सोयाबीन

सोयाबीनवरील खोड आणि मूळ कूज

Phytophthora sojae

बुरशी

थोडक्यात

  • संक्रमित रोपांवर वैशिष्ट्यपूर्ण लांबट तपकिरी व्रण मुळापासुन खोडाच्या जवळपास मध्यापर्यंत उमटतात.
  • पाने पिवळी पडतात आणि मरगळतात, अखेरीस वाळतात पण देठापासुन गळत नाहीत.
  • सघन (घट्ट) माती, पाणी साचणारी जमिन आणि भरपूर पाऊस या रोगास अनुकूल आहेत.

मध्ये देखील मिळू शकते


सोयाबीन

लक्षणे

वाढीच्या सुरवातीच्या काळात, बुरशी एक तर बियाण्यात किंवा उगवून आलेल्या रोपात कुज निर्माण करते. रोपाच्या पुढच्या विकासाच्या टप्प्यांवर, संक्रमित रोपांत वैशिष्ट्यपूर्ण लांबट तपकिरी व्रण मुळांपासुन खोडाच्या जवळपास मध्यापर्यंत उमटतात. मुख्य मूळ आणि खोडाच्या आतील भागाला झालेल्या नुकसानामुळे पाने पिवळी पडुन मरगळतात, अखेरीस वाळतात पण गळत नाहीत. लक्षणे बहुधा जोरदार पावसानंतर एका किंवा दोन अठवड्यांनी पहिल्यांदा सघन (घट्ट) मातीत, पाणी साचणार्‍या भागात दिसतात. संवेदनशील वाणांत रोगामुळे मोठे नुकसान होऊ शकते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

ह्या रोगावर आजपर्यंत कोणतेही पर्यायी उपचार माहितीत नाहीत.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. बुरशीनाशकांनी बीज प्रक्रिया करणे हा एकच रसायनिक उपचार या बुरशीच्या नियंत्रणासाठी उपलब्ध आहे. मेफेनोक्झॅम आणि मेटालॅक्झिल बीज प्रक्रियेसाठी वापरले जाऊ शकतात. काही प्रकरणात या बुरशीनाशकांविरुद्ध प्रतिकार निर्माण झालेला पाहिला गेला आहे. कॉपर ऑक्झिक्लोराइड (३ ग्रॅ./ली पाणी) च्या सोबत प्रतिजैवके (स्ट्रेप्टोसायक्लिन) मिश्रणाने जमिन भिजविल्यासही काम होते.

कशामुळे झाले

फायटोप्थोरा सोजे नावाची ही बुरशी जमिनीत रहाणारी असुन ती रोपांच्या अवशेषात किंवा बियाण्यात, थंड किंवा गोठविणार्‍या हवामानातही, बरेच वर्षांपर्यंत राहू शकते. हंगामात जेव्हा हवामान परिस्थिती हिच्या विकासासाठी अनुकूल (जमिनीतील उच्च आर्द्रता आणि २५ ते ३० डिग्री सेल्शियसचे इष्टतम तापमान) असल्यास ही मुळांद्वारे रोपांना केव्हाही संक्रमित करु शकते. पहिली लक्षणे बहुधा पहिल्या जोरदार पावसानंतरच दिसतात. संक्रमित रोपे शेतात विखुरलेली किंवा ज्या भागात पाण्याचा निचरा चांगला होत नाही तिथे दिसतात.


प्रतिबंधक उपाय

  • बुरशीविरहित प्रमाणित बियाणे खरेदी करा.
  • प्रतिकारक किंवा सहनशील वाण लावा.
  • पाणी साचू नये म्हणुन पाण्याचा चांगला निचरा होईल याची काळजी घ्या.

प्लँटिक्स डाऊनलोड करा