Diaporthe citri
बुरशी
मेलॅनोजची लक्षणे लालसर तपकिरी ते गडद तपकिरी ठिपके (०.२ - १.५ मि.मी. मापाचे) फळे पिकण्याच्या उशीराच्या टप्प्यात दिसतात. फळाच्या सालीवरील तैल गंथींच्या आजुबाजुला हे ठिपके येतात. संक्रमित भागांना जखमा होणे आणि भेगा पडणे हे संसर्गाच्या प्रक्रियेत सामान्य आहे. फळे बारीक पडतात किंवा अकाली गळतात. इतर रोगांमुळे असेच पडलेल्या ठिपक्यांच्या विरुद्ध मेलॅनोजचे ठिपके स्पर्श केल्यास खडबडीत असतात. पूर्ण पिकलेली फळे या जंतुमुळे सडतात जे विशेषत: देठापासुन विकसित होतात आणि त्यामुळे फळे गळु शकतात. पानांवरील लक्षणे पहिल्यांदा बारीक तपकिरी ठिपक्यांच्या स्वरुपात दिसतात जे नंतर वाढुन उंचवट्यासारख्या पुटकुळ्या होतात व त्यामध्ये लालसर तपकिरी चिकट द्राव असतो. ह्या पुटकुळ्या बहुधा पिवळ्या किनारीने वेढलेल्या असतात, अखेरीस बारीक टणक खरबडीत खपलीसारख्या दिसतात. साठवणीत असताना देठाकडील कुज होऊ शकते.
ऑरगॅनिक कॉपर मिश्रणांची फवारणी या बुरशीच्या नियंत्रणासाठी करा. पहिली फवारणी पाकळ्या गळण्याच्या सुमारास आणि दुसरी फवारणी ६-८ अठवड्यांनी करा.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. पायरॅक्लोस्ट्रोबिनचा वापर वसंत ऋतुत केल्यास फळांवरील मेलॅनोज बुरशीविरुद्ध परिणामकारक ठरले आहे. मँकोझेब आणि फेनब्युकोनाझोलवर आधारीत उत्पादांचीसुद्धा शिफारस केली जात आहे. स्ट्रोबिल्युरिन बुरशीनाशकेसुद्धा वापरल्यास चांगला परिणाम देतात.
मेलॅनोज हा सडविणारा जंतु आहे, ज्याचे जीवनचक्र मृत फांदीवर संपते. या रोगाची गंभीरता झाडाच्या मृत अवशेषावर बुरशीची किती वाढ झाली आहे आणि पावसानंतर किंवा तुषार सिंचनानंतर किती काळ सतत ओलावा राहिला आहे त्यावरुन निर्धारीत केली जाते. या बुरशीची लागण १८-२४ तास ओलेपणा आणि २०-२४ डिग्री सेल्शियसचे तापमान असल्यास होते. संक्रमणाची समस्या बीजाणूमुळे होऊ शकते जेव्हा झाडावरील मृत अवशेष छाटले नाहीत, जमिनीवरुन पालापाचोळा, मृत फांद्या काढल्या नाहीत किंवा हा कचरा एकत्र करुन जवळपास साठविला गेला असेल तेव्हा होते.