द्राक्षे

एस्का (बुरशी)

Togninia minima

बुरशी

थोडक्यात

  • झाडीची पानगळ, नंतर नेक्रॉटिक सुकणे आणि अकाली पानगळ दिसते.
  • छोटे, गोल, गडद ठिपके द्राक्षांवर येतात ज्यामुळे तडा जातात.
  • लाकुड कापले असता केंद्रीत वर्तुळे दिसतात.

मध्ये देखील मिळू शकते


द्राक्षे

लक्षणे

वाढीच्या मोसमात रोग केव्हाही होऊ शकतो. मुख्य लक्षण आहे पानांच्या शिरांमधील भागात "स्ट्रिपिंग" होणे, ज्याचे वैशिष्ट्य मुख्य शिरांच्या बाजुच्या भागाची रंगहीनता आणि मर. हे रंग बहुधा लाल, लाल द्राक्षात आणि पिवळा, पांढर्‍या द्राक्षात दिसतात. पाने पूर्ण सुकतात आणि अकाली गळतात. द्राक्षांवर छोटे, गोल, गडद डाग सहसा तपकिरी-जांभळ्या किनारीचे दिसु शकतात. हे फळांवरील डाग फळधारणेपासुन फळे पक्व होईपर्यंत केव्हाही उमटु शकतात. गंभीरपणे प्रभावित झालेल्या वेलींवरील द्राक्षांना बहुधा तडे जातात आणि कोरडी असतात. प्रभावित केन्स, स्पर्स, कॉर्डॉन्स किंवा खोडाला चिरले असता गडद डागाभोवती केंद्रीत वर्तुळे दिसतात. एस्काच्या गंभीर रुपाला "अॅपोप्लेक्झी" म्हटले जाते ज्यामुळे पूर्ण वेलीची अचानक मर होते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

निष्क्रिय छाटणी केलेल्या भागांना ३० मिनीटे सुमारे ५० अंश गरम पाण्यात बुडवावे. हा उपचार नेहमीच परिणाम देतो असे नाही आणि म्हणुन इतर पद्धतींबरोबर केला जायला हवा. ट्रिकोडर्माच्या काही प्रजातींचा वापर छाटणीच्या जागचे, वाढीच्या साहित्याची बुडे आणि कलमांची सामग्री याद्वारे संक्रमण टाळण्यासाठी केला गेला आहे. हे उपचार छाटणी केल्यानंतर २४ तासात आणि परत २ अठवड्यांनी करावे लागतात.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. ह्या रोगावर रसायनिक योजना कठिण आहेत कारण जखमांचे पारंपारीक संरक्षण निष्क्रिय द्राक्षवेलीच्या जास्त आत पोचत नाही त्यामुळे बुरशीवर उपचार होऊ शकत नाहीत. खोडाच्या रोगावरील सर्व रोगांसाठी प्रतिबंधक उपायच उत्कृष्ट परिणामकारक व्यवस्थापन दृष्टीकोन आहे. उदा. कलम करण्याच्या लगेच आधी, वेलींना, रोप वाढीचे नियामक किंवा बुरशीनाशकांनी संपन्न असलेल्या मिश्रणांच्या खास मेणात बुडवावे. ह्यामुळे कलमाची जोड चांगली होते आणि बुरशीचे दोश नष्ट होतात.

कशामुळे झाले

मुख्यत: टोग्निनिया मिनिमा नावाच्या बुरशीमुळे लक्षणे दिसतात, पण इतर बुरशींचाही (उदा. फायेयोमोनिएला) सहभाग असु शकतो. संक्रमण खर तर कोवळ्या वेलींवर होते पण मळ्यात प्रथम लक्षणे ५-७ वर्षांनी दिसतात. बुरशी वेलीच्या लाकडी भागात रचना तयार करुन त्यात थंडीच्या दिवसात विश्रांती घेते. शरद ऋतु ते वसंतातील पावसापर्यंत, बीजाणू तयार करुन सोडले जातात आणि छाटणीच्या जखमेतुन ते संक्रमण करतात. छाटणीनंतर काही अठवडे जखमा संवेदनशील असतात. छाटणीनंतर जखमातुन संक्रमण झाल्यानंतर जंतु लाकडात कायमची क्षेत्रिय लागण करतात, जिला बुरशीनाशकांच्या वापराने नष्ट करता येत नाही.


प्रतिबंधक उपाय

  • पर्यायी छाटणीच्या पद्धती वापरा जसे कि उशीरा छाटणी करणे किंवा दुबारी छाटणी करणे.
  • जास्त पावसाच्या काळात जेव्हा बीजाणू प्रसारित होण्याची शक्यता जास्त असते तेव्हा छाटणी करु नका.
  • वसंत ऋतुत मृत स्परस साठी किंवा खुज्या फुटव्यांसाठी द्राक्षाच्या मळ्यांची तपासणी करा.
  • नंतर उन्हाळ्यात, वेलीवरील कँकर्सचे भाग छाटा.
  • द्राक्षाच्या मळ्यातुन रोगट कचरा काढुन नष्ट करा.
  • वेलीची मुळे आणि फुटव्यांची वाढ संतुलित होईपर्यंत फळधारणा काही वर्ष पुढे ढकला.

प्लँटिक्स डाऊनलोड करा