Colletotrichum sp.
बुरशी
फळांवर पाणी शोषल्यासारखे गोलाकार किंवा कोणेदार डाग उमटतात व कालांतराने मऊ पडून थोडेसे खोलगट होतात. ह्या डागांचे केंद्र एकतर नारिंगी किंवा तपकिरी असते आणि काळे पडतात पण शेजारचे भाग मात्र फिकट रंगाचे राहतात. संपूर्ण फळाचा पृष्ठभाग डागांनी वेढला जाऊ शकतो. एकापेक्षा जास्त डागही येऊ शकतात. फळांच्या डागात केंद्रीत वर्तुळे दिसणेही सामान्य आहे. हिरव्या फळांना आत संक्रमण होते पण ती पिकेपर्यंत लक्षणे दिसत नाहीत. पान आणि खोडावर बारीक अनियमित आकाराचे गडद तपकिरी कडा असलेले राखाडी तपकिरी ठिपके उमटतात. मोसमात नंतर पिकलेली फळे कुजतात आणि फांद्या मरतात.
संक्रमित बियाणे ५२ डिग्री सेल्शियस तापमानाच्या गरम पाण्यात ३० मिनीटे बुडवुन उपचार करता येतात. तापमान आणि वेळ बरोबर साधली पाहिजे तरच उपचाराचा वांछित परिणाम मिळेल.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. जर बुरशीनाशकांची गरज पडलीच तर मँकोझेब असणारे किंवा कॉपरवर आधारीत उत्पाद वापरा. फुलधारणेच्या सुमारास उपचार सुरु करा.
कोलेटोट्रायकम प्रजातीच्या सी. ग्लोइयोस्पोरिओयाइडस आणि सी कॅप्सिसि सारख्या बुरशीमुळे हा रोग होतो. वाढीच्या कोणत्याही काळात,अपक्व तसेच पक्व फळांवर आणि काढणी नंतरसुद्धा हे जंतु संक्रमण करु शकतात. ही बुरशी बियाणाच्या आत व बियाणाच्या पृष्ठभागावर, झाडाच्या अवशेषात किंवा सोलानेसी कुटुंबातील इतर पर्यायी यजमानात जगु शकते. संक्रमित झाडांचे कलम वापरले असता ही ती नव्याने लागण करु शकते. बुरशी उबदार आणि ओल्या काळात फोफावते आणि पावसाच्या किंवा सिंचनाच्या पाण्याने पसरते. फळांतील लागण १० ते ३० डिग्री सेल्शियस तापमानात होते तर रोगाच्या वाढीसाठी २३ ते २७ डिग्री सेल्शियस तापमान फारच अनुकूल आहे. फळांचे पृष्ठभाग ओले राहिल्यास या रोगाची गंभीरता वाढते.