लिंबूवर्गीय

लिंबूवर्गीय पिकावरील डिंक्या रोग

Phytophthora spp.

बुरशी

थोडक्यात

  • झाडाच्या सालीवर गडद पाणी शोषल्यासारखे भाग जमिनीपासुन दिसतात.
  • कोरड्या हवामानात सालीवरील भेगातुन पाण्यात विरघळणारा डिंकासारखा द्राव झिरपतो.
  • जमिनीखालील साल पाणी शोषलेली, बिळबिळीत आणि लालसर तपकिरी ते काळी असते.
  • करपट भाग आतील भागांपर्यंत पोचतात आणि सालीला वेढतात ज्यामुळे झाड कोलमडते.

मध्ये देखील मिळू शकते


लिंबूवर्गीय

लक्षणे

बुंधा कूज किंवा डिंक्या रोगाची लक्षणे शक्यतो जमिनीजवळील भागापासुन दिसायला सुरुवात होते. गडद पाणी शोषलेले भाग सालीवर तयार होतात आणि आर्द्र हवामानात त्यातुन आंबट वास सुटतो. खासकरुन कोरड्या हवामानात सालींवरील आडव्या भेगातुन पाण्यात विरघळणारा डिंकासारखा द्राव झिरपतो. जमिनीखालची साल पाणी शोषल्यासारखी, बिळबिळीत, लालसर तपकिरी किंवा नंतरच्या टप्प्यावर काळी होते. तपकिरी करपट भाग खोडाच्या आतील भागांपर्यंत पोचतात. पाने पोषण न मिळाल्याने पिवळी पडतात. कालांतराने मर झालेली साल कोरडी होते, आक्रसते आणि भेगाळते आणि तुकडे गळुन पडतात, ज्यामुळे सालीखालचा भाग उघडा पडतो. जर बुरशीने सालीला वेढले तर झाडे कोलमडून मरु शकतात. संक्रमित फळांवर मऊ तपकिरी कूज विकसित होते ज्यातुन अखेरीस वैशिष्ट्यपूर्ण उग्र वास येतो.

शिफारशी

जैविक नियंत्रण

बियाणे गरम (साधारण ४९ डिग्री) पाण्यात ४-१० मिनीटे बुडवुन ठेवल्यास बियाण्यातील संसर्गाचा नायनाट होतो. सूक्ष्म सिंचनात क्लोरीन घातल्यास फायटोप्थोराचा संसर्ग परिणामकारक रीतीने कमी होतो. काही बुरशी किंवा जिवाणूच्या प्रजाती (ट्रायकोडर्मा प्रजाती आणि बासिलस प्रजाती) हे फायटोप्थोराच्या नियंत्रणाच्या परिणामकारकतेसाठी तपासले गेले आहेत. सुरुवातीच्या काळात रोग नियंत्रणासाठी कॉपर बुरशीनाशके देखील वापरली जाऊ शकतात.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. मेटालॅक्झिल आणि फॉसेटिल अल्युमिनियम असलेल्या बुरशीनाशकाचे उपचार बुरशीचे जैविक नियंत्रण आणि प्रतिबंध करण्यास पूरक असुन परिणामकारक आहेत. फॉसेटिल अल्युमिनियमचा फवारणी द्वारे आणि मेटालॅक्झिलचा आळवणीद्वारे वापराने खूप चांगले परिणाम दर्शविले आहेत. काढणीच्या आधी घेतलेल्या फवारण्या आणि काढल्यानंतर बुडविण्याचे उपचार आणि / किंवा औषध लावलेल्या आवरणाचा वापर करण्याची शिफारस केलेली आहे.

कशामुळे झाले

फायटोप्थोरा बुरशीच्या विविध प्रजांतीमुळे ही लक्षणे उद्भवतात. ही बुरशी मोठ्या संख्येने पाण्यात रहाणारे बीजाणू सोडते जे अनुकूल हवामानात (उच्च आद्रता आणि वाढलेले तापमान) पोहत थोड्या अंतरापर्यंत जाऊ शकतात. हे बीजाणूच या रोगाचे संक्रमण करतात जे पावसाने किंवा झाडाच्या मुळाशी सिंचन केलेल्या पाण्यामुळे वाहुन पोचतात. ते उबुन मुळांच्या टोकातुन शिरकाव करतात ज्यामुळे पूर्ण मूळ सडते व कालांतराने इतर मुळांवर पसरते. जेव्हा बीजाणू जखमेत किंवा खोडाच्या खालच्या बाजुच्या सालीच्या भेगेत पाण्याद्वारे उडतात तेव्हा बुंधा कूज किंवा डिंक्या रोगाची लागण होते. झाडाची संवेदनशीलता, फायटोप्थोराची कोणती प्रजाती उपस्थित आहे यावर अवलंबुन असते आणि त्यावेळच्या हवामान परिस्थितीचाही (जमिनीचा प्रकार, पाण्याची उपस्थिती) खूप जास्त परिणाम होतो.


प्रतिबंधक उपाय

  • प्रमाणित स्त्रोताकडील बियाणेच वापरा.
  • बागेसाठी प्रतिकारक किंवा सहनशील वाण निवडा.
  • रोपवाटिकेत पाण्याचा निचरा चांगला होईल याची काळजी घ्या.
  • शेतीउपयोगी हत्यारे आणि अवजारे वापरण्यापूर्वी निर्जंतुक करण्याची काळजी घ्या.
  • रोगापासून नुकसान टाळण्यासाठी उंचवटलेल्या वाफ्यांवर लागवड करा.
  • खोडाच्या बुडाजवळ इजा होऊ नये याची काळजी घ्या.
  • झाडावरील किंवा आजुबाजुचा वाळलेला किंवा संक्रमित पालापाचोळा, फांद्या वगैरे अवशेष लगेच काढा.
  • नियमितपणे अगदी पहिल्या आडव्या मुळापासुन या रोगाच्या लक्षणांसाठी बागेचे निरीक्षण करा.
  • सिंचनाचे पाणी, झाडाचे खोड यांचा संपर्क देऊ नका.

प्लँटिक्स डाऊनलोड करा