बदाम

बदामच्या पानांवरील लाल धब्बे

Polystigma ochraceum

बुरशी

थोडक्यात

  • पानांवर तपकिरी प्रभावळीने वेढलेले फिकट हिरवे ते पिवळसर नारंगी किंवा गडद अनियमित डाग येतात.
  • पाने गोळा होतात आणि टोकाकडुन किंवा कडांकडुन वाळतात.
  • अकाली पानगळ शक्य असते.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके
बदाम

बदाम

लक्षणे

पानांच्या दोन्ही बाजुंवर फिकट हिरव्या ठिपक्यांनी लक्षणांची सुरवात होते आणि नंतर हे डाग पिवळसर नारंगी धब्ब्यात बदलतात. हे धब्बे पूर्ण वसंत ऋतुत आकाराने वाढत रहातात आणि हळु-हळु एकमेकात मिसळतात ज्यामुळे उन्हाळ्यात उशिरापर्यंत झाडीचा बराचसा भाग व्यापतात. पसरत असताना त्यांचे केंद्र गडद आणि बेढब होते, सभोवताली तपकिरी प्रभावळ येते. रोग विकसनाच्या प्रगत अवस्थेत, पाने गोळा होतात आणि टोकापासुन किंवा कडांपासुन सुरु होऊन वाळतात. पानांवरील लाल डागांमुळे अकाली पानगळ होते ज्यामुळे प्रकाश संश्र्लेषण क्षमता कमी होते म्हणुन बहुधा उत्पन्नावरही परिणाम होतो.

शिफारशी

जैविक नियंत्रण

ह्या जंतुंसाठी कोणतेही जैविक नियंत्रण माहितीत नाही. कॉपर ऑक्झिक्लोराइड (२ ग्रा./ली.), कॉपर हायड्रॉक्साइड (२ ग्रा./ली.) आणि बोर्डो मिश्रण (१० ग्रा./ली.) सारखी सेंद्रीय बुरशीनाशके जी पानांवरील संक्रमण बरेच कमी करतात. पाकळ्या येण्याच्या सुमारास एक वापर आणि १४ दिवसांच्या अंतराने दोनदा वापर केल्यास रोग कमी करण्यात प्रभावी ठरते असे आढळुन आले आहे.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. मँकोझेब आणि संबंधित डायथियोकार्बामेटस (२ ग्रा./ली.) सारखी बुरशीनाशके पानांवरील संक्रमण बरेच कमी करतात. पाकळ्या येण्याच्या सुमारास एक वापर आणि १४ दिवसांच्या अंतराने दोनदा वापर केल्यास रोग कमी करण्यात प्रभावी ठरते असे आढळुन आले आहे.

कशामुळे झाले

पॉलिस्टिगमा ऑक्रासेयम नावाच्या बुरशीमुळे लक्षणे दिसतात, जी जिवंत पानांवर ठळक रंगाच्या बुरशीची रचना करुन जगते तसेच ती झाडांच्या जमिनीवर पडलेल्या अवशेषातही सॅप्रोफाइटच्या रुपात विश्रांती घेते. ह्या गळलेल्या पानांवर बुरशीची प्रजोत्पादन रचना निर्मिती होते, ज्यातुन, जेव्हा परिस्थिती अनुकूल असते तेव्हा येणार्‍या वसंत ऋतुत बीजाणू सोडले जातात. फुलधारणेच्या काळात बीजाणूंचा प्रसार सुरु होतो आणि पाकळ्या गळायच्या वेळी तो शिगेला पोचतो. ह्याप्रकारे बुरशी प्रकाश संश्र्लेषण दराला आणि परिणामी झाडाच्या उत्पादकतेला प्रभावित करते.


प्रतिबंधक उपाय

  • उपलब्ध असल्यास (बाजारात अनेक मिळतात) प्रतिकारक किंवा कमी संवेदनशील वाण लावा.
  • रोगाच्या लक्षणांसाठी बागेचे नियमित निरीक्षण करत चला.
  • संसर्ग कमी करण्यासाठी मृत, संक्रमित फांद्या छाटा.
  • बदामच्या झाडाचे संक्रमित भाग तसेच कूजत असलेली पाने आणि फुलांचे उरलेले अवशेष काढुन टाका.
  • काढलेले अवशेष खोल गाडुन किंवा जाळुन नष्ट करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा