कापूस

कापसवरिल् दहिया रोग

Mycosphaerella areola

बुरशी

थोडक्यात

  • जुन्या पानांवर बारीक, फिकट हिरवे ते पिवळसर, नसांद्वारे मर्यादित ठिपके दिसतात.
  • ठिपक्यांच्या खालच्या बाजुला पांढुरकी राखाडी पावडरीसारखी वाढ दिसते.
  • पाने शुष्क होऊन अकाली गळतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

कापूस

लक्षणे

लक्षणे साधारणत: वाढ संपण्याच्या काळात दिसतात. जुन्या पानांवर बारीक, फिकट हिरवे ते पिवळे, कोणाकृती, नसांद्वारे मर्यादित ठिपके दिसतात. ठिपक्यांच्या खालच्या बाजुला पांढुरकी राखाडी पावडरीसारखी वाढ दिसते. . उच्च दमटपणाच्या काळात, पानाच्या खालच्या बाजुला रूपेरी पांढरी बुरशीची वाढ दिसते. जास्त संसर्ग झालेली पाने करपून गोळा होऊन वळतात, लालसर तपकिरी रंगाची होतात व अकाली गळतात. या पानगळीमुळे झाड व त्याची उत्पादकता कमजोर होते. कोवळ्या पानांवरही लक्षणे दिसु लागतात. संक्रमित बोंड कमजोर झाल्याने अकाली उघडतात किंवा कापुस वेचणीच्या तसेच झोडपणीच्या वेळी खेचली जाऊन मोडतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

सुडोमोनस फ्लोरासन्स (१० ग्रॅम प्रती किलो बियाणाला) ची बीज प्रक्रिया केली जाऊ शकते. हे जंतु असणार्‍या द्रावणाची फवारणी दर १० दिवसांनी केल्यास संसर्ग खूप कमी होतो. इतर जंतु (बॅसिलस सरक्युलान्स आणि सेराशिया मारसेसेन्स) यांचा सुद्धा वापर मायकोस्फाएरेला जातीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केला जातो आणि त्यामुळे संबंधित रोगाचा प्रसार इतर पिकांमध्ये कमी होतो. ३ ग्रॅ. गंधकास एक ली. पाण्यात विरघळवुन किंवा ८-१० किलो गंधकाची पावडर प्रति हेक्टर झटकुन वापरणे ह्या इतर शक्यता आहेत.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच जर उपलब्ध असली तर जैविक उपचार पद्धतीही वापरा. रोगाच्या सुरवातीच्या काळात किंवा गंभीरता कमी असताना, जेैव उपचार वापरण्याचा विचार केला जावा. रोगाच्या पुढच्या टप्प्यावर किंवा गंभीरता वाढली असताना, प्रॉपिकोनाझोल किंवा हेक्झाकोनाझोल (२ मि.ली/ली) असणारे नविन बुरशीनाशक वापरण्याची शिफारस केली जाते. एक अठवडा ते १० दिवसांनी परत उपचार करा.

कशामुळे झाले

ही लक्षणे मायकोस्फाएरेला एरोला बुरशीमुळे होतात, जी पूर्वीच्या हंगामातील उरलेले अवशेष किंवा स्वयंभू रोपात सूप्तावस्थेत रहाते. नविन मोसमातील लशींचे हे मुख्य स्त्रोत आहेत. २० ते ३० अंश सेल्शियस तापमान, रात्री उच्च दमटपणा (८०% किंवा जास्त) आणि अधुनमधुन पडणारा पाऊस रोग वाढीस उत्तेजन देतो. थंड हवेसह मोठ्या दवाच्या रात्री खूप दिवस सतत राहिल्यास, जरी पाऊस पडला नाहीत तरी ते बुरशीला अनुकूल असते. बीजाणू पानातील व्रणांवर जन्म घेतात आणि नंतर हवेबरोबर निरोगी झाडांवर पसरत असल्याने दुय्यम संसर्ग होतो. मोसमातील उशीराच्या काळात, बोंडे धरताना किंवा थोड आधी, रोपे फारच संवेदनशील असतात.


प्रतिबंधक उपाय

  • प्रतिकारक वाण (बाजारात बरेचसे उपलब्ध आहेत) लावा.
  • पाण्याचा निचरा सुधारण्यासाठी उंचावलेल्या सरींवर लागवड करा.
  • मोसमात फार लवकर किंवा फार उशीरा लागवड करु नका.
  • पावसानंतर झाडी झटकन सुकण्यासाठी रोपांमध्ये योग्य अंतर राखा.
  • रोगाच्या लक्षणांसाठी नियमितपणे शेताचे निरीक्षण करत चला.
  • लक्षणे दर्शविणार्‍या पानांना काढुन नष्ट करा.
  • शेतात आणि आजुबाजुने संवेदनशील तण नियंत्रण करा.
  • पूर्वीच्या हंगामातील स्वयंभू पिके नष्ट करा.
  • पाने जास्त काळ ओली राहू नयेत म्हणुन ठिबक संचन करा आणि शक्यतो तुषार सिंचन टाळा.
  • रोपांना शक्यतो सकाळी पाणी द्या म्हणजे दिवसभरात पाणी सुकेल.
  • झाड व जमिनीचा पृष्ठभाग कोरडा ठेवण्यासाठी योग्य तितकेच पाणी द्या आणि सतत पाणी देणे टाळा.
  • नत्रयुक्त खत किंवा शेणखाताचा अतिवापर टाळा.
  • झाडे ओली असताना शेतात काम करणे टाळा.
  • झाडांचे अवशेष काढुन कपाशीच्या शेतापासुन दूर नेऊन जाळुन टाका.
  • २ किंवा ३ वर्षांसाठी उदा.
  • तृणधान्य पिकांसोबत पीक फेरपालट करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा