Sclerotinia sclerotiorum
बुरशी
यजमान प्रजातींप्रमाणे लक्षणे बदलतात पण बरेचशी लक्षणे सारखीच असतात. सुरवातीला पाणी शोषल्यासारखे अनियमित आकाराचे ठिपके फळ, पान आणि देठांवर उमटतात. जसे ते मोठे होतात, प्रभावित भागावर पांढरी, अगदी कापसासारखी बुरशी धरते, नंतरच्या टप्प्यांवर त्यावर विखुरलेल्या राखाडीसर ते काळ्या मस्सासारख्या प्रजनन संरचना ज्याला स्क्लोरोशिया म्हणतात, तयार होतात. खोड आणि फांदीच्या बुडाजवळ "कोरडे" डाग विकसित होतात व निरोगी भागांपासुन स्पष्टपणे वेगळे दिसतात. नंतरच्या टप्प्यांवर, बुरशी खोडाला पूर्णपणे वेढते आणि झाडाचा वरचा भाग मरगळतो, तपकिरी होतो आणि वाळतो. स्क्लेरोशिया खोडाच्या आत तयार होते आणि झाडाच्या आतील भागाची जागा घेते. संक्रमणामुळे झाडाची मर होऊन कोलमडते. संक्रमित शेंगा आणि दाणे आक्रसतात किंवा त्यात पूर्णपणे काळ्या बुरशीची वाढ दिसते.
कोनियोथिरियम मिनिटान्स किंवा ट्रायकोडर्मासारख्या परजीवी बुरशीच्या बीजाणूंना दाणेदार रुपात जमिनीत वापरले असता, स्क्लेरोशिनिया बुरशीची पकड आणि रोगाचा विकास कमी होतो.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. शेतात रोगाची वाढ जास्तच गंभीर असली तरच बुरशीनाशकांची फवारणी वापराची शिफारस केली जाते. पीक आणि वाढीचा टप्पा याप्रमाणे उपचार बदलतील. कोबी, टोमॅटो आणि शेंगांवरील स्क्लेरोशिनिया रोगाचे नियंत्रण कठिण आहे. तरीपण आयप्रोडियॉनवर आधारीत बुरशीनाशके (३ ग्रॅ./ली. पाणी), लेट्युस आणि भूईमुगाला चांगले परिणामकारक नियंत्रण देतात. यापैकी काही संयुगांविरुद्ध प्रतिकार निर्माण झाल्याचे वर्णन काही ठिकाणी सापडले आहे.
स्क्लेरोशिनिया खोडकुजीची लक्षणे जमिनीत रहाणार्या स्क्लेरोशिनिया स्क्लेरोशियोरम नावाच्या जमिनीजन्य बुरशीमुळे उद्भवतात जी खूप काळासाठी झाडांच्या अवशेषात किंवा जमिनीत सुप्तावस्थेत रहाते. हिचे बहुतेक जीवनचक्र जमिनीतच पूर्ण होते, यावरुन झाडावरील लक्षणे प्रथमत: जमिनीजवळच्या किंवा जमिनीच्या संपर्कात असलेल्या पान आणि झाडांच्या भागांवर का दिसतात ते कळते. जेव्हा हवामान अनुकूल असते, हिची वाढ सेंद्रिय घटकात आणि क्वचित झाडांच्या भागात शिरकाव करुन सुरु होते. जसे ते झाडांच्या सर्व भागात घर करतात, तसे बियाण्यात देखील जंतु शक्यतो बियांच्या टरफलांवर किंवा आतमध्ये सापडतात. बीजाणूंची नविन पिढी झाडात निर्माण होते आणि ते वार्याबरोबर उडते. झाडीच्या खालील थोडे दमट वातावरण बीजाणूंना खोडावर पसरण्यासाठी प्रोत्साहित करते. सुरवातीचा विकास होण्यासाठी पाने खूप काळ ओली रहायला हवीत आणि तापमान १४-२४ अंश सेल्शियसच्या दरम्यान असायला हवे. बाहेरील पोषकांची उपस्थितीही यांच्या वाढीला अनुकूल असते. शेंगा, कोबी, गाजर आणि कॅनोलासारखे खूप प्रकार या बुरशीचे यजमान आहेत.