पपई

फायटोफ्थोरा बुंधा व मूळकुज

Phytophthora spp.

बुरशी

थोडक्यात

  • पाने बारीक व काहीशी पिवळी पडतात, कमकुवत फळधारणा होते आणि मुळांच्या आतला भाग सडतो.
  • बुंध्याजवळचा भाग कापला असता लालसर तपकिरी बुरशी बुंध्यापासुन ते मुळापर्यंत पसरलेली दिसते.
  • कँकर्स खोडास पूर्णपणे वेढतात आणि अखेरीस झाड मरते.

मध्ये देखील मिळू शकते

8 पिके
कारले
द्राक्षे
मॅनिओक
खरबूज
अधिक

पपई

लक्षणे

बहुतेक मुळांच्या रोगांसारखीच या रोगाची लक्षणे असतात. पाने बारीक व काहीशी पिवळी पडणे, कमकुवत फळधारणा होणे आणि मुळांच्या आतला भाग सडणे ही वेलीच्या बुंध्याच्या आणि मुळांच्या सडण्याची मुख्य लक्षणे आहेत. बाधीत वेली किंवा झाडांची वाढ कदाचित खुंटु शकते आणि पाने कमी असतात तसेच ती अकाली गळु शकतात. सालींवर कुजण्याची चिन्हे दिसु शकतात आणि काही बाबतीत चिकट स्त्रावाचे थेंब दिसतात. बुंध्याजवळचा भाग कापला असता लालसर तपकिरी करपट व्रण बुंध्यापासुन ते मुळापर्यंत पसरलेले दिसतात. अखेरीस हे व्रण खोडाला वेढतात, ज्यामुळे पाणी आणि पोषक तत्वे वरच्या भागात पोहोचण्यात अडथळा निर्माण होऊन शेवटी फांद्या टोकांपासुन सुरु होऊन वाळतात. वेली किंवा झाडे हळुहळु सुकतात आणि जमिनीतुन सहजरीत्या उपटले जाऊ शकतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

बुरशीविरोधी जैविक उपचार केले जाऊ शकतात, उदा. व्रण आणि कापलेल्या जागी बोर्डो मिश्रणाने रंगविणे. प्रतिबंधात्मक उपाय त्याच द्रावणांनी केल्यास हल्ला कमी होतो. जेव्हा झाडे फारच प्रभावित होतात तेव्हा रोग बरा करता येत नाही आणि फक्त प्रतिबंधक उपायच याची गंभीरता कमी करु शकतात.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. झाड आणि वेलींना परिणामकारक उपचार करण्यासाठी सिंचनातुन बुरशीनाशके द्यावीत. पहिले लक्षण दिसताच, झाडाच्या बुडापाशी फोसेटिल अल्युमिनियम, मेटालॅक्सिल किंवा मिथिल थियोफेनेट मिथिल वर आधारीत बुरशीनाशके भरपूर सिंचनाद्वारे द्यावीत. रोगाचा प्रसार थांबविण्यासाठी प्रत्येक वापरानंतर शेतीची हत्यारे ब्लीच वापरुन निर्जंतुक करावीत.

कशामुळे झाले

फायटोफ्थोरा बुरशीच्या प्रजातींमुळे ही लक्षणे होतात. एकदा का ही बुरशी शेताला लागली तर मग ती पुष्कळ वर्षांपर्यंत जमिनीत राहु शकते आणि तिला पूर्णपणे नष्ट करणे शक्य नाही. हे जंतु विकासासाठी जमिनीच्या उच्च आद्रता पातळीवर आणि आर्द्र, उष्ण हवामानावर अवलंबुन असतात. बाधीत वेली किंवा झाडे बहुधा शेतात एखादीच किंवा एकाच जागी छोट्या गटात असतात, त्या जागी बहुतेक वेळा पाण्याचा निचरा चांगला होत नसतो, वारंवार पाणी साचत असते किंवा जास्त पाणी दिले जाते. ज्या शेतात ठिबक सिंचन पद्धती वापरण्यात येते तिथे ही लक्षणे अशा वेलींवर दिसतात जे ड्रीप्पारला लागून असतात आणि ज्यांच्या खोडावर थेट पाणी पडत असते. बाधीत सामग्री एका जागेवरुन दुसरीकडे नेण्याने, उदा. कलम करण्यासाठी या रोगाचा प्रसार होतो.


प्रतिबंधक उपाय

  • उपलब्ध असल्यास फायटोफ्थोरा बुरशीस प्रतिकारक असलेली वाण निवडा.
  • संक्रमित झाडांची सामग्री विविध शेतात, भागात नेऊ नका.
  • पाणी साचणार्यात ठिकाणी लागवड करु नका.
  • जर खोडाजवळ पाणी साचत असेल तर पाण्याचा निचरा चांगला होऊ द्या.
  • वारंवार आणि फार काळ पाणी साचणार नाही याची काळजी घ्या.
  • मुळांजवळील भागात सेंद्रिय अच्छादन (पाला पाचोळा) कायम ठेवा.
  • झाडांचे अवशेष बागेत राहू देऊ नका.
  • संतुलित खते द्या.
  • संसर्गित, झाडांचे भाग, मृत झाडे, वेली बागेतुन काढुन जाळुन टाका.
  • ज्या आंतरपिकांमुळे रोगाचा प्रसार होईल ती पिके लाऊ नका.
  • लागण झालेल्या बागेत साफसफाई केल्यानंतर वापरलेली अवजारे निर्जंतुकीकरण केल्यानंतरच दुसर्याग बागेत किंवा निरोगी भागात वापरावीत.
  • ठिबक सिंचन अशा पद्धतीने सुनिश्चित करा कि जेणेकरून पाणी थेट खोडांवर पडणार नाही.
  • जेव्हा कलम करत असता तेव्हा कलम भरण्याची जागा जमिनीपासुन वरती राहील हे सुनिश्चित करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा