इतर

सेप्टोरिया पानावरील ठिपके

Septoria lycopersici

बुरशी

थोडक्यात

  • जुन्या पानांच्या खालच्या बाजुला गडद तपकिरी कडा असलेले बारीक राखाडी गोलाकार ठिपके उमटतात.
  • त्यांच्या केंद्रात काळे ठिपके येतात.
  • पाने थोडी पिवळी होतात आणि वाळून गळतात.
  • फांद्या आणि फुलेही प्रभावित होऊ शकतात.

मध्ये देखील मिळू शकते


इतर

लक्षणे

लक्षणे खालुन वर जून भागापासुन कोवळ्या भागाकडे पसरतात. बारीक पाणी शोषलेले गडद तपकिरी कडा असलेले राखाडी गोलाकार ठिपके जुन्या पानाच्या खालच्या बाजुला उमटतात. रोग वाढताना, डाग मोठे होऊन एकमेकांत मिसळतात आणि त्यांच्या केंद्रात काळे ठिपके दिसतात. याच पद्धतीने खोड आणि फुलांवर देखील लक्षणे दिसतात पण फळांवर क्वचितच दिसतात. जास्त संक्रमित झालेली पाने फिकट पिवळी होतात आणि वाळून गळतात. पानगळ झाल्यामुळे फळे उन्हात करपतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

कॉपरवर आधारीत बुरशीनाशके जसे कि बोर्डोक्स मिश्रण, कॉपर हायड्रॉक्साइड, कॉपर सल्फेट किंवा कॉपर ऑक्झिक्लोराइड सल्फेट बुरशीचे नियंत्रण करण्यात मदत करतात. हंगामात उशीरा ७ ते १० दिवसांच्या अंतराने या बुरशीनाशकांचा वापर करा. कीटनाशकच्या लेबलावर सांगीतल्याप्रमाणे काढणीचे नियोजन करा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. मॅनेब, मँकोझेब, क्लोरोथॅलोनिल असणारी बुरशीनाशके सेप्टोरिया पानांवरील ठिपक्यांचे परिणामकारकरीत्या नियंत्रण करतात. पूर्ण मोसमात मुख्य करुन फुल आणि फळधारणेच्या काळात, दर ७ ते १० दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. कीटनाशकांच्या लेबलावर सांगीतल्याप्रमाणे काढणीची बंधने पाळा.

कशामुळे झाले

सेप्टोरिया पानावरील ठिपके जगभरात सापडतात आणि सेप्टोरिया लयकोपेरसिसि नावाच्या बुरशीमुळे उद्भवतात. बुरशी फक्त बटाटे आणि टोमॅटो जातींनाच संक्रमित करते. १५ ते २७ अंश सेल्शियसमधील तापमान ज्यात उत्कृष्ट तापमान २५ अंश सेल्शियस आहे, हे बुरशीच्या वाढीला अनुकूल आहे. बीजाणू तुषार सिंचन, पावसाचे उडणारे थेंब, मजुरांचे हात व कपडे आणि भुंग्यांसारख्या किड्यांनी आणि शेतीच्या अवजारातुन पसरतात. सोलॅनेसियस तणात आणि थोड्या काळासाठी जमिनीत किंवा जमिनीवरील कचर्‍यात सुप्तावस्थेत रहातात.


प्रतिबंधक उपाय

  • प्रमाणित रोगमुक्त बियाणे मिळवा.
  • उपलब्ध असल्यास प्रतिकारक वाण लावा.
  • संक्रमित पान काढुन नष्ट करा.
  • जमिनीवर सेंद्रिय पालापाचोळा किंवा प्लास्टिकचे अच्छादन करा म्हणजे जमिनीतुन होणारे संक्रमण टाळता येईल.
  • संक्रमित पाने काढुन नष्ट करा.
  • झाडांना जमिनीपासुन थोडे उंचावर ठेवा.
  • शेतातुन संवेदनशील तण काढुन टाका.
  • तुषार सिंचन टाळा.
  • हत्यारे आणि अवजारे स्वच्छ ठेवा.
  • पीक घेतल्यानंतर लगेच खोल नांगरुन झाडांचे अवशेष काढुन नष्ट करा.
  • सोलानेसियस कुटुंबातील नसलेल्या पिकांसोबत पीक फेरपालट करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा