द्राक्षे

फोमॉपसिस करपा

Phomopsis viticola

बुरशी

थोडक्यात

  • सुप्तअवस्थेतलीत केन पांढरे असुन त्यावर काळे ठिपके असतात.
  • पानांवर बारीक गडद तपकिरी ठिपके येत असून त्यांची किनार पिवळी असते.
  • जास्त प्रादुर्भाव झाल्यास पाने विकृत आकाराची व ठिसुळ होऊन अकाली गळु शकतात.
  • कोंबांवर, देठांवर आणि खोडावर तपकिरी ते काळे लांबट धब्बे दिसतात.
  • मणी तपकिरी रंगाची व जाड सालीची होत असून त्यावर खडबडीत काळे ठिपके येतात.
  • संपुर्ण घडच अकाली गळु शकतो.

मध्ये देखील मिळू शकते


द्राक्षे

लक्षणे

हिवाळ्यात सुप्त केन्सवर ब्लीच केल्यासारखे पांढरे भाग निर्माण होऊन त्यात बारीक काळे ठिपके दिसतात. वेलीच्या खालच्या भागातील पानांवर भरपूरसे बारीक गडद तपकिरी व पिवळी किनार असलेली ठिपके येतात. ह्या ठिपक्यांचे केंद्र सुकते आणि गळते, त्यामुळे पानांवर बंदुकीची गोळी मारल्यासारखे छिद्रे दिसतात. जास्त प्रादुर्भाव झाल्यास पाने विकृत आकाराची व ठिसुळ होऊन अकाली गळु शकतात. कोंबांवर, देठांवर आणि फुटीवर तपकिरी ते काळे लांबट किंवा पट्ट्यांचा आकार घेतात. ते बर्‍याचदा एकत्रित होतात आणि गडद काळे रंगाचे धब्बे तयार करतात जे फुटींना वेढतात किंवा त्यांना दुभंगतात, ज्यामुळे फुट वेडीवाकडी होऊन वाळून जाते. नंतरच्या काळात ह्या रोगाची लक्षणे काडीवर व मण्यांवर पण दिसून येतात. मणी तपकिरी आणि खडबडीत (कडक) होतात, आणि त्याच्या पृष्ठभागावर काळे ठिपके दिसतात. संसर्गित काडी सुकते व त्यामुळे मणी किंवा पूर्ण घड अकाली गळतो.

शिफारशी

जैविक नियंत्रण

फोमोप्सिस व्हिटिकोलावर कोणतेही पर्यायी उपचार माहितीत नाहीत. जर आपणांस ह्या रोगावरील उपचार माहिती असतील तर कृपया आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या उत्तराची वाट पहात आहोत.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. एकदा का नविन फुटींवर संसर्ग झाला तर उपलब्ध रसायने ह्या रोगाला पुरता संपवु शकत नाही पण त्याचे प्रादुर्भाव कमी करु शकतात. फ्लॉझीनाम, मँकोझेब, डिथियॉनॉन, झायरम आणि कॅप्टन अशी बुरशीनाशके ह्या रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शिफारस केलेले आहेत. जर पाऊस सतत पडत राहिला तर नविन वाढीचे संरक्षण करण्यासाठी ही बुरशीनाशके सतत वापरणे गरजेचे असते.

कशामुळे झाले

बुरशी लागण झालेल्या वेलींमध्ये (कळ्या, खोडाची साल, टणक झालेल्या मण्यात आणि केन्समध्ये) बरेच वर्षांपर्यंत जिवंत राहु शकते. वसंत ऋतुतील ओल्या आणि दमट वातावरणात ती बीजाणु तयार करते जी नंतर पाण्याने आणि पावसाचे पाणी उडण्याने त्याच वेलीवरच्या नविन वाढींवर पसरते. अधिकतम तापमान २३ डिग्री व आर्द्रता १० तासांपेक्षा जास्त वेळ टिकते अशावेळी बीजाणुंचे झुबके सोडले जातात. ह्या बुरशीमध्ये 1 ते 30 डिग्री यातील कोणत्याही तापमानांवर वाढ आणि संक्रमित करण्याची क्षमता आहे. सतत पडणारा पाऊस व थंड हवा, खास करुन फुलोर्‍याच्या आणि मणी सेटिंगच्या वेळी असल्यास ह्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येतो. ही बुरशी बहुधा वेलीतच पसरते पण एका वेलीवरुन दुसर्‍या वेलीवर पसरण्याची क्षमता ह्यांच्यात नसते. लांब अंतरावर या रोगाचा प्रादुर्भाव साधारणपणे संक्रमित कलमांची वाहतुक करून वापर केल्यामुळे होते.


प्रतिबंधक उपाय

  • वेलींवर नियमित रोगाच्या लक्षणांसाठी निरीक्षण करत चला.
  • लागण झालेल्या केनला छाटणीच्या वेळी काढा आणि खोल पुरा किंवा जाळुन टाका.
  • छाटणी करताना वेलींचे मृत किंवा लागण झालेले भाग काढुन टाका.
  • सुर्यप्रकाश प्रत्येक पानापर्यंत पोचला पाहिजे व बागेमध्ये हवा खेळती राहिली पाहिजे अशा प्रकारे कॅनोपी व्यवस्थापन केले गेले पाहिजे.
  • वेलींचे काढलेले भाग शेतात एकीकडुन दुसरीकडे नेऊ नका.

प्लँटिक्स डाऊनलोड करा