सोयाबीन

सोयाबीनवरील बुरशीजन्य ठिपके

Corynespora cassiicola

बुरशी

थोडक्यात

  • पानांवर बेढब आकाराचे लालसर तपकिरी डाग येतात.
  • डाग फिकट हिरवे असुन पिवळ्या किनारी असतात.
  • नंतर डागांभोवती फिकट किंवा गडद वर्तुळे येतात.

मध्ये देखील मिळू शकते


सोयाबीन

लक्षणे

बुरशीजन्य ठिपके हा बहुधा पानांचा रोग आहे. पानांवर बेढब लालसर तपकिरी ठिपके पिवळसर हिरव्या किनारीसकट येतात. ह्या ठिक्यांच्या वाढीमुळे त्या भागात फिकट आणि गडद वर्तुळांची नक्षी तयार होते ज्यामुळे ह्याला लक्ष्याचे ठिपके हे सामान्य नाव आहे. फांद्या आणि खोडावरही परिणाम होतो आणि बहुधा गडद तपकिरी ठिपके किंवा लांबट डाग येतात. छोटे गोलाकार काळे ठिपके नंतर शेंगांवर येतात. गंभीर संक्रमाणामुळे पाने अकाली गळतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

या रोगाविरुद्ध कोणतेही पर्यायी उपचार उपलब्ध नाहीत.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. बुरशीनाशकांचा वापर आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नाही. पायराक्लोस्ट्रोबिन, एपोक्झिकोनाझोल आणि फ्ल्युक्झापायरोक्झॅड किंवा बायाक्झाफेन, प्रोथियोकोनाझोल आणि ट्रिफ्लोक्झिस्ट्रोबिनची मिश्रणे असणारे उत्पादन वापरुन बुरशीचे नियंत्रण करता येते.

कशामुळे झाले

कॉर्निस्पोरा कॅसिकोला बुरशी जमिनीत आणि पिकाच्या अवशेषात रहाते. उच्च आर्द्रता (>८०%) आणि पानांवर ओलावा रहाणे, ही परिस्थिती संक्रमणास अनुकूल आहे. कोरडे हवामान ह्या रोगाची वाढ दडपते. उशीरा तयार होणार्‍या वाणांवर किंवा संवेदनशील वाणांवर उच्च पावसाळ्याच्या मोसमात हा रोग संभवत: गंभीर असतो.


प्रतिबंधक उपाय

  • आर्थिक नुकसान टाळण्यासाठी जास्त उत्पन्न देणारे वाण लावा.
  • संक्रमणाची तीव्रता टाळण्यासाठी लवकर तयार होणारे वाण लवकर लावा.
  • काढणीनंतर शेतातुन रोपांचे अवशेष पूर्णपणे काढा.
  • यजमान नसणार्‍या पीकांबरोबर फेरपालट करा आणि त्याच भागात एकाच प्रकारचे पीक घेऊ नका.

प्लँटिक्स डाऊनलोड करा