Phoma tracheiphila
बुरशी
लक्षणे पहिल्यांदा एकेकट्या फांदीवर किंवा भागात दिसतात आणि जर वेळीच उपाय केले नाहीत तर पूर्ण झाडावर पसरु शकतात आणि त्यामुळे झाड वाळू शकते. पहिले लक्षण वसंत ऋतुमध्ये कोंब आणि पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो व कालांतराने फांद्या वाळू लागतात. मरगळलेल्या फांद्यांवर उंचवटलेले काळे पुटकुळे किंवा राखेसारख्या राखाडी रंगाचे भाग दिसल्यास ते डाग बीजाणूच्या पुंजक्यांचे असतात. मोड आणि मुनवे अनुक्रमे संक्रमित फांद्याच्या व मातृवृक्षाच्या मुळाशी वाढणे हि लक्षणे यजमान पिकात सामान्यपणे आढळतात. जर संक्रमित फांद्या किंवा खोडाचे लाकुड कापले किंवा साल काढली तर लाकडात वैशिष्ट्यपूर्ण केसर-गुलाबी किंवा नारंगी-लाल रंगहीनता पाहिली जाऊ शकते. ही अंतर्गत लक्षणे या शिरातुन पाझरलेल्या चिकट द्रावाशी संबंधित आहेत.
कॉपरवर आधारीत बुरशीनाशकांचा वापर या जंतुंविरुद्ध केला जाऊ शकतो. संवेदनशील काळ म्हणजे शरद ऋतुपासुन ते वसंत ऋतुपर्यंत संरक्षक कॉपर बुरशीनाशके वारंवार झाडावर वापरली गेली पाहिजे. स्युडोमोनास जिवाणू उदा स्युडोमोनाज फ्ल्युरोसन्स आणि स्युडोमोनाज प्युटिडा जे मूळ पसरणाऱ्या भागात रहातात, ते फोमा ट्रॅचिफिलाच्या वाढीस नियंत्रित करतात.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. झायरम (झिंक डाय मिथिल डाय कार्बामेट) वर आधारीत उत्पाद फोमा ट्राचिफिलाच्या नियंत्रणात अतिशय परिणामकारक आहेत. कार्बॉक्झिन आणि बेन्झिमिडॅझॉल सारखे अंतरप्रवाही उत्पाद देखील प्रतिबंधक उपचार म्हणुन परिणामकारक आहेत. गोठणारे तापमान, गारपिट किंवा वादळ ज्यामुळे झाडाला जखमा होऊ शकतात, अशा हवामानानंतर संरक्षक आणि अंतरप्रवाही बुरशीनाशकांच्या वापराची शिफारस करण्यात येत आहे.
पान, फांद्या आणि मुळांतील जखमेतुन ही बुरशी आत शिरकाव करते. बीजाणू पाणीजन्य मानले जातात. बुरशी चार महिन्यांपेक्षा अधिक काळ मातीमध्ये संक्रमित फांद्यात टिकून राहू शकते. अनेक अठवड्यांपर्यंत संक्रमणाचा हा महत्वाचा स्त्रोत असु शकतो. झाडावरुन आणि पालापाचोळ्यातुन बीजाणू पावसाच्या उडणार्या पाण्यामुळे आणि तुषार सिंचनामुळे पसरतात. काही बीजाणू वार्याबरोबरही वाहुन जातात. बुरशीचे वहन स्त्रोतापासुन बहुधा १५-२० मी असे लहान अंतरावरच होते. तरीपण वाहत्या वार्याच्या दिशेने वहन होत असल्यास हे अंतर थोडे जास्त होऊ शकते. १४ ते २८ डिग्री सेल्शियस तापमानात ज्यातही जास्त करुन २०-२५ डिग्री सेल्शियस तापमान स्थिर राहिल्यास या बुरशीची लागण होते.