Colletotrichum gloeosporioides
बुरशी
पानावर जवळपास गोलाकार फिकट गव्हाळी रंगाचे ठिपके दिसतात ज्यांच्या कडा ठळक जांभळ्या असतात. या ठिपक्यांची केंद्रे कालांतराने राखाडी होतात आणि संक्रमणाच्या नंतरच्या टप्प्यावर, बारीक काळे विखुरलेले ठिपके दिसतात. पर्यावरणीय घटकांमुळे (किड्यांनी केलेल्या किंवा इतर जखमांमुळे) जख्मी झालेले भाग अँथ्रॅकनोज बुरशीला घर करण्यासाठी संवेदनशील असतात. फळांवर ऊन, रसायनिक भाजणे, किड्यांमुळे, जखमा झालेल्या असल्यास किंवा साठवणीच्या जागी हवामान विपरित असल्यास खासकरुन अँथ्रॅकनोज बुरशीच्या विकासास संवेदनशील असतात. फळांवरील लक्षणे आहेत घट्ट, तपकिरी ते काळे सुमारे १.५ मि.मी. किंवा थोड्या मोठ्या व्यासाचे डाग येतात. डागांवर वाढणारे बीजाणूंचे पुंजके बहुधा तपकिरी ते काळे असतात पण आर्द्र हवामानात ते गुलाबी ते केशरी रंगाचे होऊ शकतात.
अनुकूल हवामानात बॅसिलस सब्टिलिस किंवा बॅसिलस मायलोलिकफेसियेन्सवर आधारीत जैविक बुरशीनाशकांचे उपचारही चांगले असतात. बियाणांवर किंवा फळांवर गरम पाण्याचे (४८ डिग्री सेल्शियस तापमानाचे २० मिनीटांसाठी) उपचार केल्यासही राहिलेल्या बुरशीचा नाश होतो आणि रोगाचा प्रसार शेतात किंवा वहनात होत नाही. कॉपर सल्फेट असणार्या बुरशीनाशकांची फवारणी किंवा बीज प्रक्रिया केल्यास संक्रमणाची जोखीम कमी होते.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. अझोक्सीस्ट्रोबिन किंवा क्लोरोथॅलोनिल असणार्या बुरशीनाशकांची फवारणी नियमितपणे केल्यास संक्रमणाची जोखीम कमी होते. या मिश्रणांनी बीज प्रक्रिया केली असता देखील परिणाम चांगले मिळु शकतात. शेवटी काढणी केल्यानंतर परदेशातील बाजारात पाठवणी करण्यासाठी बुरशीनाशकांबरोबर खाद्यप्रतीचे मेण लावल्यास देखील फळांवरील संक्रमणाच्या घटना कमी होतात.
झाडीतील वाळलेल्या फांद्यांवर अँथ्रॅकनोज वाढते आणि पावसाच्या पाण्याचे उडणारे थेंब, जास्त दव आणि तुषार सिंचनाने ती लहान अंतरावर पसरते. या प्रकारे ती कोवळे पान आणि फळाच्या संवेदनशील भागात पोचते आणि वाढीस लागते, ज्यामुळे लक्षणे उद्भवतात. पान आणि फळांवरील वाढणार्या कामरचनेत नविन बीजाणू तयार होतात. हे बीजाणू हवेत उडतात आणि रोगाचा प्रसार लांब अंतरावर करतात. एकादा का बीजाणू उगवले कि ते विश्रांती स्थान तयार करतात आणि झाडाला किंवा फळाला जखम होईपर्यंत किंवा काढणीनंतर फळांचे उपचार (उदा. ताजे ठेवण्यासाठी) होईपर्यंत त्यात सुप्तावस्थेत रहातात. बुरशीच्या चांगल्या वाढीसाठी अतिउच्च आर्द्रता आणि २५-२८ डिग्री सेल्शियसचे तापमान चांगले असते पण बहुधा २०-३० डिग्री सेल्शियस तापमानात संक्रमण वाढु शकते.