गहू

तृणधान्यतील स्नोमोल्ड रोग

Monographella nivalis

बुरशी

थोडक्यात

  • पान आणि पेरांवर तपकिरी डाग आणि कुज दिसते.
  • फांद्या कुजतात (काही वेळा नारिंगी होतात).
  • कणसे नारिंगी ते जांभळट तपकिरी बुरशीचे भाग दर्शवितात.

मध्ये देखील मिळू शकते

2 पिके

गहू

लक्षणे

संक्रमित रोपांच्या कोवळ्या पानांवर तपकिरी डाग दिसतात किंवा उगवल्याबरोबर कोलमडतात. खालच्या पानांवर तपकिरी कूज (काही वेळा गडद रंगाचे बुरशीची बीजाणू फळे पर्णकोषात दिसतात) दिसते आणि राखाडीसर तपकिरी धब्बे खालील पेरांवर दिसतात जे नंतर वरपर्यंत पसरतात. गंभीर संक्रमित फांद्या कुजतात आणि त्यावर नारिंगी बुरशीची वाढ दिसुन येते. विपरित हवामानात त्या फांद्याजमिनीजवळच्या भागातुन तुटुन लोंबकळतात. बारीक, तपकिरी, पाणी शोषल्यासारखे ठिपके फुलांवर दिसू शकतात, ते पुढील टप्प्यात फिकट रंग घेतात तेव्हा ते हिरवे देखील राहू शकतात. ऊबदार आणि आर्द्र हवामानात फुलांची बुडे नारिंगी बुरशीच्या कणांना दर्शवितात आणि फुलांचे कोषही जांभळट तपकिरी होतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

जमिनीत रहाणारे, सगळीकडे सापडणारे, थंडीला प्रतिकार करणारे जिवाणू या बुरशीच्या जीवनचक्राला प्रभावीपणे कमकुवत करु शकतात आणि ज्यामुळे संक्रमणाची गंभीरता कमी होऊ शकते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. बीजप्रक्रियेचे उपचार करण्यासाठी अॅजौल्स (उदा. ट्रायाडिमेनॉल, बायटेर्टेनॉल, प्रोथियोकोनाझोल) किंवा स्ट्रोबिल्युरिन्स (उदा. फ्ल्युक्झास्टोबिन) आणि फ्युबेरिडाझोल किंवा आयप्रोडियॉनसारख्या रसायनांचा उपयोग केला जाऊ शकतो.

कशामुळे झाले

जमिनीत रहाणार्‍या एम. निव्हेल नावाच्या बुरशीमुळे ही लक्षणे उद्भवतात. उन्हाळ्यात ही झाडांच्या अवशेषात किंवा जमिनीत जगते. जेव्हा शरद ऋतु किंवा हिवाळा सुरु होते आणि हवा थंड, ओली असते तेव्हा बुरशीची वाढ होते आणि ती बीजाणू निर्माण करते जे उगवणाऱ्या रोपांवर आणि खालच्या पानांवर संक्रमित होतात. या बीजाणूंचे वहन वार्‍याने आणि पृष्ठभागावरील पाण्याने होते. ते झाडाच्या भागांना आणि शेतातील इतर पीकांना लागण करतात, ज्यामुळे संसर्ग गंभीर होतो. बुरशीची सर्वात जास्त वाढ १८ ते २० डिग्री सेल्शियस तापमानात होते पण काही वेळा, -६ आणि ३२ डिग्री सेल्शियसपर्यंतही तिची वाढ दिसुन आली आहे. थंड, कोरड्या तापमानात संक्रमण झाडाच्या खालच्या भागात होते तर कणसावरील संक्रमण ओल्या आणि ऊबदार काळात होते.


प्रतिबंधक उपाय

  • या रोगास प्रतिकारक असणारे वाण उपलब्ध असल्यास लावा.
  • नत्र किंवा चुनायुक्त खतांचा अतिरेकी वापर टाळा.
  • पृष्ठभागाची आर्द्रता कमी करा उदा.
  • पाण्याचा चांगला निचरा होऊ द्या किंवा मशागत करा.
  • पीक घेतल्यानंतर झाडाचे अवशेष काळजीपूर्वक काढा.
  • उरलेले बीजाणू काढण्यासाठी जमिन नांगरा.
  • शरद ऋतुत पलाशाने भरपूर असलेली खते दिल्यास एम.
  • निव्हॅलिसचा प्रसार नियंत्रित करता येतो.

प्लँटिक्स डाऊनलोड करा