ऑलिव्ह

ऑलिव्हच्या पानांवरील सर्कोस्पोरा ठिपके

Pseudocercospora cladosporioides

बुरशी

थोडक्यात

  • पानांच्या वरचे पिवळे भाग जे तपकिरी होऊन करपतात.
  • पानांचे खालचे भाग बुरशीच्या वाढीमुळे भारी राखाडी होतात.
  • पानगळीमुळे वाढ खुंटते आणि फळे विकृत होतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके
ऑलिव्ह

ऑलिव्ह

लक्षणे

रोगाची पानांच्या वरील व खालील भागात लक्षणे वेगवेगळी असतात. वरच्या बाजुला बेढब, विखुरलेले पिवळे ठिपके उमटतात जे कालांतराने तपकिरी होऊन वाळतात. ह्याविरुद्ध, पानाच्या खालच्या बाजुला धब्बे दिसतात जे बुरशीच्या वाढीमुळे हळु-हळु मलीन राखाडी रंगात बदलतात. नंतर पाने पिवळी, लालसर तपकिरी पडतात आणि अकाली गळतात ज्यामुळे गंभीर बाबतीत पानगळ होते. प्रभावित फांद्या किंवा झाडांची वाढ बहुधा खुंटलेली असते. विकसित फळे छोटी असुन त्यावर तपकिरी व्रणांचे ठिपके असतात आणि असमानतेने उशीरा पक्व होतात. ह्या लक्षणांची गल्लत फ्युसिक्लॅडियम ओलियाजिनम किंवा कोलेटोट्रिकम तसेच अजैविक घटकांमुळे होणार्‍या लक्षणांशी होऊ शकते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

रोगाचे नियंत्रण करण्यासाठी बोर्डो मिश्रणासारखे सेंद्रीय कॉपर द्रावणांचे मिश्रण पावसापूर्वी किंवा थेट तोड्यानंतर केले जाऊ शकते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. कॉपर हायड्रॉक्साइड, कॉपर ऑक्झिक्लोराइड, ट्रायबेसिक कॉपर सल्फेट किंवा कॉपर ऑक्साइड असणार्‍या कॉपर फवारणीचा वापर पानांवर संरक्षक थर देण्यासाठी केला जाऊ शकतो. काढणीनंतर, शरद ऋतुच्या पूर्वी आणि हिवाळी पावसाने बुरशीच्या बीजाणूंचा प्रसार होतो तेव्हा कॉपर फवारणी थेट केली जाऊ शकते. फळांची प्रत खराब होऊ नये म्हणुन तोड्याच्या सुमारास फवारणी करु नये.

कशामुळे झाले

सर्कोस्पोरा क्लॅडोस्पोरियोरोआइडस बुरशीमुळे लक्षणे उद्भवतात. ही झाडांवर राहीलेल्या संक्रमित पानांत, खरतर व्रणात रहाते. शरद ऋतुत हिची वाढ पुन्हा सुरु होते आणि त्या व्रणांच्या कडा मोठ्या होतात आणि नव्या बीजाणूंचे विकसन तेथे होते. वारंवार होणार्‍या पावसाशी नविन संक्रमण संबंधित आहे आणि बहुधा हिवळ्यात लागण होते. उन्हाळ्यापर्यंत बहुतेक संक्रमित पाने झाडावरुन गळतात, ज्यामुळे अर्ध पानगळ झालेल्या बोडक्या फांद्यांच्या टोकावरच फक्त काही निरोगी पाने उरतात. उच्च तापमान बुरशीच्या जीवनचक्रावर बंधन आणते. आर्थिक नुकसान करण्याइतके गंभीर रुप धारण करण्यासाठी बुरशीला पुष्कळ वर्ष लागतात. उच्च पातळीवर झालेल्या पानगळीने आणि फळांच्या अनियमित तसेच उशीरा पक्व होण्याने तैल उत्पादनात घट होते.


प्रतिबंधक उपाय

  • रोगाच्या चिन्हांसाठी झाडांचे नियमित निरीक्षण करत चला.
  • नत्रयुक्त खतांचा अतिरेकी वापर टाळा पण पुरेसे कॅल्शियम जरुर द्या.
  • शक्य होईल तेवढे तुषार सिंचन टाळा.
  • पाने आणि फळे लवकर कोरडी होण्यासाठी झाडांची दाटी इतकीच ठेवा कि हवा चांगली खेळती राहील.
  • लागवड योग्य दिशेने करुन हवा चांगली खेळण्याची खात्री करा.
  • अन्नद्रव्य आणि आर्द्रतेची स्पर्धा कमी करण्यासाठी झाडाच्या आजुबाजुने तण काढा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा