Alternaria alternata
बुरशी
सुरवातीला कोवळ्या पानांवर बहुधा कडांच्या बाजुला बारीक तपकिरी ते काळे ठिपके उमटतात नंतर त्याभोवती ठळक पिवळी प्रभावळ तयार होते. ठिपके नंतर वाढुन अनियमित किंवा गोलाकार करपट भागात रुपांतरित होतात व पानाचा मोठा भाग व्यापतात. करपटपणा आणि पिवळेपणा शीरांच्या समांतर वाढु शकतो. डाग सपाट असतातआणि पानांच्या दोन्ही बाजुला आढळून येतात. जुन्या डागांच्या मध्यावर खरबडीत भाग तयार होतो. कोवळ्या फळांत पिवळ्या प्रभावळीसकट थोडे खोलगट गडद भाग तयार होतात. तयार फळांच्या सालीवर जाड व वाळलेल्या पदार्थांचे भागाचे आच्छादन येते जे सालीतुन उमटल्यासारखे दिसते. जर जाड व वाळलेल्या पदार्थांचे भाग गळले, तर खड्डे किंवा देवीच्या व्रणांसारखे दिसते. फळे अकाली गळणे सर्वसामान्यपणे आढळून येते.
कॉपर ऑक्झिक्लोराइडवर आधारीत जैविक बुरशीनाशके अल्टरनेरिया तपकिरी ठिपक्यांविरुद्ध चांगले परिणाम देतात. जर आपल्याकडे या रोगावरील इतर खात्रीलायक उपचार असल्यास कृपया आमच्याशी संपर्क साधा.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. ईप्रोडियॉन, क्लोरोथॅलोनिल आणि अॅझॉक्सिस्ट्रोबिनवर आधारीत बुरशीनाशके अल्टरनेरिया तपकिरी ठिपक्यांचे चांगले नियंत्रण करतात. प्रॉपिकोनेझोल आणि थायोफेनेट मिथिलवर आधारीत उत्पादही चांगलेच परिणाम देतात. बुरशीमध्ये प्रतिकार निर्माण होऊ नये म्हणुन बुरशीनाशकांचा विविध प्रकारे वापर करताना दिलेल्या ठराविक तीव्रतेचे पालन करणे गरजेचे आहे.
अल्टरनेरिया अल्टरनेटा नावाच्या बुरशीमुळे ही लक्षणे उद्भवतात. या रोगाचा तरंगणार्या बीजाणूंच्या वारा किंवा पाण्याच्या थेंबांच्या उडण्यासह प्रसार होतो. पाऊस किंवा सापेक्ष आर्द्रतातील अचानक बदल फांद्या, पान किंवा फळावरील ठिपक्यात असलेल्या बुरशीजन्य संरचनांपासून बीजाणूंच्या उत्पादनात आणि त्यांना सोडण्यास अत्यंत पूरक असतात. अल्टरनेरिया तपकिरी ठिपक्यांचे संक्रमण रोपवाटिकेतील मालाच्या मानवांद्वारे वहनाने होते. कोवळ्या पानांवर लक्षणे पहिल्यांदा संक्रमणानंतर सुमारे ३६ ते ४८ तासात निदर्शनात येतात. पाकळ्या गळल्यानंतर सुमारे ४ महिन्यापर्यंत फळे या संक्रमनास संवेदनशील असतात.