Monilinia fructicola
बुरशी
पानांवर, फुटव्यावर, फुलांवर आणि फळांवर लक्षणे दिसतात आणि यजमानाप्रमाणे थोडी बदलतात. फुलांवरील संक्रमण मोसमात लवकर होते आणि जंतु सुप्तावस्थेत विकसित होणार्या फळांत रहातो. फळांवर बहुतेक करुन मऊ तपकिरी किंवा गडद तपकिरी कूज हळुहळु विकसित होते. ह्यानंतर राखाडीसर ते गव्हाळ रंगाचे फोड पृष्ठभागावर येतात, खासकरुन जर फळाला आधीच जखम झालेली असली किंवा जर आर्द्र हवामान फार काळ राहिले. कमी आर्द्रतेत फोड कदाचित मुळीच विकसित होणार नाहीत आणि फळे अखेरीस आक्रसतात. संक्रमित फुले आणि पाने तपकिरी होऊन सुकतात, ज्यामुळे करपल्यासारखे दिसते. फांदीच्या संक्रमाणाने तपकिरी, खोलगट भाग (कँकर्स) तयार होतात ज्यातुन चिकट स्त्राव गळतो. बुरशीच्या रचनेशी संबंधित असलेले राखाडी ठिपके, आर्द्र हवामानात संक्रमित भागात येतात.
पुष्कळशा पर्यायी पद्धतीहि काढणीनंतरच्या नियंत्रणासाठी वापरण्यात आल्या आहेत. बॅसिलस सबटिलिस जंतुंवर आधारीत जैवबुरशीनाशक साठवणीतील फळांतील बुरशीचे परिणामकारक नियंत्रण पुरवितात. इतर चाचण्या केले गेलेल्या उपचारात पुष्कळ प्रकारचे अल्ट्राव्हायोलेट इरॅडिएशन (अतिनील किरणांचा मारा करणे), गरम पाण्याचे उपचार आणि शॉर्ट चेन फॅटी आम्ल (अॅसेटिक, प्रोपियोनिक) वापरुन धूमन करणे, येतात. ह्या पद्धतीतील पुष्कळसे प्रकार अजुन वापरले गेले नाहीत.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. काढणी आधीच्या बुरशीनाशकांच्या वापराची शिफारस फुलधारणेपासुनच केली जाते कारण तेव्हाच रोगाची जोखीम जास्त असते. थियोफेनेट-मिथिल, आयप्रोडायोन असणार्या बुरशीनाशक मिश्रणांचा वापर परिणामकारकपणे एम. फ्रुटिकोला विरुद्ध केला गेला आहे. ह्यातील काही उत्पादांचा थोड्या प्रमाणात प्रतिकार पाहिला गेला आहे. काढणीनंतरच्या बुरशीनाशकांचे उपचार फळांवर हाताळणीपूर्वी आणि साठवणीपूर्वी करावेत ज्यामुळे काढणीनंतर रोगचा विकास कमी होईल (वेगळे बुरशीनाशक वापरल्यास चांगले).
मोनिलिनिया फ्रुटिकोला नावाच्या बुरशीमुळे आणि थोडी एम. लाक्झा आणि एम. फ्रुक्टिजेनाजातीमुळे ही लक्षणे उद्भवतात. आधी सांगीतलेली जास्त करुन पीचेस आणि नेक्टरिन्सवर येते तर नंतर सांगीतलेली बुरशी अॅप्रिकॉट, प्लम, चेरी आणि बदामांवर येते. जरी सफरचंद आणि पियरची झाडेही ह्या बुरशीने प्रभावित होतात तरी ह्या झाडांमध्ये मुख्यत: एम. फ्रुक्टिजेनामुळे ही लक्षणे उद्भवतात. बुरशी ममीफाइड फळांमध्ये झाडावर किंवा बागेच्या जमिनीवर किंवा काटक्यांवरील कँकर्समध्ये विश्रांती घेते. वसंत ऋतुत वाढ, उत्पादन परत सुरु होते आणि बीजाणूंचा प्रसार होतो जे नविन निरोगी फुलांना, फळांना आणि काटक्यांना पूर्ण हंगामात संक्रमित करतात. हे झाडाच्या जखमातुन, फुलातुन फळांमध्ये शिरतात. फळांच्या बाबतीत जंतु फुलांतुन आत शिरुन फळे विकसित होईपर्यंत सुप्तावस्थेत रहातात आणि फळे पक्व होईपर्यंत ह्याचा परिणाम दिसुन येत नाही. ऊबदार हवामान आणि पाने फार काळ ओली रहाणे हे बीजाणूंच्या प्रसारासाठी आणि संक्रमणासाठी पूरक आहे आणि त्यामुळे रोगाच्या घटना मोठ्या संख्येने होतात. रोगामुळे पिकाचे नुकसान काढणी आधी किंवा नंतरही साठवणीच्या किंवा वहनाच्या काळात होऊ शकते.