Eutypa lata
बुरशी
खोडाच्या आतील भागाची कूज होणे हे रोगाचे वैशिष्ट्यपूर्ण लक्षण आहे. जसजसा रोग वर्षानुवर्षे वाढत जातो एक किंवा जास्त फांद्या वाळत जातात, म्हणुन "मृत फांद्या" हे नाव. खोडाचा जर आडवा काप घेतला तर पाचरीच्या आकाराचे कँकर्स आत दिसतात. वाळलेल्या लाकडाच्या सालीवर काळे चट्टे निर्माण करणारी बुरशीची वाढ काही वेळा दिसुन येते. रोगामुळे पानांवर देखील लक्षणे दिसु शकतात. पिवळे चट्टे, करपट कडा आणि पाने गोळा (वाट्यासारखे) होणे हे पानावरील संभावित लक्षणात येतात. पेऱ्यातील अंतर कमी होते आणि कोंब पिवळे पडून खुंटतात. घड येतच नाहीत किंवा विकसित न होता गळतात.
बॅसिलस सबटालिसवर आधारीत बाजारातील द्रावणे छाटणीच्या जखमांवर संरक्षण म्हणुन वापरली जाऊ शकतात. कॉपरवर आधारीत उत्पाद छाटणी केलेल्या भागांवर वापरल्यास खुल्या जखमेत बुरशीच्या संक्रमणाचा प्रतिबंध होतो.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. मायक्लोब्युटानिल, थयोफेनेट-मिथाइल आणि टेट्राकोनॅझॉलचा वापर युटिपा मरसकट बरेच खोडावरील कँकर रोग नियंत्रित करण्यासाठी केला गेला आहे. छाटणीनंतर लगेच त्यांना प्रतिबंधक उपाय म्हणुन वापरले जाऊ शकते. जखमांना बुजविण्यासाठी ५% बोरिक अॅसिडला अॅक्रलिक रंगात किंवा आवश्यक तेलामध्ये मिसळुन वापरल्यासही चांगले काम होते.
युटिपा लाटा नावाच्या बुरशीमुळे रोग होतो आणि बहुधा जुन्या मळ्यात किंवा बागात दिसतो. संक्रमणाचा मुख्य स्त्रोत बुरशीचे बीजाणू आहेत जे संक्रमित खोडात रहातात. वसंत ऋतुत पावसाच्या उडणार्या पाण्याने हे बीजाणू उगतात आणि वार्याने यांचा प्रसार न उमललेल्या कळ्यांवर होतो. तिथे जखमातुन किंवा नैसर्गिक छिद्रातून आत प्रवेश करतात. एकदा लाकडाच्या आत शिरल्या कि त्यांचा प्रसार फार हळु आणि काही वर्षांपर्यंत होत रहातो, तसेच वाहक भागाला प्रभावित करु शकतो. प्रगत टप्प्यांवर, ते कोंबाला किंवा फांदीला पूर्ण वेढु शकतात ज्यामुळे वेलींच्या किंवा झाडाच्या वरच्या भागाला पाणी आणि पोषकांचे वहन बंद होते. बीजाणू उगण्यासाठी २०-२५ अंश सेल्शियसचे तापमान उत्कृष्ट आहे. युटिपा लाटा सफरचंद, पियर, अक्रोडाच्या आणि चेरीच्या झाडांनाही संक्रमित करु शकते. माऊंटन अॅश, कॉर्क ओक किंवा ब्लॅकथॉर्नसारखे हिचे भरपूर यजमान आहेत आणि संक्रमणाच्या स्त्रोताचे भांडार म्हणुन काम करु शकतात.