भुईमूग

घेवडयांच्या फांदीवरील राखाडी करपा

Macrophomina phaseolina

बुरशी

थोडक्यात

  • मरगळ, पाने लटकणे आणि पानांचे भाग पिवळे पडणे.
  • फांदी रंगहीन होऊन फिकट पिवळी होणे.
  • मुख्य मूळ कुजणे, काळ्या रंगाचे होणे, खोडाची साल फाटणे आणि अतिसूक्ष्म बु्रशीचे जंतु बाहेर आणि आतुन असणे.

मध्ये देखील मिळू शकते


भुईमूग

लक्षणे

ह्या रोगाची लक्षणे जास्तकरुन फुले आल्यानंतरच्या टप्प्यांवर पाहिली जातात. ती सुरवातीला रोपाच्या वरच्या भागात सीमित असतात आणि त्यात पाने लटकणे, देठांचेआणि पानांचे भागा पिवळे पडणे येते. प्रभावित रोपाची खालील पाने आणि खोड बहुधा फिकट पिवळ्या रंगाचे असते आणि काही बाबतीत तपकिरीसर असते. मुख्य मूळ, कूजीची लक्षणे दर्शवित काळे पडते आणि बहुतेक आडवी, दुय्यम मुळे आणि उपमुळे नसतात. मृत भागांमुळे मूळे फार ठिसुळ होतात आणि खोडाची साल फाटते. जर रोपाला उपटण्याचा प्रयत्न केला तर ते सहज तुटते आणि मुख्य मुळाचा खालील भाग जमिनीतच रहातो. खोडाचा मधला भाग जर उभा चिरला तर आत अतिसूक्ष्म काळे बुरशीचे भाग खोडाच्या सालीच्या आतल्या बाजुला आणि आतील भागातही दिसतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

ट्रायकोडर्मा व्हिरिडे, स्युडोमोनाज फ्ल्युरेसेन्स आणि बॅसिलस सबटिलिस सारख्या जैव नियंत्रक घटकांनी बियाणांचे उपचार केल्यासही रोगाच्या व्यवस्थापनात काही फायदे दिसुन आले आहेत.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. थियोफेनेट मिथाइल आणि व्हिटावॅक्स बुरशीनाशकांनी बियाणांचे उपचार केल्यास कोरडी मूळे परिस्थिती चांगलीच कमी झाली. कप्तान, थिराम किंवा बेनलेटने बियाणांचे उपचार केल्यानेही (सहसा ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे) रोग कमी होण्यात मदत होते.

कशामुळे झाले

हा मातीजन्य रोग असुन तो जमिनीत रहाणार्‍या बुरशीच्या धाग्यांनी किंवा मॅक्रोफोमिना फॅसियोलिनाच्या बीजाणूंमुळे होतो. जेव्हा सभोवतालचे हवामान २५-३० डिग्री सेल्शियस असते तेव्हा अचानकपणे लक्षणे उमटतात. तोपर्यंत बुरशीने रोपाच्या बहुतेक भागात घर केलेले असते आणि हळुहळु त्यांचे नुकसान केलेले असते. वाढत्या तापमानाबरोबर आणि जास्त वारंवार आर्द्रतेच्या ताणाने, मॅक्रोफोमिना फॅसियोलिनाची गंभीरता खासकरुन उष्णकटिबंधातील आर्द्र भागात जास्त वाढते. फुले आणि शेंगा धरायच्या वेळी दिवसाचे ३० डिग्री सेल्शियसचे किंवा जास्त उच्च तापमान आणि कोरडी जमिन ह्यामुळे रोगाची गंभीरता वाढते. बुरशीच्या विश्रांती घेणार्‍या रचनांना स्क्लेरोशिया म्हणतात ती काही वेळा जमिनीत ६ वर्षांपर्यंतही राहू शकतात.


प्रतिबंधक उपाय

  • पक्व होताना उच्च तापमान टाळण्यासाठी लवकर पक्व होणारे वाण लवकर लावा, ज्यामुळे संक्रमण कमी होते.
  • शेताचे रोगाच्या लक्षणांसाठी नियमित निरीक्षण करा.
  • ३ वर्षांसाठी पिक फेरबदल केल्यास जमिनीत विश्रांती घेत असलेल्या रचना कमी होतात.
  • खोल नांगरा आणि शेतातुन पिकांचे अवशेष काढुन नष्ट करा.
  • रोपणीपासुन शेंगा भरेपर्यंत शेतजमिनीत चांगले सिंचन करुन आर्द्रता राखा पण जास्त पाणी देणे टाळा.
  • रोगाच्या घटना टाळण्यासाठी खत दरही जास्त देऊ नका.

प्लँटिक्स डाऊनलोड करा