हरभरा

अस्कोचायटा करपा

Didymella rabiei

बुरशी

थोडक्यात

  • पान, फांद्या किंवा शेंगांवर पाणी शोषल्यासारखे भाग दिसतात.
  • हे डाग तपकिरी होतात पानांवरील डागात केंद्रीत वर्तुळे विकसित होतात.
  • शेतात दुरवरुनही करप्याचे भाग दिसतात.

मध्ये देखील मिळू शकते

3 पिके

हरभरा

लक्षणे

जुन्या झाडात रोगाचे लक्षण पहिल्यांदा पानांवर पाणी शोषल्यासारखे फिकट ठिपके येण्याने दिसते. कालांतराने हे डाग तपकिरी होतात आणि त्याच्या मध्यावर काळे छोटे ठिपके येऊ लागतात ज्यामुळे गडद किनारींसह केंद्रीत वर्तुळे दिसतात. लांबुडके ते लंबगोलाकृती तपकिरी डागांसह काळे ठिपके खोडावरही येतात. गंभीर बाबतीत, ते पूर्ण वेढले जातात आणि विपरित हवामानात तुटुन पडतात. शेंगांवरील डाग पानांवरील डागांसारखेच दिसतात. पूर्ण झाडच करपते, ज्यामुळे शेतात तपकिरी भाग दिसतात. बियाणे संक्रमित होऊ शकतात आणि रोग नविन रोपात नेतात ज्यामुळे खोडाच्या बुडावर गडद तपकिरी डाग येतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

अॅस्कोचायटा रॅबियी करपाच्या बुरशीविरुद्ध कोणतेही पर्यायी उपचार माहितीत नाहीत, माफ करा. जर आपणांस ह्या रोगावरील उपचार माहिती असतील तर कृपया आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या उत्तराची वाट पहात आहोत.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. बियाणांवर थिराम किंवा थिराम + थियाबेंडाझोल चा लेप पेरणीपूर्वी दिला जाऊ शकतो. प्रतिबंधक बुरशीनाशके (उदा. क्लोरोथॅलोनिल) चा वापर रोगाचा विकास टाळण्यासाठी फुलधारणेच्या काळात केला जाऊ शकतो. एकदा का रोगाचे निदान झाले कि मग पानांवरील बुरशीनाशकांचा वापर आंतरप्रवाही प्रकारच्या पद्धतीने करण्याची शिफारस करण्यात येते (बॉस्कॅलिड,मँकोझेब,पायराक्लोस्ट्रोबिन + फ्लयूक्सापायरोक्झॅड किंवा ट्रायाझोलिनथियोन वर्गातील उत्पाद). उत्पन्नाचे गंभीर नुकसान होऊ नये म्हणुन वाढीच्या पूर्ण काळात उपचार करायला हवेत.

कशामुळे झाले

डिडिमेला रॅबिएल नावाच्या बुरशीमुळे जिला पूर्वी अॅस्कोचायटा रॅबियी नावाने ओळखले जात असे, लक्षणे उद्भवतात. ही बुरशी रोपांच्या अवशेषात बरेच वर्षे विश्रांती घेऊ शकते. अनुकूल परिस्थितीत ही बीजाणू निर्माण करते ज्यांचा प्रसार नंतर वार्‍याने आणि पावसाच्या उडणार्‍या पाण्याने होतो जो काही वेळा काही किलोमीटर अंतरापर्यंतही होतो. थंड आणि ओले हवामान, जास्त आर्द्रता, सकाळचे दव आणि जास्त काळ ओली रहाणारी पाने (२ तास किंवा जास्त) ह्या रोगाच्या प्रसारास अनुकूल असतात. बुरशीचा विकास विस्तृत श्रेणीच्या तापमानात (५-३०अंश) होतो पण त्यांच्या इष्टतम वाढीसाठी १५-२५ अंश तापमानात लागते. जर परिस्थिती अनुकूल असेल तर वाढीच्या मोसमात बुरशीच्या लागणीची पुष्कळशी चक्रे पुरी होऊ शकतात.


प्रतिबंधक उपाय

  • उपलब्ध असल्यास अधिक लवचिक वाण निवडा.
  • प्रमाणित रोगमुक्त लागवडीची सामग्री वापरा.
  • किंवा निरोगी शेतातील बियाणे वापरा.
  • बियाण्याच्या प्रमाणांच्या संदर्भात शिफारसींचे पालन करा.
  • रोगाचा उच्चीचा प्रभाव टाळण्यासाठी उशीरा लागवड करा.
  • रोगाच्या लक्षणांसाठी शेताचे निरीक्षण करा.
  • शेतातुन आणि आजुबाजुने तण आणि रानटी स्वयंभू रोपे काढा.
  • उत्पादनावर वाईट परिणाम होऊ नये म्हणुन शक्य तितक्या लवकर काढणी करा.
  • शेतात स्वच्छता राखा, उदा.
  • पायताण, कपडे शेतात वापरल्यानंतर धुवा.
  • शेतात तीन वर्षांतुन फक्त एकदाच वाटण्याची लागवड करा (पीक फेरपालट).

प्लँटिक्स डाऊनलोड करा