लिंबूवर्गीय

लिंबूवर्गीय पिकावरील तेलकट डाग

Mycosphaerella citri

बुरशी

थोडक्यात

  • जुन्या पानांवर, पिवळे ते गडद तपकिरी रंगाचे ठिपके येतात व त्यांच्या सभोवतालचा भाग पिवळा असतो.
  • पानांच्या खालच्या बाजुने काहीसे उंचवटलेले फिकट नारिंगी ते पिवळसर तपकिरी पुटकुळ्या (फोड) पाहिल्या जाऊ शकतात.
  • कालांतराने दोन्ही बाजुची लक्षणे गडद तपकिरी होतात आणि जास्त 'तेलकट' दिसतात.
  • संक्रमित झाडांची पाने हळुहळु गळतात ज्यामुळे झाडाचा जोम आणि फळ उत्पादन कमी होते.
  • फळाच्या सालीवर तेलकट डागाचे धब्बे दिसतात.

मध्ये देखील मिळू शकते


लिंबूवर्गीय

लक्षणे

कोणत्या जातीचे पीक आहे याप्रमाणे लक्षणांचा जोर आणि पैलुत थोडा बहुत बदल होऊ शकतो पण तरीही व्यवहारिक दृष्ट्या थोडेफार तरी नुकसान नक्कीच होते. लक्षणे पहिल्यांदा जुन्या पानांच्या वरच्या बाजुला पिवळे ते गडद तपकिरी डाग आणि त्या सभोवताली पिवळे भाग अशी दिसतात. या डागांच्या खालच्या बाजुने काहीसे उंचवटलेले फिकट नारिंगी ते पिवळसर तपकिरी पुटकुळ्या (फोड) पाहिल्या जाऊ शकतात. कालांतराने दोन्ही बाजुची लक्षणे गडद तपकिरी होतात आणि जास्त 'तेलकट' दिसतात. संक्रमित झाडांची पाने हळुहळु गळतात ज्यामुळे झाडाचा जोम आणि फळ उत्पादन कमी होते. फळांवर तेलकट डागांचे वैशिष्ट्य आहे बारीक करपट काळे डाग ज्यांच्या सभोवताली हिरवा भाग असतो, ह्या लक्षणाला सालीवरील तेलकट डागांचे धब्बे असे म्हणतात. हे फळाच्या पृष्ठभागाचा खूप जास्त भाग व्यापु शकतात. जिथे उच्च तापमान आणि जास्त पाऊस पडतो तिथे हा संसर्ग केव्हाही होऊ शकतो.

शिफारशी

जैविक नियंत्रण

मायकोस्फेरेला सिट्रीविरुद्ध कोणतेही पर्यायी उपचार माहितीत नाहीत. जर आपणांस ह्या रोगावरील उपचार माहिती असतील तर कृपया आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या उत्तराची वाट पहात आहोत.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. उन्हाळ्याच्या काळात पेट्रोलियम तेलाचा एकदा किंवा दोनदा वेळीच केलेला वापर बहुधा तेलकट डाग तयार करणार्‍या बुरशीचे नियंत्रण करतो. ह्यामुळे बीजाणूंना पान आणि फळात आत प्रवेश करण्यास प्रतिबंध होतो आणि त्यामुळे जरी जंतु पानांवर रहात असले तरी लक्षणेही उशिरा दिसतात. कॉपर किंवा कॉपर सल्फेट असलेले उत्पाद सामान्यत: तेलात मिसळुन वापरले असता पानांवरील आणि फळांवरील लक्षणांचे यशस्वीपणे नियंत्रण होते. इतर बुरशीनाशकेही (उदा. स्ट्रोबिल्युरिन्स) याआधी वापरली गेली आहेत पण काही वेळा त्यांच्या बाबतीत प्रतिकार निर्माण झालेला आढळुन आला आहे.

कशामुळे झाले

मायकोस्फेरेला सिट्री नावाच्या बुरशीमुळे ही लक्षणे उद्भवतात जी जेव्हा इतर कोणतेही अनुकूल पीक उपलब्ध नसते तेव्हा जमिनीवर पडलेल्या पिकाच्या अवशेषात जगते. वसंत ऋतुमध्ये जेव्हा हवामान अनुकूल असते, तेव्हा बुरशी बीजाणू तयार करते ज्यांना पावसाचे थेंब, तुषार सिंचन किंवा जास्त पडणारे दव वाहुन नेतात. वारासुद्धा त्यांना इतर लिंबुवर्गीय बागात वाहुन नेऊ शकतो. एकदा का ती पानाच्या खालच्या बाजुवर पडली, कि ती उबतात आणि बुरशी सावकाशपणे पानांच्या नैसर्गिक छिद्रातुन आत प्रवेश करते. या प्रक्रियसही वाढलेले तापमान, उच्च आर्द्रता आणि जास्त काळ ओली रहाणारी पाने फारच अनुकूल असतात. प्राथमिक संसर्ग उन्हाळ्यात झाल्यानंतर पहिले लक्षण हिवाळ्यात दिसण्यास खूप महिने जातात. ह्या उलट थंड तापमान आणि कोरडी हवा बीजाणूची संख्या कमी करते ज्यामुळे संसर्गही कमी होतो. जर तापमान बुरशीला अनुकूल असेल तर झाड वाढण्याच्या सर्व टप्प्यात पाने या बुरशीला संवेदनशील रहातात. झाडावरील लाल कोळ्याची उपस्थिती देखील या रोगाशी निगडित आहे.


प्रतिबंधक उपाय

  • ज्या ठिकाणी तेलकट डाग यापुर्वी आलेले आहेत अशा ठिकाणी लिंबुवर्गीय पिकांची लागवड टाळा.
  • शेताचे या रोगाच्या कोणत्याही लक्षणासाठी उदा.
  • झाडाचा घनदाटपणा आणि पानगळ, निरीक्षण करा.
  • तुषार सिंचन टाळा.
  • पिकाचे अवशेष, पडलेली पान व फळे शेतातुन काढुन टाका.
  • जमिनीतील पालापाचोळा लवकर कुजण्यासाठी काढणी झाल्यानंतर चुन्याचा आणि जास्त सिंचनाचा वापर करा.
  • किंवा बुरशीची वाढ कमी करण्यासाठी युरियाचा वापर करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा