मका

मक्यावरील उत्तरीय करपा (पानांवरील ठिपके)

Cochliobolus carbonum

बुरशी

थोडक्यात

  • खालच्या पानावर लांबट ते लंबगोलाकार किंवा गोलाकार व गडद कडा असलेले फिकट तपकिरी डाग उमटतात.
  • हे डाग काही वेळा पर्णकोष आणि कणसाच्या बाहेरील आवरणावरही येतात.
  • दाण्यांवर काही वेळा काळी बुरशी दिसुन येते.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

मका

लक्षणे

बुरशीची सशक्तता, रोपाची संवेदनशीलता आणि हवामान परिस्थिती याप्रमाणे लक्षणे थोडी बदलु शकतात. पहिली लक्षणे बहुधा झाडाच्या वाढीच्या नंतरच्या टप्प्यात कणीस धारणेच्या सुमारास किंवा कणीस तयार होताना दिसुन येतात. खालच्या पानावर लांबट ते लंबगोलाकार किंवा गोलाकार व गडद कडा असलेले फिकट तपकिरी डाग उमटतात. डागांची लांबी आणि रुंदी ही बुरशीच्या सशक्तपणावर आणि कोणत्या प्रकारचे झाड आहे त्यावर अवलंबुन असते. काही वेळा हे डाग पर्णकोष आणि कणसाच्या बाहेरच्या आवरणावर देखील येऊ शकतात. काही वेळा दाण्यातही काळी बुरशी दिसु शकते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

इथे दिलेले बहुतेक उपचार हे छोट्या प्रमाणावर केले गेले आहेत. इंडियन बायेल (एगल मार्मेलॉस) चे तेल हे हेलमिनथोस्पोरियम कारबोनमविरुद्ध सक्रिय असते, निदान प्रयोगशाळेत तरी असेच दिसुन आले आहे. काही मका जातींच्या (प्रतिकारक आणि संवेदनशीलही) पानाच्या अर्कांपासून वेगळी केलेली संयुगे काही मक्याच्या बुरशींवर विषाचे काम करतात. खोडकूज झालेल्या मकाच्या खोडातुन बुरशीला वेगळे काढले असता ती माहितीत असलेल्या रोपांच्या रोगदायक ज्यात सी. कार्बोनमही येते अश‍ा बुरशींवर परजीवी म्हणून काम करते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक किंवा सेंद्रिय उपचार पद्धतीचा वापर करा. संवेदनशील झाडांवर स्त्रीकेसर येण्याच्या सुमारास बुरशीनाशकांच्या वापराची कदाचित गरज पडु शकते. उदा. मँकोझेब२.५ ग्रॅ./ली. पाणी दराने८-१० दिवसांच्या अंतराने वापरल्यास ह्या जंतुंविरुद्ध प्रभावी असते.

कशामुळे झाले

हेलमिनथोस्पोरियम कार्बोनम नावाच्या बुरशीमुळे उत्तरीय करप्याची लागण होते. हे जंतु जमिनीतील मक्याच्या अवशेषात सुप्तावस्थेत रहातात. ओल्या हवामानात याच अवशेषांवरील बीजाणू हे संक्रमणाचे प्राथमिक स्त्रोत बनतात. एका झाडावरुन दुसर्‍या झाडावर होणारे संक्रमण वारा किंवा पावसाच्या पाण्याने होते. हा रोग प्रामुख्याने बीजोत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या झाडांवर होतो आणि प्रतिकारक वाण वापरत असल्यास ही समस्या मोठ्या प्रमाणात आढळत नाही. रोगाच्या वाढीसाठी मध्यम तापमान, आर्द्र हवामान आणि पीक घेतल्यानंतर उथळ नांगरणी अनुकूल असते. जर दाणे भरण्याच्या सुमारास संक्रमण झाले तर पीकाचे सुमारे ३०% किंवा जास्त नुकसान होऊ शकते.


प्रतिबंधक उपाय

  • आपल्या बाजारात उपलब्ध असल्यास सहनशील किंवा प्रतिकारक वाण निवडा.
  • रोगाचा विकासावर लक्ष ठेवण्यासाठी अठवड्यातुन एकदा शेताचे निरीक्षण करा.
  • पावसानंतर किंवा सिंचनानंतर झाडी लवकर कोरडी होण्यासाठी रोपांत अंतर ठेवा.
  • रोपे जमिनीला लागु नयेत म्हणुन पालापाचोळा अंथरा.
  • झाडीतील आर्द्रता कमी होऊन हवा खेळती रहाण्यासाठी तण नियंत्रण करा.
  • नत्र आणि पलाशयुक्त खते पीकाच्या अनुकूलतेप्रमाणे द्या.
  • झाडी ओली असताना शेतात काम करणे टाळा.
  • जर संवेदनशील पीके घेत असाल तर फरशी, सोयाबीन किंवा सूर्यफुले यासारख्या यजमान नसणार्‍या पीकांबरोबर पीक फेरपालट करा.
  • पीक घेतल्यानंतर झाडाचे अवशेष जमिन नांगरुन खोल पुरा ज्याने बुरशीची संख्या कमी होण्यास मदत होते.

प्लँटिक्स डाऊनलोड करा