मका

उष्णकटिबंधीय तांबेरा

Physopella zeae

बुरशी

थोडक्यात

  • पानाच्या दोन्ही बाजुंना शिरांच्या समांतर गोल ते अंडाकृती पुटकुळ्यांचे पुंजके उमटतात.
  • जशी पाने मोठी होतात तशा पुटकुळ्या काळ्या पडतात आणि मध्यावर विशिष्ट रीतीने चमकदार उघडे व्रण दिसतात.
  • गंभीर संक्रमाणांत पुटकुळ्या एकमेकात मिसळतात ज्यामुळे अकाली पानगळ होते आणि उत्पादनात मोठी घट होते.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

मका

लक्षणे

रोगाची लक्षणे मुख्यतः गोल ते लंबगोलाकार पांढर्‍या पुटकुळ्या पानांच्या त्वचेखाली दिसतात. फोड पानांच्या दोन्ही बाजुला शिरांना समांतर गुच्छाने असतात. जसे ते मोठे होतात तसा त्यांचा रंग जांभळा ते काळा होतो आणि अखेरीस त्या फुटतात, ज्यामुळे फोडाच्या मध्यावर विशिष्ट चमकदार उघडे व्रण दिसतात. जेव्हा हे संक्रमण गंभीर असते तेव्हा, ह्या पुटकुळ्या एकमेकात मिसळतात ज्यामुळे अकाली पानगळ होते. बुरशी अत्यंत विध्वंसक आहे आणि जर फुले येण्याआधी संक्रमण झाले तर उत्पादनात खूप मोठी घट होते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

फायसोपेला झीच्या विरुद्ध कोणतेही उपचार माहितीत नाहीत. जर आपल्याकडे ह्या रोगावरील किंवा याच्या घटना कमी करण्याच्या काही खात्रीलायक जैविक उपचार असल्यास कृपया आमच्याशी संपर्क साधा.

रासायनिक नियंत्रण

जेव्हा शक्य होईल तेव्हा एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. जेव्हा उच्च किंमतीच्या पीकाच्या शेतात पहिली लक्षणे दिसतात तेव्हाच जर बुरशीनाशकांची फवारणी केल्यास परिणामकारक ठरतात. अॅझॉक्सीस्ट्रोबिन, टेब्युकोनॅझॉल, प्रोपिकोनॅझॉल किंवा त्यांचे मिश्रण असणारी बुरशीनाशके वापरल्यास या रोगाचा प्रसार होण्यापासुन नियंत्रण होण्यास मदत होते.

कशामुळे झाले

ही बुरशी क्वचित आढळते आणि फक्त अमेरीका खंडाच्या उबदार, आर्द्र भागात सापडते. योग्य पर्यायी यजमानाशिवाय ही आपले जीवनचक्र पूर्ण करु शकत नसल्याने ती बंधनकारक परजीवीही आहे. ही जमिनीत किंवा झाडांच्या अवशेषातही जीवंत राहू शकत नाही म्हणुन तिचा प्रसार एका हंगामातून दुसऱ्या हंगामात होण्यापासुन सहज रोखता येऊ शकतो. बुरशीचा प्रसार एका झाडावरुन दुसर्‍या झाडावर किंवा विविध भागात वार्‍याने होतो. उष्णकटिबंधीय तांबेर्‍याला वाढीव तापमान (२२ ते ३० डिग्री सेल्शियस), उच्च आर्द्रता आणि चांगला सुर्यप्रकाश अनुकूल आहे. पानांवर जास्त काळ पाणी रहाण्याने बीजाणू उगतात. उष्णकटिबंधीय तांबेरा शक्यतो मोसमात उशिरा लावलेल्या समुद्रसपाटीजवळच्या भागातील मक्यावर येतो.


प्रतिबंधक उपाय

  • आपल्या बाजारात उपलब्ध असल्यास प्रतिकारक किंवा सहनशील वाण लावा.
  • रोगाला प्रतिकूल असलेल्या हवामानात मका लागवड करा.
  • समुद्रसपाटीपासुन उंचावरील शेतात लागवड करण्याचा विचार करा.
  • तण आणि बुरशीच्या इतर पर्यायी यजमानांचे नियंत्रण करा.
  • यजमान नसणार्‍या पिकांबरोबर पीक फेरपालट करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा