Puccinia polysora
बुरशी
दाक्षिणात्य तांबेर्याची लक्षणे जुन्या पानांच्या वरच्या बाजुला बारीक लालसर नारिंगी फोडात दिसतात जे क्वचितच खालच्या बाजुला पहायला मिळतात. हे फोड भुकटी सारखे, गोलाकार ते लंबगोलाकार आकाराचे, उंचवटलेले आणि दाट पुंजक्याने असतात. रोगाच्या नंतरच्या टप्प्यावर त्यांचे पु्ंजके विखुरलेले दिसतात आणि कोवळी पाने, पर्णकोष, कणीस आणि खोडावरही पहायला मिळतात. पानांवर पिवळे आणि करपट धब्बेही येतात. कोवळी पाने जुन्या पानांपेक्षा जास्त संवेदनशील असल्याने उशीरा लागवड केलेले पीके या रोगास जास्त संवेदनशील असतात. खोडकुजीमुळे झाडे अशक्त होतात, कोलमडतात आणि दाण्यांची प्रतही कमी भरते. या रोगाच्या सहज प्रसार संभावनेमुळे उत्पादनात मोठी घट होऊ शकते.
गॉको (मिकानिया ग्लोमेराटा)चा पाणीदार अर्क वापरल्यास बीजाणूंचे उगवणे कमी होते. अर्क करण्यासाठी गॉकोची पूर्ण पाने निर्जंतुक केलेल्या पाण्यात बुडवुन फ्रिजमध्ये २४ तास ठेवा. नंतर कागदी चाळण वापरुन अर्क गाळुन घ्या व ५% केंद्रीकरण होईल तो पर्यत पाणी घालुन फवारणी करा.
हे महत्वाचे आहे कि एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. बुरशीनाशकांच्या वापराने संक्रमित भाग सुधारत नाहीत म्हणुन त्यांना निरोगी रोपांवरील प्रसाराचा फक्त प्रतिबंधक उपाय म्हणुनच वापरले जाऊ शकते. हे ही महत्वाचे आहे कि रोपाचे वय, रोगाची घटना आणि हवामान परिस्थिती पाहून बुरशीनाशकाचा वापर हा योग्य वेळीच झाला पाहिजे. मँकोझेब, सायप्रोकोनाझोल, फ्लुट्रियाफोल+फ्लुयोक्सास्ट्रोबिन, पायराक्लोस्ट्रोबिन, पायराक्लोस्ट्रोबिन+मँकोझेब, अॅझॉक्सिस्ट्रोबिन+प्रोपिकोनाझोल, ट्राफ्लोक्सिस्ट्रोबिन+प्रोथियोकोनाझोल बुरशीनाशके रोगाचा प्रभाव कमी करण्यात परिणामकारक आहेत. उपचारांचे उदा.: पुटकुळ्या दिसताक्षणीच मँकोझेब २.५ ग्रॅ./ली वापरावे आणि फुलधारणेपर्यंत दर १० दिवसांनी पुनरावृत्ती करावी.
प्युसिनिया पॉलिसोरा नावाच्या बुरशीमुळे दाक्षिणात्य तांबेर्याचा रोग होतो, उष्णकटिबंध ते उप-उष्ण कटिबंधीय भागात बहुधा हा वाढीच्या पुढच्या टप्प्यावर होतो. ही बुरशी बंधनकारक परजीवी आहे, ज्याचा अर्थ आहे कि तिला जगण्यासाठी जिवंत झाडांची गरज असते आणि ती जमिनीतील झाडांच्या अवशेषात किंवा बियाणात जगु शकत नाही. परिणामी एका मोसमात झालेले संक्रमण जरुरी नाही कि पुढच्या मोसमातही होईल. इतर शेतातुन किंवा भागातुन वार्याने वहन करुन आलेले बीजाणू हे संक्रमाणाचे प्रथम स्त्रोत ठरतात. मग ते एका झाडावरुन दुसर्या झाडावर वारा किंवा पाण्याने पसरतात. २७ आणि ३३ डिग्री सेल्शियसचे तापमान आणि उच्च आर्द्रता हे जास्त संक्रमण होण्यासाठी अनुकूल आहे. झाडाची वाढ होत असताना झालेल्या संक्रमणाने झाडाचे झपाट्याने आणि मोठे नुकसान होऊ शकते.