हरभरा

खोड आणि शेंड्याची कूज

Athelia rolfsii

बुरशी

थोडक्यात

  • पांढर्‍या, गुबगुबीत थरासारख्या, गोलाकार, गडद रचना खोडांवर आणि शेजारच्या जमिनीवर दिसतात.
  • पाने वाळतात.
  • झाड आडवी होतात किंवा वाळतात.

मध्ये देखील मिळू शकते

29 पिके
जव
द्वीदल धान्य
कारले
कोबी
अधिक

हरभरा

लक्षणे

बुरशी प्रामुख्याने खोडावर हल्ला करते, परंतु झाडाचे इतर भाग अनुकूल परिस्थितींनुसार प्रभावित होऊ शकतात. ही झाडांच्या भागांवर आणि शेजारच्या जमिनीवर झपाट्याने वाढते आणि पांढर्‍या गुबगुबीत थरासारखी दिसते ज्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण गोलाकार लालसर ते तपकिरी स्क्लेरोशिया नामक बीजाणू विकसित होतात. खोडाचा भाग फिकट तपकिरी आणि मऊ पडतो पण कोरडाच असतो. काही वेळा खोड पूर्णपणे वेढले जाते आणि पाने पिवळी पडून वाळतात. अखेरीस झाडे वाळतात किंवा आडवी होतात आणि शेतात संपूर्ण ओळी किंवा वाळलेल्या झाडांचे मोठे भाग दिसतात. नविन रोपे खासकरुन संवेदनशील असतात आणि संसर्ग झाल्यास झपाट्याने वाळतात. कधीकधी फळांवरही बुरशीचे थर दिसतात आणि ते वेगाने कुजतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

विरोधक बुरशीचा वापर (बहुधा इतर उपचारांसोबत) ह्या जंतुंना काही प्रमाणात आळा घालतो. लक्षात ठेवा परिणाम पिकाच्या प्रकारावर आणि हवामान स्थितींवर अवलंबून असतात. ट्रायकोडर्मा हार्झिनम, ट्रायकोडर्मा व्हिरीडे, बॅसिलस सबटिलिस, स्ट्रेप्टोमायसेस फिलान्थिसम, ग्लियोक्लॅडियम वायरेन्स आणि पेनिसिलियमच्या काही प्रजाती हे सामान्यपणे वापरले जाणारे जैविक कीटकनाशके आहेत.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. लागवड करण्यापूर्वी जमिनीमध्ये बहुउद्देशीय फ्युमीगंटसचा (निर्जंतुकरणासाठी धूर निर्माण करणारी सामग्री) वापर केल्यास या बुरशीला चांगल्या प्रमाणात आळा घालता येतो. मेटाम्सोडियम आधारीत उत्पादांचा उपचार गादी वाफ्यांवर किंवा किमती पीके जिथे लावली जाणार आहेत अशा ठिकाणी करावा.

कशामुळे झाले

अथेलिया रॉफ्सी ज्याला स्क्लेरोशियम रॉफ्सीही म्हटले जाते, या बुरशीमुळे लक्षणे उद्भवतात. ही बुरशी जमिनीतील झाडांच्या अवशेषात आपली सुप्तावस्था घालवते. यामुळे( मसूर, रताळे, भोपळा, मका, गहू आणि शेंगदाणे सारख्या) बऱ्याच पिकांवर रोग होतो. अनुकूल परिस्थितीमध्ये, याची अतिशय वेगाने जमिनीवर किंवा जमिनीलगतच्या भागांवर काही दिवसातच वाढ होते. जमिनीचा कमी सामू (३.0 ते ५.0), वारंवार सिंचन किंवा पाऊस, दाट लागवड आणि उच्च तापमान (२५ ते ३५ अंश सेल्सिअस) बुरशीच्या जीवनचक्राला व संक्रमणाला अनुकूल असतात. याउलट उच्च सामू आणि क्षारपट (चुनखडीयुक्त) जमिनीत सामान्यतः समस्या उद्भवत नाहीत. संक्रमण शक्यतो दुषित माती आणि पाणी, शेतीउपयोगी अवजारे आणि उपकरणे तसेच संक्रमित वनस्पती आणि पशु सामग्री (बियाणे व खते) यांच्या हालचालींवर अवलंबून असते.


प्रतिबंधक उपाय

  • प्रमाणित स्त्रोताकडील बियाणेच वापरण्याची खात्री करा.
  • उपलब्ध असल्यास प्रतिकारक वाणांची निवड करा.
  • रोगाचा इतिहास नसणार्‍या जमिनीतच ह्यांची लागवड करा.
  • बियाणांची मात्रा कमी करून लागवडीचे अंतर वाढवा.
  • उशीरा पेरल्यानेही या रोगाचा प्रादुर्भाव टाळता येतो.
  • पाण्याचा अतिरेक वापर टाळा व निचरा योग्य राहील या कडे लक्ष द्या.
  • गरज भासल्यास झाडांना सरळ ठेवण्यासाठी तार बांबूचा आधार द्या. जास्त पाणी देऊ नका कारण हे बुरशीस पूरक आहे.
  • शेतीउपयोगी हत्यारे आणि अवजारे निर्जंतुक करुन स्वच्छ ठेवा.
  • शेतांमधुन मातीची वाहतुक करणे टाळा.
  • शेत तणमुक्त राखा.
  • किमान अठवड्यातुन एकदा तरी लक्षणांसाठी शेताचे निरीक्षण करत चला.
  • रोगट रोप किंवा रोपाचे भाग दिसल्यास उपटून खोल पुरा किंवा जाळा.
  • शेतात काम करताना झाडांना इजा होऊ नये याची काळजी घ्या.
  • काळ्या रंगाचे प्लास्टिकचे आच्छादन जमिनीवर पसरून बुरशीच्या वाढीला आळा घाला.
  • जमिनीचा सामू चुना वापरून दुरुस्त करा.
  • झाडांना सशक्त बनविण्यासाठी एक चांगला खत नियोजन कार्यक्रम आखा.
  • बुरशीच्या वाढीला आळा घालण्यासाठी झाडाचे अवशेष २०-३० सें.मी.
  • खोल पुरा आणि जमिनीला उन्हात तापू द्या. यजमान नसणाऱ्या पिकांसोबत बऱ्याच वर्षांसाठी पीक फेरपालट योजना आखा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा