Puccinia melanocephala
बुरशी
ऊसावरील तांबर्याची पहिली लक्षणे पानांवर सुमारे १-४ मि.मी. लांबीचे पिवळसर डाग येतात. रोगाच्या वाढीबरोबर (मुख्यत्वे खालील पानांच्या पृष्ठभागावर) पानाच्या शिरेच्या बाजुने लांबट डाग येतात. ते सुमारे २० मि.मी. लांबीचे आणि तीन मि.मी. रुंद होतात. त्यांचा रंगही नारिंगी तपकिरी किंवा लाल तपकिरी पुटकुळ्यांच्या पट्ट्यांसारखे होतात पण निश्र्चितपणे क्लोरोटिक किनार असते. नंतर तांबेर्याचे फोड फुटतात. ह्यामुळे पानाची साल फाटते आणि नेक्रोतीक भाग तयार होतात. डाग बहुधा पानाच्या टोकावर जास्त असतात आणि बुडाशी जाईपर्यंत त्यांची संख्या कमी होते.
पुसिनिया मेलॅनोसेफलाविरुद्ध कोणतेही पर्यायी उपचार आम्हास ठाऊक नाहीत, माफ करा. जर आपल्याकडे ह्या रोगावरील काही खात्रीलायक उपचार असल्यास कृपया आमच्याशी संपर्क साधा.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. बुरशीनाशकाचे उपचार आर्थिक दृष्टीने परवडण्यासारखे नसतात आणि व्यावहारिकही नसतात.
९८% सापेक्ष आद्रता, थंड रात्रींच्या पाठोपाठ २० ते २५ डिग्री सेल्शियसचे दिवसाचे तापमान हे तांबेर्यास अनुकूल असते. पाने फार काळ (नऊ तास किंवा जास्त) ओली रहाणे ह्यामुळेरी रोग पसरतो. तांबेर्याच्या (पुसिनिया मेलॅनोचेफला) लागण करण्याच्या जीवनचक्रास अनुकूल परिस्थिती असल्यास ते १४ दिवसांपेक्षाही कमी असते. रोपे दोन ते सहा महिन्यांची असताना तांबेर्यास जास्त संवेदनशील असतात.