Elsinoe fawcettii
बुरशी
लक्षणे झाडाची जात आणि हवामान परिस्थितीप्रमाणे बदलतात. प्रथमतः कोवळ्या पानांवर पाणी शोषल्यासारखे डाग बहुधा येतात. ते वाढुन दुधाळ पिवळे किंवा चकचकीत रंगाच्या पुटकुळ्या (फोडे) पानांच्या दोन्ही बाजुंनी दिसतात. जसजसा रोग वाढत जातो तशा या पुटकुळ्या अनियमित, शंकुच्या आकाराच्या आणि तपकिरी, मखमलीसारख्या खपल्यांच्या होतात ज्या पानाचा मोठा भाग आच्छादतात. जुन्या डागांवर खडबडीत पृष्ठभाग दिसतो आणि त्यावर चिरा आणि भेगा गेलेल्या दिसतात. संक्रमित पाने विकृत, सुरकुतलेली किंवा चुरमडलेली आणि फाटलेल्या कडांची असतात. कोवळ्या फांद्या, कोंब आणि देठांवरही हीच लक्षणे दिसतात. खुजी आणि झुडपासारखी वाढ ही दोन सामान्य वैशिष्ट्ये आहेत. जास्त संक्रमण झाल्यास बहुधा पानगळ होते. फळांवर या पुटकुळ्या (फोड) किंचित उंचवटलेल्या आणि गुलाबी ते तपकिरी रंगाच्या असतात. जसजशा त्या जुन्या होतात त्यांत दाट मश्श्यासारख्या खपल्या भरतात आणि त्या पिवळसर तपकिरी किंवा राखाडी रंगाच्या होतात.
ह्या बुरशीसाठी कोणतेही जैविक उपचार उपलब्ध नाहीत. कॉपरवर आधारीत प्रमाणित सेंद्रीय बुरशीनाशके नविन लागण होण्यास आणि बुरशी पसरण्यास प्रतिबंध करतात. कॉपर जर योग्य रीतीने वापरले गेले नाही तर विषारी असु शकते म्हणुन जास्त काळजी घेतली पाहिजे.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. थायरम, डायफेनोकोनाझोल आणि क्लोरोथॅलोनिलवर आधारीत सुरक्षात्मक बुरशीनाशकांच्या प्रतिबंधक वापराने ह्या रोगाचा विस्तृत संसर्ग होण्यापासुन टाळले जाऊ शकते. अंतरप्रवाही बुरशीनाशके हा आणखी एक पर्याय आहे. बुरशीनाशकास सहनशील असणार्या जंतुंच्या जातीपण सापडल्या आहेत.
एलसिनो फॉसेटी आणि एलसिनो ऑस्ट्रालिस नावाच्या बुरशींमुळे ही लक्षणे उद्भवतात, हीच लक्षणे लिंबुवर्गाच्या इतर प्रकारांतही ह्याच बुरशीमुळे आढळतात. लिंबु, द्राक्ष, मँडेरिनची पिके या दोन्ही बुरशीला संवेदनशील आहेत. एलसिनो फॉसेटिल फक्त आंबट नारंगींना आणि काही प्रकारच्या गोड नारंगींनाही संक्रमित करते. ह्याउलट एलसिनो ऑस्ट्रालिस गोड नारंगी आणि मोसंबीला संक्रमित करते पण आंबट नारंगी तिच्या यजमानात येत नाही. पानांवर गुलाबी ते तपकिरी रंगाची टोक शंकुसारख्या रचनेत दिसतात आणि फळात मश्श्यासारखी रचना दिसते ते बीजाणू असतात जे पावसाचे पाणी उडण्याने, दवाने, वार्याने किंवा तुषार सिंचनामुळे पसरतात. लिंबूवर्गीय पिकावरील खपली या दोन बुरशींमधील एलसिनो फॉसेटिल हा जास्त पसरलेला आहे पण एलसिनो ऑस्ट्रॅलिस आर्थिकदृष्ट्या अधिक लक्षणीय आहे कारण तो लिंबूवर्गीय प्रजातींवर हल्ला करतो ज्यांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.