भुईमूग

भुईमुगाच्या पानावरील अल्टरनेरिया ठिपके

Alternaria sp.

बुरशी

थोडक्यात

  • पानांवर पिवळसर प्रभावळ असलेले छोटे तपकिरी ठिपके उद्भवतात.
  • डाग मध्य शीरेपर्यंत पसरतात.
  • पाने आतल्या बाजुला मुडपतात आणि ठिसुळ होतात.
  • पाने पिवळी पडुन वाळतात.
  • पानगळ होते.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

भुईमूग

लक्षणे

ए. अॅराचिडिसमुळे पानांवर छोटे तपकिरी, ओबड धोबड आकाराचे, पिवळसर प्रभावळ असलेले ठिपके (लिफ स्पॉटस) उद्भवतात. ए. टेन्युइसिमामुळे ‘v’ आकाराचे भाजल्यासारखे डाग पानांच्या फुटव्यात दिसतात. नंतर गडद तपकिरी डाग पानांच्या मध्यभागापर्यंत पोचतात आणि पूर्ण पानच करपल्यासारखे दिसु लागते, आतल्या बाजुला मुडपते आणि ठिसुळ होते (लिफ ब्लाइट). ए. अल्टरनेटामुळे छोटे, गोल ते ओबड धोबड आकाराचे आणि पूर्ण पानावर पसरलेले डाग उद्भवतात. ते पहिल्यांदा पिवळे, आणि पाण्यात भिजल्यासारखे दिसतात पण जसजसे ते मोठे होत जातात, ते सुकतात आणि बाजुच्या शिरांवरही परिणाम करतात (लिफ स्पॉटस आणि व्हेनल नेक्रोसिस). मधला भाग झपाट्याने सुकतो आणि गळुन पडतो ज्यामुळे पाने फाटल्यासारखी दिसतात आणि पानगळ होते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

ह्या रोगावर अजुनपर्यंत तरी पर्यायी उपचार सापडलेले नाहीत. कॉपर ऑक्झिक्लोराइडचे ३ ग्रॅ/ली फवारे लक्षणे दिसल्यानंतर मारल्यास परिणामकारक असतात.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. पहिली लक्षणे दिसताच मँकोझेब (३ ग्रॅ/ली पाणी)चे पानांवरील फवारे रसायनिक नियंत्रक उपायात येतात.

कशामुळे झाले

अल्टरनेरिया जातीच्या तीन प्रकारच्या जमिनीत रहाणार्‍या बुरशींमुळे हे रोग होतात. संक्रमित बियाणे संक्रमणाचा प्रथम स्त्रोत असतात. जर संक्रमित बियाणे पेरली आणि वातावरण त्यांना अनुकूल असेल तर खूपच नुकसान होऊ शकते. रोपांत दुय्यम संक्रमण वार्‍याच्या झुळुकींनी आणि किड्यांमुळे होते. २० अंशाच्या वर असलेले तापमान, पाने जास्त काळ ओलेती रहाणे आणि उच्च आर्द्रता ह्या रोगाच्या प्रसारास अनुकूल असतात. ही घटना भुईमुगाच्या पिकाला जर पावसाळ्यानंतर पाणी दिले गेले तर महत्वाची ठरते. रोगाची घटना केव्हा आणि किती गंभीरपणे झाली ह्याप्रमाणे शेंगा आणि चार्‍याचे उत्पादन २२% आणि ६३% क्रमश: कमी होते.


प्रतिबंधक उपाय

  • निरोगी झाडापासुन धरलेली बियाणे किंवा प्रमाणित जंतुविरहित बियाणे वापरा.
  • प्रतिरोधक किंवा सहनशील जातीची निवड करा.
  • तण, पर्यायी यजमान आणि आपोआप उगवलेली रोपे शेतातुन काढुन टाका.
  • जेव्हा वातावरण ह्या रोगासाठी अनुकूल असते तेव्हा ह्या रोगाच्या लक्षणासाठी शेताचे निरीक्षण करीत चला.
  • शेतात किंवा वाफ्यातील कोंबात जर संक्रमित रोपे आढळली तर मुळासकट उखडुन काढुन नष्ट करा.
  • यजमान नसलेल्या पिकांसोबत कमीत कमी तीन वर्षांसाठी पीक फेरपालट करा.
  • पाने ओली असताना शेतात काम करणे टाळा.
  • जमिनीत राहिलेल्या जंतुंचा नायनाट करण्यासाठी खोल नांगरा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा