भात

भाताची पाने करपणे

Monographella albescens

बुरशी

थोडक्यात

  • पानांच्या टोकांपासुन सुरु होऊन फिकट पाणी शोषल्यासारखे व्रण उमटतात.
  • व्रण वाढतात, पाने करपतात.
  • पाने मरगळतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

भात

लक्षणे

पानांवरील करप्याची लक्षणे वाढीचा काळ, वाण आणि झाडाच्या दाटीनुसार बदलू शकतात. बहुतेक वेळा राखाडी हिरवे पाणी शोषल्यासारखे व्रण पानाच्या टोकावर किंवा कडावर उमटु लागतात. कालांतराने हे मोठे होऊन पानाच्या टोकापासुन किंवा कडापासुन सुरु होऊन, फिकट गव्हाळी व गडद तपकिरी बांगडीसारखे व्रण आळीपाळीने तयार होतात. व्रणांच्या सतत वाढीमुळे पानांचे मोठे पृष्ठभाग करपतात. करपलेला भात सुकतो ज्यामुळे पानच करपलेले दिसते. काही देशात बांगडी व्रण क्वचितच येतात फक्त पान करपणेच आढळते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

ह्या रोगाविरुद्ध पर्यायी उपचार अजुनतरी सापडलेले नाहीत.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. थियोफेनेट मिथिलचा बीज प्रक्रियेसाठी वापर केल्यास या एम. अल्बेसेन्सची लागण कमी होऊ शकते. शेतात मँकोझेब, थियोफेनेट मिथिल १.० ग्रॅ./ली किंवा कॉपर ऑक्झिक्लोराइडचे फवारे पानांवर वापरल्यास शेंडेमराची घटना कमी केली जाऊ शकते. या रसायनांचा संयुक्त वापरही परिणामकारक असतो.

कशामुळे झाले

रोगाचा विकास साधारणपणे प्रौढ पानांवर हंगामात उशीरा होतो आणि ओले हवामान, नत्रयुक्त खतांचा अतिरेकी वापर आणि दाट लागवड यांना अनुकूल असतात. हेक्टरी ४० किलो नत्रापेक्षा जास्त वापर केल्यास पानावरील करप्याच्या घटना जास्त होतात. प्रभावित पानांवर रोग प्रभावित न झालेल्या पानांपेक्षा अधिक वेगाने विकसित होतो. लागणीचा स्त्रोत संक्रमित बियाणे आणि आधीच्या पीकाचे अवशेष असतात. पानावरील करप्याला शेंडेमरीपासुन वेगळे ओळखण्यासाठी, कापलेली पाने स्वच्छ पाण्यात ५-१० मिनीटे बुडवुन ठेवा, जर त्यातुन कसल्याही प्रकारचे स्त्राव गळला नसेल तर तो शेंडेमर आहे.


प्रतिबंधक उपाय

  • उपलब्ध असल्यास प्रतिकारक वाण लावा.
  • लागवडीचे अंतर जास्त ठेवा.
  • जमिनीतील सिलीकॉनची पातळी राखल्यासही उत्पादन वाढते आणि रोग कमी होतो.
  • नत्राचा अतिरेकी वापर टाळा.
  • पोटरी अवस्थेत नत्र विभागून द्या.
  • शेतातुन तण आणि संक्रमित भाताचे रोप काढा आणि त्यांच्या खालुन नांगरा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा