द्वीदल धान्य

घेवड्यावरील कोरडी मूळकूज

Fusarium solani f. sp. phaseoli

बुरशी

थोडक्यात

  • रोपांची पाने पिवळी पडून वाळतात.
  • रोप उगवल्यानंतर थोड्याच काळात मुख्य मुळावर लालसर डाग दिसु लागतात.
  • हे डाग तपकिरी होऊ शकतात, एकमेकात मिसळतात आणि मुळांच्या अक्षापाशी चिरा विकसित होतात.
  • मूळ मऊ आणि बुरसट बनत नाहीत, म्हणुन रोगाचे दुसरे सामान्य नाव "कोरडी मूळ कूज" आहे.
  • जर ती संक्रमित रोपे जगलीच तर त्यावर खूप कमी शेंगा लागतात आणि त्या शेंगांमध्ये दाणे कमी येतात.

मध्ये देखील मिळू शकते


द्वीदल धान्य

लक्षणे

पेरणीनंतर काही अठवड्यांनी संक्रमित रोपांची पाने पिवळी पडुन वाळतात. रोपांची वाढ खुंटते आणि जर हवामान परिस्थिती रोगाला अनुकूल असेल तर थोड्याच काळात मर होऊ शकते. उगवल्यानंतर एकाच अठवड्यात मुख्य मुळावर लालसर डाग किंवा छटा येणे, डाग एकमेकात मिसळणे आणि जसे ते सुकतात त्यावर मुळाच्या अक्षाच्या बाजुने चिरा पडणे हे जमिनीखालील लक्षणात येते. आडवी मुळे आणि मुळांची टोके आक्रसतात आणि वाळतात पण रोपाला चिकटुनच रहातात. नविन केसाळ मुळे या डागांच्या वर जमिनीच्या वरच्या थरात विकसित होऊ शकतात. संक्रमित भाग मऊ आणि बुरसट होत नाहीत म्हणुन "कोरडी मूळ कूज" हे सामान्य नाव पडले आहे. जर ती संक्रमित रोपे जगलीच तर त्यावर खूप कमी शेंगा लागतात आणि त्या शेंगांमध्ये कमी दाणे येतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

बॅसिलस सबटिलिस बरोबर र्हिकझोबियाम ट्रॉपिकिसारख्या जैविक नियंत्रक घटकांनी बीज प्रक्रिया केल्यास काम होऊ शकते. ट्रायकोडर्मा हर्झियानमवर आधारीत द्रावणांचा वापर हे इतर सूक्ष्मजंतु उपचारात येते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. फ्युरासियम मूळ कूजीवर बुरशीनाशके सामान्यपणे प्रभावी नसतात.

कशामुळे झाले

फ्युसारियम सोलानी नावाच्या बुरशीमुळे फ्युसारियम मूळ कूज होते जी जमिनीतील दसकटामंध्ये बरेच वर्षांपर्यंत जगु शकते. बुरशी वाढणार्‍या रोपात उगवल्यानंतर थोड्याच काळात शिरते आणि पाणी तसेच पोषकांचे वहन करणार्‍या भागात ठाण मांडते. ताण नसणार्‍या निरोगी रोपांवर बुरशीच्या उपस्थितीमुळे फारसे नुकसान होत नाही. तरीपण जर हवामान परिस्थिती विपरित (दुष्काळ, पाणीने भरलेली जमीन, पोषके व्यवस्थित न मिळणे, खोल पेरणी, घट्ट जमिन, तणनाशकांमुळे जखमा) असेल तर पाणी आणि पोषकांचे वहन बाधीत झाल्यामुळे ताण येतो आणि लक्षणे उमटतात. अशा परिस्थितीत उत्पादनाचे चांगलेच नुकसान अपेक्षित आहे.


प्रतिबंधक उपाय

  • आपल्या बाजारात उपलब्ध असल्यास सहनशील किंवा प्रतिकारक वाण लावा.
  • सरी किंवा उथळ वाफ्यांवर लागवड करा.
  • मोसमात उशीरा जेव्हा जमिन ऊबदार असते तेव्हा पेरणी करा.
  • लागवडीचे अंतर जास्त ठेवा.
  • शेतातील पाण्याचा चांगला निचरा होण्याची व्यवस्था करा.
  • दुष्काळाचा ताण टाळण्यासाठी झाडांना नियमितपणे पाणी द्या.
  • जमीन घट्ट होऊ नये याची काळजी घ्या.
  • चांगले खत नियोजन करा.
  • शेतकाम करताना झाडांना इजा होऊ देऊ नका.
  • ४ ते ५ वर्षांसाठी शेंगवर्गीय पीक नसलेल्या पिकाबरोबर पीक फेरपालट करण्याची शिफारस केली जाते.
  • खोल नांगरुन झाडांचे अवशेष पुरा.
  • जमिन नांगरुन तापू द्या.
  • संक्रमित झाडांचे अवशेष चारा म्हणून वापरू नका नाहीतर शेणखतात बुरशीचे अंश रहातील.

प्लँटिक्स डाऊनलोड करा