उडीद आणि मूग

उडद पिकावरील तांबेरा

Uromyces phaseoli

बुरशी

थोडक्यात

  • पानांच्या खालच्या बाजुला बारीक, गोल लालसर तपकिरी पुटकुळ्या दिसतात.
  • पुटकुळ्या नंतर एकत्र होऊन मोठ्या होतात आणि पानांच्या वरच्या बाजुसही दिसतात.
  • मोसमाच्या नंतरच्या काळात समांतर गडद तपकिरी भाग दिसु लागतात.
  • संक्रमण देठ, शेंगा आणि खोडांवर दिसू शकते.
  • पाने वाळतात आणि आक्रसतात ज्यामुळे पानगळ होऊन उत्पादनात मोठी घट होते.

मध्ये देखील मिळू शकते


उडीद आणि मूग

लक्षणे

सुरवातीची लक्षणे म्हणजे छोट्या, गोल, लालसर तपकिरी पुटकुळ्या पांढऱ्या बुरशीच्या वाढीमध्ये पानांच्या खालच्या बाजुला वाढतात. पुटकुळ्या छोट्या गटाने येतात आणि नंतर पानावर एकत्र होऊन पानाचा मोठा भाग व्यापतात. तसेच समांतर, गडद तपकिरी भाग मोसमाच्या नंतरच्या काळात दिसु लागतात. जास्त लागण झाली असता पानांच्या वरच्या पृष्ठभागालाही संक्रमित करतात ज्याने पाने पुटकुळ्यांनी भरुन जातात. पाने वाळून, आक्रसलेली होऊन गळतात. रोगाच्या ह्या टप्प्यावर देठ, शेंगा आणि खोडावर संक्रमण दिसू शकते. मोठ्या प्रमाणात पानगळ होऊन उत्पादनात मोठी घट होते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

साल्व्हिया ऑफिशिनालिस आणि पोटेटिला इरेक्टा झाडाचे अर्क संसर्ग सापडल्यानंतर बुरशीची वाढ थांबविण्यासाठी चांगला परिणाम देतात.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच जर उपलब्ध असली तर जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. रोगाची लागण पिकाच्या नंतरच्या काळात झाल्यास रसायनिक उपचार व्यवहार्य नाहीत. जर कीटनाशकांची गरज लागली, तर उत्पाद ज्यात मँन्कोबेझ, प्रॉपिकोनाझोल, कॉपर किंवा गंधकची संयुगे असतील ती फवारणीसाठी (बहुधा ३ ग्रॅ./ली पाणी) वापरली जाऊ शकतात. संसर्ग प्रथम दिसताच उपचार सुरु करा आणि १५ दिवसांनंतर पुनरावृत्ती करा.

कशामुळे झाले

हे जंतु जमिनीतील पिकांच्या अवशेषात किंवा पर्यायी यजमानात जिवंत रहातात. प्राथमिक संसर्ग म्हणजे बीजाणूचे जमिनीतुन झाडाच्या बुडाजवळच्या पानांवर पडून होते. दुय्यम प्रसार एका झाडावरून दुसऱ्या झाडावर वार्‍यामुळे होत असतो. संक्रमणाची सुरुवात आणि प्रसार ह्यास उबदार तापमान (२१ ते २६ डिग्री सेल्शियस), आर्द्र आणि ढगाळ वातावरण त्याचबरोबर रात्री भरपूर दव पडले तर फार अनुकूल असते.


प्रतिबंधक उपाय

  • निरोगी झाडापासुन धरलेले किंवा प्रमाणित रोगमुक्त बियाणे वापरा.
  • आपल्या भागात उपलब्ध असल्यास सहनशील किंवा प्रतिकारक वाण वापरा.
  • आपल्या पिकाच्या शेजारी पर्यायी यजमानांना लावणे टाळा.
  • पर्यायी यजमान आणि तण आपल्या शेतातुन काढा.
  • रोपाचे निरीक्षण करुन रोगट भाग खुडुन टाका.
  • दर तीन ते चार वर्षांनी यजमान नसलेल्या पिकांसोबत पीक फेरपालट करा.
  • खोल नांगरा आणि झाडांचे अवशेष नांगरुन पुरा किंवा जाळा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा