ऑलिव्ह

ऑलिव्हची मूळ कुज

Rhizoctonia solani

बुरशी

थोडक्यात

  • थोडी मरगळ, पाने तपकिरी पडणे आणि काटक्यांची मर.
  • मूळ कुज आणि खोडाच्या बुडाशी कँकर्स.
  • काही वर्षांनी झाड खालावते आणि मरते.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके
ऑलिव्ह

ऑलिव्ह

लक्षणे

थोडी मरगळ दिसणे, पाने तपकिरी पडणे आणि काटक्यांची मर हे रोगाच्या लक्षणात येतात. ह्याचा संबंध गंभीर मुळ कुजीशी आणि खोडाच्या बुडाशी असलेल्या कँकर्सशी असतो. काही वर्षांनंतर झाड खालावते आणि मरते. पीकाच्या उत्पन्नात आणि प्रतित गंभीर नुकसान अपेक्षित असते. कोवळ्या बागेत किंवा रोपवाटिकेत, झाडे झपाट्याने मरणे सुद्धा होते ज्यात पाने आधी पिवळी होणे आणि पानगळ हे होऊ सुद्धा शकते किंवा ह्याशिवायही होते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

र्‍हिझोक्टोनिया सोलानीविरुद्ध कोणतेही पर्यायी उपचार आम्हास ठाऊक नाहीत, माफ करा. जर आपल्याकडे ह्या रोगावरील काही खात्रीलायक उपचार असल्यास कृपया आमच्याशी संपर्क साधा

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. फ्ल्युडिक्झोनिल सारखे सक्रिय घट असणार्‍या कीटनाशकांबरोबर मेटालॅक्झिल, टोलक्लोफोस्म मिथिल आणि थिराम किंवा थियोफेनेट मिथिल एकेकटे पूर्वी वापरुन ऑलिव्हमधील मुळकुजीच्या घटना कमी केल्या गेल्या आहेत. ह्युमिक अॅसिड (२-३%) जमिनीत दिल्यासही परिणाम मिळतो.

कशामुळे झाले

र्‍हिझोक्टोनिया सोलानी, फ्युसॅरियम ऑक्झिस्पोरम आणि स्क्लेरोटियम रोल्फसिल सारख्या बुरशींच्या पुष्कळ प्रजातींमुळे ऑलिव्हच्या झाडांत मुळकुजीची लक्षणे उद्भवतात. हे जंतु त्यांचे आवडते यजमान उपलब्ध नसले तर जमिनीत जगु शकतात. अनुकूल परिस्थितीत त्यांची वाढ सुरु होते आणि ते मुळांच्या छोट्या केसातुन किंवा जखमेतुन आत शिरुन वस्त्या तयार करतात. भौगोलिक स्थान आणि हवामान परिस्थिती ह्याप्रमाणे मुळांना बुरशी लागण्याच्या रोगाच्या घटना आणि लक्षणांची गंभीरता अवलंबुन असते. र्‍हिझोक्टोनिया ही मातीजन्य बुरशी असुन तिला ऊबदार, मध्यम आर्द्र जमिनी अनुकूल असतात. तरीपण रोग कोरड्या आणि आर्द्र दोन्ही प्रकारच्या जमिनीत होऊ शकतो. ऑलिव्ह झाडाच्या मुळ कुजीची बहुतेक लक्षणे खरतर इतर बुरशींमुळे मुख्यत्वे फ्युसॅरियम जातीच्या प्रजातींमुळे होतात.


प्रतिबंधक उपाय

  • रोगमुक्त लागवडीचे सामान वापरा.
  • ज्या जागी मुळ बुरशी रोगाचा इतिहास आहे तिथे लागवड करणे टाळा.
  • संवेदनशील रोपांचे आंतरपिक घेणे टाळा.
  • जमिनीला तणमुक्त राखा आणि पुष्कळ वर्षांसाठी प्रतिकारक रोपे वाढवा, उदा.
  • गवत.
  • पाणी जमा होऊ देऊ नका आणि जास्त सिंचन टाळा.
  • संक्रमित भागातुन माती निरोगी भागात नेऊ नका.

प्लँटिक्स डाऊनलोड करा