Colletotrichum lindemuthianum
बुरशी
वाढीच्या कोणत्याही काळात संसर्ग होऊ शकतो आणि पान, खोड, देठ आणि शेंगावर दिसतो. जर संसर्ग बियाणाचे अंकुरण होते वेळी झाला किंवा संक्रमित बियाणे वापरलेल्या रोपांवर सूक्ष्म गंजल्यासारखे ठिपके दिसतात जे हळुहळु मोठे होऊन अखेरीस वलयांकित होतात आणि अखेरीस करपतात. जुन्या झाडांवर सुरवातीची लक्षणे म्हणजे बारीक आणि अनियमित गडद तपकिरी ते काळे पाणी शोषल्यासारखे ठिपके जास्तकरुन पानांच्या खालच्या बाजुला किंवा देठांवर दिसतात. थोड्या काळानंतर ते खोलगट व्रणात बदलतात ज्यांचा मध्यभाग गडद असुन पिवळा, नारिंगी किंवा चमकदार लाल रंगाच्या कडा असतात आणि पानांच्या वरच्या बाजुसही दिसु लागतात. शेंगांवर गंजाच्या रंगाचे व्रण दिसतात आणि शेंगा आक्रसुन सुकुन जातात. जास्त लागण झाली असता संक्रमित भाग वाळून गळतात. देठांवरील आणि खोडावरील व्रणांमुळे पानगळ होते.
जैविक घटक संसर्गावर नियंत्रण ठेवण्यास मदत करु शकतात. ट्रायकोडर्मा हारझियानम बुरशी आणि स्युडोमोनाज फ्लुरोसेन्स जिवाणू हे बीज प्रक्रियेसाठी वापरले असता ते कोलेटोट्रायकम लिंडेम्युथियानमशी स्पर्धा करतात. बुरशीनाशकाच्या फवारणीमध्ये कॉपर ऑक्सिक्लोराइड ३ ग्रॅ/ली वर आधारीत उत्पादांचा १५ दिवसांच्या अंतरावर वापर करण्याचा समावेश आहे.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच जैविक उपचार पद्धती जर उपलब्ध असली तर. हवामान जर अनुकूल नसेल तर रोगावरील रसायनिक उपचार आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नसु शकतील. योग्य कीटनाशके वापरुन जसे कि थिराम ८०% डब्ल्युपीचे २ ग्रॅम/ली किंवा कप्तान ७५ डब्ल्युपीचे २.५ ग्रॅ/ली पाणी या प्रमाणात बियाणे भिजवुन प्रक्रिया करावी. बुरशीनाशके फोलपेट, मॅन्कोझेब, थियोफेनेट मिथाइल (०.१%) किंवा कॉपर ऑक्झिक्लोराइड ३ग्रॅ/ली वर अधारीत उत्पाद १५ दिवसांच्या अंतराने फवारावेत.
कोलेटोट्रायकम लिंडेम्युथियानम बुरशी जमिनीत, संक्रमित बियांवर आणि झाडाच्या अवशेषात जिवंत राहते. ती पर्यायी यजमानात देखील सुप्तावस्थेत राहू शकते. बुरशीचे बीजाणू पाने ओलसर असताना पाऊस, दव किंवा शेतीच्या कामाद्वारे वाढत्या रोपांमध्ये पसरतात. पाऊस किंवा दवामुळे जेव्हा झाडे ओली असतात तेव्हा शेतातील कामे (कामगार, उपचार... वगैरे) मर्यादित ठेवणे महत्वाचे आहे. थंड ते मध्यम तापमान (१३-२१ डिग्री सेल्शियस) आणि वारंवार पडणार्या पावसाचा काळ या बुरशीच्या प्रसाराला अनुकूल असतात, परिणामी रोगाच्या घटना आणि तीव्रता वाढते.