द्राक्षे

पानांवरील कोणेदार ठिपके

Mycosphaerella angulata

बुरशी

थोडक्यात

  • पानांवर फिकट पिवळे ठिपके दिसतात.
  • ठिपक्यांच्या केंद्रात अनियमित तपकिरी ठिपके तयार होतात.
  • पाने पिवळी होतात आणि मरगळतात.
  • पानगळीने वेलींचा जोम कमी होतो.

मध्ये देखील मिळू शकते


द्राक्षे

लक्षणे

ह्या बुरशीचा प्रादुर्भाव फक्त पानांवरच होत असतो. रोगाच्या सुरवातील बाधीत वेलींच्या पानांवर धूसर, फिकट पिवळे ठिपके जास्त करुन पानाच्या खालच्या टोकाला दिसतात. जसजसे ते आकाराने वाढतात, अनियमित तपकिरी सूक्ष्म ठिपके त्या ठिपक्याच्या केंद्रात दिसु लागतात ज्यामुळे ते कोणेदार दिसतात आणि जास्त स्पष्टही होतात. लक्षणे पानाच्या इतर भागांवरही दिसु शकतात, ज्यामुळे शेवटी पान पूर्णपणे पिवळे होते आणि मरते. जसजसा रोग वाढतो, त्याप्रमाणे मोसमाच्या शेवटी भरपूर पानगळ होते. पाने नसल्याने वेलीतील जोम कमी होतो आणि उत्पादनही कमी होऊन येणार्‍या द्राक्षांचा दर्जाही खालवतो.

शिफारशी

जैविक नियंत्रण

मयकोस्फेरेला अँगुलाटावरील कोणतेही पर्यायी उपचार आमच्या माहितीत नाहीत. जर आपणांस ह्या रोगावरील उपचार माहिती असतील तर कृपया आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या उत्तराची वाट पहात आहोत.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. पानांवरील कोनेदार ठिपक्यांचे नियंत्रण परंपरागत बुरशीनाशके मोसमाच्या सुरवातीला वेळेत आणि एका ठराविक अंतराने वापरल्यास प्रादुर्भाव टाळता येऊ शकतो.

कशामुळे झाले

रोगाची लक्षणे मयकोस्फेरेला अँगुलाटा नावाच्या बुरशीमुळे उद्भवतात. म्युस्काडाइन द्राक्षावरील (व्हिटिस रोटुंडीफोलिया) हा महत्वाचा रोग आहे पण तो इतर द्राक्षांनाही होऊ शकते. बीजाणू वार्‍याने आणि पाण्याच्या थेंबाद्वारे इतर पानांवर आणि वेलींवर पसरतात. ते पानावरील नैसर्गिक छिद्रातुन किंवा वेलीला झालेल्या जखमेतुन आत प्रवेश करतात आणि वेलींच्या ऊतींना बाधीत करतात. लागण झालेल्या पानात प्रकाशसंश्र्लेषण क्रिया फारच कमी होते, ज्यामुळे पाने गळतात, वेलींचा जोम कमी होते आणि मणी उन्हाने भाजतात. जर ह्या रोगाची लागण मणी धरायच्या आधी झाली तर लागण झालेले मणी परिपक्व होत नाहीत किंवा फार उशीरा होतात. ही बुरशी उष्ण, ओल्या परिस्थितीत खासकरुन पीक वाढीच्या काळात चांगलीच फोफावते.


प्रतिबंधक उपाय

  • जर आपल्या भागात उपलब्ध असतील तर ह्या रोगास सहनशील किंवा प्रतिरोधक जाती लावाव्यात.
  • वेलींचे रोगाच्या लक्षणांसाठी नियमित निरीक्षण करत चला.
  • चांगल्या खत नियोजन कार्यक्रमाद्वारे बाग निरोगी ठेवा.
  • मोसमाच्या अखेरीस जास्त खत देणे टाळा.
  • शेताजवळच्या जंगली म्युस्काडाइन वेली काढुन टाका.
  • सुर्यप्रकाश प्रत्येक पानापर्यंत पोचला पाहिजे व बागेमध्ये हवा खेळती राहिली पाहिजे अशा प्रकारे कॅनोपी व्यवस्थापन केले गेले पाहिजे.
  • द्राक्षाचे घड उतरवल्यानंतर वेलींचे अवशेष साफ करुन शेत स्वच्छ ठेवा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा