीच्या काळात फळांवर नेमबाजीच्या लक्ष्यासारख्या कुजीच्या घटना कमी करण्यासाठी वापरली जाऊ शकतात.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. असलेल्या कँकर्सचा नायनाट करण्यात कोणतेही बुरशीनाशक पूर्णपणे परिणामकारक सिद्ध झालेले नाही. तरीपण प्रतिबंधक बुरशीनाशकांचा वापर काढणीच्या आधी केल्याने साठवणीच्या काळात फळांवर नेमबाजीच्या लक्ष्यासारख्या कुजीच्या घटना कमी होतात. तसेच वापर काढणीनंतर केल्याने नंतरच्या हंगामात कँकर्स कमी होऊ शकतात. कप्तान, मँकोझेब किंवा झिरामचा वापर ह्या कारणसाठी केला जाऊ शकतो.

कशामुळे झाले

मुख्यत; नियोफाब्रा मॅलिकोरटिसिस नावाच्या बुरशीमुळे ही लक्षणे उद्भवतात, पण त्याच कुटुंबातील इतर बुरशीही निगडित असु शकतात. ती संक्रमित रोपाच्या कचर्‍यात किंवा जमिनीत जगू शकते. वारंवार पावसासकट आर्द्र आणि ऊबदार हवामानात ती फोफावते. वसंत ऋतुत तिची वाढ परत सुरु होते आणि बिजाणू तयार करण्यास सुरवात करते. हे बीजाणू सिंचनाच्या पाण्याने, किंवा पावसाच्या उडणार्‍या पाण्याबरोबर इतर झाडांवर किंवा रोपांवर सहतेने पसरतात. छोट्या जखमातुन ती झाडात शिरते पण जखमा न झालेल्या झाडाच्या सालीतुनही शिरु शकते. कँकर्स फक्त एक वर्षच सक्रिय असतात पण बुरशी अजुन २-३ वर्षे मोठ्या प्रमाणावर बीजाणू तयार करत रहाते. पोम आणि स्टोन फळे, हॉथॉर्न आणि माऊंटन अॅश इतर पर्यायी यजमानात येतात. सफरचंदाची सगळी वाणे ह्या रोगास वेगवेगळ्या श्रेणीने संवेदनशील आहेत. पेयर झाडेही प्रभावित होऊ शकतात.


प्रतिबंधक उपाय

  • प्रमाणित जंतु विरहित निरोगी रोपे लावा.
  • ह्या रोगास कमी संवेदनशील असणारे वाण लावा.
  • रोगाच्या लक्षणासाठी नविन झाडांचे बारकाईने निरीक्षण करा.
  • हिवाळ्यात छाटणी करताना कँकरने प्रभावित झालेल्या फांद्याही छाटा.
  • रोगट भाग आणि खोडेही समजताच छाटुन टाका.
  • बागेतुन रोपांचे अवशेष काढुन टाका.
  • बागेच्या आजुबाजुला पर्यायी यजमान लावु नका.
  • चांगली खत योजना आणि शक्तीवर्धकांचा वापर करुन रोपाचा जोम वाढवा.
  • जमिनीतुन कमाल निचरा होण्याची काळजी घ्या.

प्लँटिक्स डाऊनलोड करा